आता Truecaller वर LinkedInचे जॉब टाईटल आणि कंपनीची माहिती! कंपन्यांची पार्टनरशिप यूजर्ससाठी अशी ठरणार फायदेशीर
BSNL चा धमाका! केवळ 1 रुपयांत यूजर्सना मिळणार नवं सिम, हाय-स्पीड डेटा आणि बरंच काही… अशी आहे ऑफर
ट्रुकॉलरने प्रोफेशनल सोशल मीडिया नेटवर्क लिंक्डइनसोबत पार्टनरशिपची घोषणा केली आहे. हे नवीन इंटीग्रेशन लिंक्डइन यूजर्सना ट्रुकॉलरच्या कॉलिंग कार्डवर त्यांचे प्रोफेशनल डिटेल्स शेअर करण्याची सुविधा देते. (फोटो सौजन्य: Pinterest)
हे फीचर बेसिकली ट्रुकॉलर यूजर्सना लिंक्डइनवरील त्यांचे नाव आणि प्रोफाइल पिक्चर डिस्प्ले करण्याची परवानगी देते. लिंक्डइनवरील जुने आणि नवीन असे दोन्ही यूजर्स व्हेरिफाईड ऑन लिंक्डइनचा वापर करून थेट ट्रूकॉलर प्रोफाईलवर त्यांचे वर्कप्लेस, ऑर्गनाइजेशन आणि जॉब टाईटल जोडू शकणार आहेत. प्रोफाईलवर जोडण्यात आलेले हे डिटेल्स यूजरला कॉल करणाऱ्या कोणत्याही व्यक्तिला दिसाणार आहेत. यासाठी यूजरला ही सर्व माहिती ट्रूकॉलरवर जोडून डिस्प्ले करण्याचा पर्याय निवडावा लागणार आहे. यानंतर ट्रूकॉलर यूजर कॉलरच्या लिंक्डइन प्रोफाईलवर टॅप करू शकतात, ज्यामुळे त्यांना कॉलरच्या प्रोफेशनल ब्रॅकग्राऊंडबद्दल माहिती मिळू शकते.
लिंक्डइनसोबत एकत्रीकरण केवळ विद्यमान वापरकर्त्यांपुरते मर्यादित नाही. नव्या ट्रूकॉलर यूजर्सना लॉगिन विथ लिंक्डइनचा वापर करण्याची देखील संधी मिळणार आहे. या प्रोसेसमध्ये लिंक्डइनवरील नाव आणि प्रोफाईल फोटोसारखी माहिती ट्रुकॉलर प्रोफाईलमध्ये शेअर केली जाऊ शकते. याव्यतिरिक्त, विद्यमान यूजर्स देखील त्यांचे लिंक्डइन अकाउंट ट्रूकॉलरशी जोडून आपली व्यावसायिक ओळखही प्रदर्शित करू शकतात.
ट्रूकॉलरने स्पष्ट केले आहे की, लिंक्डइन प्रोफाईल कनेक्ट करणं आणि प्रोफेशनबद्दल माहिती देणं गरजेचे नाही. यूजर्स स्वत: ठरवू शकतात की, त्यांना त्यांचे वर्कप्लेस आणि जॉब टाईटल कॉलर आयडीवर दाखवयचे आहे की नाही. तसेच यूजर्सना लिंक्डइन अकाऊंट ट्रूकॉलरवरून डिस्कनेक्ट करण्याचा पर्याय देखील मिळणार आहे.
सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स
ट्रूकॉलर आणि लिंक्डइनचे हे एकत्रीकरण सध्या जगभरातील अँड्रॉईड यूजर्ससाठी उपलब्ध केले जात आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आयफोन यूजर्ससाठी ही सुविधा काही काळाने जारी केली जाणार आहे. याचा अर्थ आता केवळ अँड्रॉईडवर ट्रूकॉलरचा वापर करणाऱ्या यूजर्सना लिंक्डइन व्हेरिफाईड प्रोफेशनल ओळख कॉलर आयडीसोबत जोडण्याचा पर्याय मिळणार आहे.






