अरे देवा! Google Photos चं स्टोरेज झालं फुल्ल? एक्सपर्टच्या या Smart Tricks करणार तुमची मदत
प्रत्येक अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये आपल्याला गुगल फोटोचं ऑप्शन पाहायला मिळतो. प्रचंड फोटो आणि व्हिडीओमुळे गुगल फोटोचं स्टोरेज लगेच फुल होतं. स्टोरेज फुल होण्याच्या समस्येमुळे तुम्ही देखील हैराण झाला आहात का? तुम्हाला देखील सतत गुगल फोटोचं स्टोरेज फुल झाल्याची नोटिफिकेशन येत आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जर हो असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
फोनमध्ये गेलं पावसाचं पाणी? थांबा! तुमच्या या चुका ठरतील Dangerous, डिव्हाईस होऊ शकतं खराब
गुगल फोटोचं स्टोरेज फुल झालं म्हणजे आता पैसे खर्च करावे लागणार आणि स्टोरेज खरेदी करावं लागणार, असं अनेकांना वाटतं. पण आता आम्ही तुम्हाला काही सोप्या टीप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाही आणि गुगल स्टोरेज देखील मोकळ होणार आहे. एक्सपर्टने सांगितलेल्या या टेक टिप्स प्रत्येक अँड्रॉईड युजरसाठी फायदेशीर ठरणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
खरं तर गुगल फोटोमध्ये ‘Free Up Space’ नावाचं एक फीचर इनबिल्ट आगे. हा ऑप्शन अशा फोटो आणि व्हिडीओला डिलीट करते जे आधीच क्लाउडवर अपलोड करण्यात आले आहेत. त्यामुळे जर तुमच्या गुगल फोटोचं स्टोरेज फुल झालं असेल तर हा ऑप्शन तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
अनेकदा स्क्रीनशॉट आणि WhatsApp इमेज देखील Google Cloud वर अपलोड केल्या जातात. तर कधीकधी डुप्लिकेट फोटो देखील क्लाउडमध्ये आपोआप साठवले जातात. अशा परिस्थितीत, गुगल फोटोजमध्ये जा आणि स्क्रीनशॉट किंवा WhatsApp इमेज सर्च करा. येथून तुम्ही अनावश्यक फोटो सहजपणे डिलीट करू शकता आणि अधिक स्टोरेज मोकळे करू शकता. स्टोरेज रिकामं करण्यासाठी हा देखील ऑप्शन बेस्ट आहे.
व्हिडीओची साईज मोठी असल्याने गुगल फोटोचं स्टोरेज फार लवकर भरतं. हे व्हिडीओ ऑप्टिमाइज करून गुगल फोटोचं स्टोरेज रिकामं केलं जाऊ शकतं. यासाठी सर्वात आधी गूगल फोटोजमध्ये जा आणि लार्ज वीडियो सर्च करा. जे व्हिडिओ खूप मोठे आहेत ते येथून काढून टाकावे लागतील. हे व्हिडीओ तुम्ही तुमच्या ड्राइव्ह स्टोरेजला एक्सटर्नल हार्ड ड्राइव्हमध्ये सेव्ह करून देखील स्टोरेज मोकळे करू शकता.
गुगल फोटोचं स्टोरेज रिकामं करण्यासाठी लोकं फोटो आणि व्हिडीओ डिलीट करतात. पण हे डिलीट केलेलं फोटो आणि व्हिडीओ ट्रॅशमध्ये साठवले जातात. यामुळे स्टोरेज फुल असतं. गुगल फोटोमधून डिलीट केलेले फोटो आणि व्हिडीओ ट्रॅशमधून देखील डिलीट करा.
आजकाल स्मार्टफोनमध्ये हाय-एंड कॅमेरे दिसतात, त्यामुळे फोटोचा आकारही खूप मोठा होऊ लागला आहे, परंतु क्लाउडवर अपलोड करताना सेटिंगमध्ये एक छोटासा बदल करून तुम्ही खूप स्टोरेज वाचवू शकता. खरंतर, गुगल फोटोजमध्ये स्टोरेज सेव्हर पर्याय देखील आहे, तो चालू केल्याने फोटो थोडे कॉम्प्रेस होतात, परंतु गुणवत्ता अबाधित राहते. या पर्यायासह, तुम्ही स्टोरेज वाचवताना Google Photos मुक्तपणे वापरू शकता.