
Tech Tips: महागडा iPhone हँग झाला अन् तुमचाही पारा चढला? फोन फ्रीज होण्याची 'ही' असू शकतात कारणं, घरबसल्या करा 'हे' उपाय
जुन्या आयओएसमुळे देखील फोनमध्ये फ्रीज आणि क्रॅश होण्यासारख्या समस्या निर्माण होतात. ॲपलच्या सॉफ्टवेअर अपडेट्समध्ये केवळ नवीन फीचर्सचाच नाही, तर फोनच्या कामगिरीवर परिणाम करू शकणाऱ्या त्रुटींच्या (बग्जच्या) सुधारणांचाही समावेश असतो; याव्यतिरिक्त, हे अपडेट्स ॲप सुसंगतता आणि बॅटरी व्यवस्थापनातही सुधारणा करतात.