
पिक्चर अभी बाकी है! Apple पुन्हा करतेय लाँच ईव्हेंटची तयारी? नव्या डिव्हाईसची चर्चा झाली सुरु, नव्या धमाक्यासाठी व्हा सज्ज...
या आगामी ईव्हेंटमध्ये कंपनी काही नवीन डिव्हाईस सादर करण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, ऑक्टोबरमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या ईव्हेंटमध्ये कंपनी होमपॉड मिनी, स्क्रीनवाले होम हब आणि ॲपल टिव्ही 4के चे नवीन मॉडेल सादर करू शकते. याशिवाय, मॅकबुक प्रो, आयपॅड मिनी आणि आयमॅकचे अपडेटेड वर्जन देखील या ईव्हेंटमध्ये पाहायला मिळू शकतात.
MacRumors ने असा अंदाज वर्तवला आहे की, ॲपल ऑक्टोबर महिन्यात एका लाँच ईव्हेंटचे आयोजन करू शकते. या ईव्हेंटमध्ये कोणते प्रोडक्ट्स लाँच केले जाणार, हे अद्याप जाहिर करण्यात आले नाही. कंपनी ईव्हेंटऐवजी प्रेस रिलीजद्वारे देखील काही प्रोडक्ट्स लाँच करू शकते. (फोटो सौजन्य: Pinterest)
कंपनी ईव्हेंटमध्ये नवीन आयपॅड मिनी सादर करण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, यामध्ये A20 प्रो किंवा A19 प्रो चिपसेट पाहायला मिळू शकतो. तसेच या डिव्हाईसमध्ये ओएलईडी डिस्प्ले, नवीन स्पीकर सिस्टम आणि वॉटर-रेसिस्टेंट डिझाईन मिळू शकते, अशी चर्चा आहे.
नव्या आयमॅक मॉडेलमध्ये एम 6 चिपसेट असण्याची शक्यता आहे. यामध्ये 24-इंच डिस्प्ले आणि नवीन कलर ऑप्शन देखील दिले जाऊ शकतात. तर मॅकबुक प्रो चे 14-इंच मॉडेल M6 चिपसह अपडेट केले जाऊ शकते. मॅकबूक प्रो चे ओएलईडी वर्जन सादर केले जाऊ शकते, अशी देखील आता चर्चा आहे. यामध्ये 14 आणि 16 इंच डिस्प्ले ऑप्शन मिळू शकतात. मात्र ओएलईडी अपडेट ईव्हेंटमध्ये नाही तर 2026 च्या अखेरीस सादर केले जाणार असल्याचे सांगितलं जात आहे.
कंपनी त्यांच्या स्मार्ट होम सेक्शनमध्ये देखील नवीन डिव्हाईस सादर करण्याची शक्यता आहे. नवीन होमपॉड मिनीमध्ये नवा चिपसेट, अधिक चांगली साउंड क्वालिटी, N1 चिप आणि Wi-Fi 7 सपोर्ट मिळणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये दुसऱ्या जनरेशनचे अल्ट्रा वाईडबँड चिप देखील दिले जाऊ शकते. डिव्हाईसमध्ये सिरी एआय सपोर्ट आणि नवीन रेड कलर ऑप्शन देखील मिळण्याची शक्यता आहे.
BSNL चा धमाका! केवळ 1 रुपयांत यूजर्सना मिळणार नवं सिम, हाय-स्पीड डेटा आणि बरंच काही… अशी आहे ऑफर
ॲपल टिव्ही 4के चे नवीन वर्जन देखील ईव्हेंटमध्ये सादर केले जाऊ शकते. यामध्ये ए17 प्रो चिप, 8GB रॅम आणि N1 नेटवर्किंग चिपसह वायफाय 7 सपोर्ट मिळणार असल्याची चर्चा आहे. यासोबतच नवीन सिरी रिमोट देखील सादर केला जाऊ शकतो.