
Tech Tips: हिवाळ्यात फोन चार्ज करताना टाळा 'या' चुका... बॅटरीवर होऊ शकतो परिणाम, जाणून घ्या
देशी कंपनीची कमाल! 7,000mAh बॅटरी अन् जबरदस्त फीचर्ससह नवा स्मार्टफोन लाँच, किंमत खिशाला परवडणारी
अनेकदा हिवाळ्यात थंडीपासून वाचण्यासाठी स्मार्टफोन हीटरजवळ ठेऊन चार्ज केला जातो. यावेळी, तापमानात होणाऱ्या या बदलामुळे स्मार्टफोनच्या बॅटरीवर परिणाम होऊ शकतो आणि डिव्हाईसची बॅटरी खराब होऊ शकते. त्यामुळे हिवाळ्यात स्मार्टफोन चार्ज करताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest)
फोनमध्ये लिथियम-आयन बॅटरी दिली जाते. या बॅटरीची केमिकल ॲक्टिविटी कमी तापमानात स्लो होते. अशा परिस्थितीत स्मार्टफोनच्या चार्जिंग स्पीडवर परिणाम होऊ शकतो. प्रचंड थंड वातावरणात स्मार्टफोन चार्ज केल्यास बॅटरीवर दबाव निर्माण होऊ शकतो आणि अशावेळी स्मार्टफोनची बॅटरी खराब होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे जर तुमचा स्मार्टफोन बराच वेळ थंड वातावरणात राहिला असेल तर चार्ज करण्यापूर्वी डिव्हाईस सामान्य खोलीच्या तापमानात सेट होऊ द्या. यानंतरच स्मार्टफोन चार्ज करा.
हिवाळ्यात काही लोकं स्मार्टफोनचे तापमान सामान्य करण्यासाठी किंवा डिव्हाईसचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्याला हीटर, ब्लोअर किंवा इतर उष्ण ठिकाणी ठेवतात. मात्र असे करणं धोकादायक ठरू शकते. कारण जास्त उष्ण तापमानामुळे स्मार्टफोनच्या बॅटरी हेल्थवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्मार्टफोन चार्ज करताना नेहमी अशा ठिकाणी ठेवा, जिथे सामान्य तापमान असेल आणि हवा खेळती असेल.
हिवाळ्यात स्मार्टफोन ब्लँकेट किंवा उशीखाली ठेऊन चार्ज करू नका. स्मार्टफोन चार्ज करताना ब्लँकेट किंवा उशीखाली ठेवल्यास डिव्हाईसमधून उष्णता बाहेर पडू शकत नाही आणि ओव्हरहिटींगची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी नेहमी ओरिजीनल आणि चांगल्या क्वालिटिच्या चार्जरचा आणि केबलचा वापर करा. लोकल चार्जरमुळे स्मार्टफोनची बॅटरी खराब होऊ शकते. चार्जिंगदरम्यान स्मार्टफोनचा अनावश्यक वापर करू नका.
Ans: होय, कमी तापमानामुळे स्मार्टफोनमधील लिथियम-आयन बॅटरीची केमिकल ॲक्टिव्हिटी मंदावते. त्यामुळे बॅटरीची कार्यक्षमता आणि चार्जिंग स्पीड प्रभावित होऊ शकतो.
Ans: अत्यंत कमी तापमानात स्मार्टफोन चार्ज करणे टाळावे. फोन बराच वेळ थंड वातावरणात राहिला असल्यास चार्ज करण्यापूर्वी त्याला सामान्य खोलीच्या तापमानात येऊ द्यावे.
Ans: नाही. हीटर, ब्लोअर किंवा इतर उष्ण ठिकाणी स्मार्टफोन ठेवून चार्ज केल्यास बॅटरीचे तापमान वाढू शकते. त्यामुळे बॅटरीच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.