6,100mAh बॅटरी आणि Leica कॅमेऱ्यासह आला Xiaomi चा नवीन Smartphone! वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज
Xiaomi 15S Pro हा लेटेस्ट स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा चीनमधील पहिला OEM हँडसेट आहे, ज्यामध्ये इन-हाउस 3nm 10-कोर XRING 01 चिपसेट देण्यात आला आहे. फोनमध्ये 16GB LPDDR5X रॅमसह 1TB पर्यंत UFS 4.0 इनबिल्ट स्टोरेज आहे आणि हे Android 15-बेस्ड HyperOS 2.0 वर चालते. Xiaomi 15S Pro मध्ये Leica-बॅक्ड 50-मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा युनिट देण्यात आलं आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सल पेरिस्कोप टेलीफोटो शूटर दिला आहे.
Xiaomi 15S Pro स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 16GB + 512GB आणि 16GB + 1TB यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या 16GB + 512GB रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनची किंमत CNY 5,499 म्हणजेच सुमारे 65,500 रुपये आहे. या स्मार्टफोनच्या 16GB + 1TB रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनची किंमत CNY 5,999 म्हणजेच सुमारे 71,500 रुपये आहे. फोन ड्रॅगन स्केल फाइबर वर्जन आणि फार स्काई ब्लू फिनिशमध्ये उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन सध्या ऑफिशियल ई-स्टोरद्वारे खरेदी केला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – X)
Xiaomi 15S Pro मध्ये 6.73-इंच 2K (3,100×1,440 पिक्सेल) OLED LTPO डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 3,200 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस लेवल, 1,920Hz PWM डिमिंग रेट आणि Xiaomi चा सिरेमिक ग्लास 2.0 प्रोटेक्शन आहे. स्क्रीन HDR10+ आणि Dolby Vision ला देखील सपोर्ट करते.
हा नवीन हँडसेट कंपनीच्या लेटेस्ट 3nm 10-कोर XRING 01 चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये Immortalis-G925 GPU सह 16GB LPDDR5X रॅम आणि 1TB पर्यंत UFS 4.0 ऑनबोर्ड स्टोरेज आहे. हे Xiaomi च्या HyperOS 2.0 वर चालते, जे Android 15 वर बेस्ड आहे.
फोटोग्राफीसाठी, Xiaomi 15S Pro मध्ये Leica-बॅक्ड ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट देण्यात आला आहे. यामध्ये 50-मेगापिक्सेल 1/1.31-इंच Light Fusion 900 प्रायमरी सेंसर आहे, ज्यामध्ये f/1.44 अपर्चर आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS) सपोर्ट आहे. कॅमेरा सेटअपमध्ये 50-मेगापिक्सेल Samsung S5KJN1 सेंसरसह 115-डिग्री अल्ट्रा-वाइड अँगल लेंस आहे, ज्यामध्ये f/2.2 अपर्चर आणि मॅक्रो फंक्शनॅलिटी आहे. यासोबतच 50-मेगापिक्सेल Sony IMX858 पेरिस्कोप टेलीफोटो शूटर आहे, ज्यामध्ये 5x ऑप्टिकल झूम, 10x इन-सेंसर लॉसलेस झूम, f/2.5 अपर्चर, आणि OIS सपोर्ट आहे. स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 32-मेगापिक्सेल OV32B40 फ्रंट कॅमेरा आहे, ज्यामध्ये f/2.0 अपर्चर आहे.
Xiaomi 15S Pro मध्ये 6,100mAh बॅटरी आहे, जी 90W वायर्ड आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.
सिक्योरिटीसाठी, हँडसेटमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये 5G, डुअल 4G VoLTE, Wi-Fi 7, Bluetooth 5.4, Beidou, Galileo, GLONASS, GPS, NavIC, NFC, आणि USB Type-C 3.2 Gen 1 पोर्ट यांचा समावेश आहे. फोनमध्ये IP68-रेटेड डस्ट आणि वाटर-रेजिस्टेंट बिल्ड आहे. यामध्ये Dolby Atmos सपोर्टसह स्टीरियो स्पीकर्स देखील आहेत.