स्मार्टफोनच्या वापरामुळे वाढतोय Brain Cancer चा धोका? WHO च्या अहवालाने वाढली चिंता (फोटो सौजन्य - pinterest)
आजच्या डिजिटल जगात सर्वात जास्त वापरलं जाणारं गॅजेट म्हणजे स्मार्टफोन. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांकडे स्मार्टफोन असतो. स्मार्टफोनच्या वापराने आपली अनेक काम अगदी सहज शक्य होतात. विडिओ कॉल, व्हॉइस कॉल, मीटिंग अटेंड करणं, फोटो किंवा विडिओ शूट करणं, अशी अनेक काम आपण स्मार्टफोनच्या मदतीने अगदी सहज करू शकतो. दिवसाच्या २४ तासांपैकी १८ ते १९ तास स्मार्टफोनचा वापर केला जातो. पण म्हणतात ना एखादी गोष्ट जितकी चांगली तितकेच तिचे धोके देखील असतात.
हेदेखिल वाचा –मित्रमैत्रिणींना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत? मग अशाप्रकारे डाउनलोड करा whatsapp स्टिकर्स
स्मार्टफोनचा वापर आपण आपल्या रोजच्या जीवनात रोजच्या कामांसाठी करतो. पण याच स्मटफोनमुळे आपल्या आरोग्यावर देखील परिणाम होउ शकतो. याबाबात जागतिक आरोग्य संघटना WHO ने एक अहवाल सादर केला आहे. स्मार्टफोन ही आज प्रत्येक व्यक्तीची गरज बनली आहे. पण हा स्मार्टफोन आपल्या आरोग्यावर देखील परिणाम करत आहे. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मेंदूचा कर्करोग होऊ शकतो, अशी शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तवली जात होती, यासंबंधित अनेक पोस्ट देखील व्हायरल झाल्या होत्या. याबाबत आता जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) नवीन अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यात स्मार्टफोनच्या अतिवापराबद्दल सांगितले आहे.
स्मार्टफोनच्या अति वापरामुळे शरीराला हानी होते यात शंका नाही. मुलांमध्ये स्मार्टफोन वापरण्याची क्रेझ खूप वाढली आहे, जी त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक मानली जाते. याशिवाय स्मार्टफोनच्या वापरामुळे ब्रेन कॅन्सरचा धोका वाढतो असेही म्हटले जात होते. मात्र आता जागितक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर तुमच्या पूर्व शंका दूर होणार आहेत.
हेदेखिल वाचा –AI धोकादायक आहे? ChatGPT च्या माजी कर्मचाऱ्याने केला धक्कादायक खुलासा
WHO ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, स्मार्टफोन वापरणे आणि मेंदूच्या कर्करोगाचा कोणताही संबंध नाही. अभ्यासात, संशोधकांनी नोंदवले आहे की स्मार्टफोनचा दीर्घकाळ वापर करूनही, ग्लिओमा आणि लाळ ग्रंथी ट्यूमर (मेंदूच्या कर्करोगाची कारणे) सारख्या कर्करोगाच्या जोखमीत कोणतीही वाढ झालेली नाही. केन करिपिडिसच्या अभ्यासानुसार सध्या फोन आणि मेंदूचा कर्करोग किंवा इतर डोके व मान कर्करोग यांच्यात कोणताही संबंध नाही. जगभरात मोबाईलचा वापर झपाट्याने वाढत असला तरी त्यातून मेंदूचा कर्करोग होण्याचा धोका नाही. हा अभ्यास आवश्यक होता कारण मोबाईल फोनच्या किरणांमुळे कॅन्सरसारख्या गैरसमजांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली होती.
WHO च्या अहवालानुसार, संशोधकांनी 5,060 अभ्यासांचे परीक्षण केले. या पुनरावलोकनात, मोबाईल फोन वापरणे आणि कर्करोग यांच्यात कोणताही संबंध आढळला नाही. इतकेच नाही तर फोनवर जास्त वेळ बोलल्याने कॅन्सरचा धोका सध्या तरी आढळलेला नाही. मात्र, स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे लोकांना व्यसन नक्कीच होऊ शकते. त्यामुळे शक्य तितका स्मार्टफोनचा वापर कमी करा. सतत फोनकडे टक लावून पाहू नका.