
अहो iPhone नाही, हा तर itel! केवळ 7,299 रुपयांच्या किंमतीत दमदार स्मार्टफोन लाँच! स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घ्या
टेक कंपनी itel ने भारतात त्यांचा एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा लेटेस्ट स्मार्टफोन A90 Limited Edition (128GB) या नावाने लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे त्याची डिझाईन काही प्रमाणात आयफोनसारखी आहे. याशिवाय या लेटेस्ट डिव्हाईसची किंमत 8 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. कंपनीने लाँच केलेला हा नवीन मॉडेल A90 सीरीजपेक्षा अधिक चांगला आहे आणि हा व्हेरिअंट अशा युजर्ससाठी लाँच करण्यात आला आहे, जास्त स्टोरेज असलेला बजेट-फ्रेंडली किंमतीतील फोन पाहिजे आहे. या स्मार्टफोनची किंमत आणि त्याचे इतर फीचर्स जाणून घेऊया.
नवीन itel A90 Limited Edition (128GB) ची किंमत भारतात 7,299 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीचा हा व्हेरिअंट भारताच्या रिटेल स्टोअरवर उपलब्ध आहे. itel 100 दिवसांच्या आत एकदा त्यांच्या युजर्सना फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट देखील ऑफर करत आहे. हा व्हेरिअंट स्पेस टाइटेनियम, स्टारलिट ब्लॅक, आणि ऑरोरा ब्लू या तीन रंगांच्या पर्यायामध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – x)
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा फोन itel च्या ‘3P प्रॉमिस’ सह लाँच करण्यात आला आहे. म्हणजेच हा स्मार्टफोन डस्ट, वॉटर आण ड्रॉपपासून प्रोटेक्शन ऑफर करतो. A90 मध्ये IP54 रेटेड प्रोटेक्शन आहे, जे पाऊस, धूळ आणि हलक्या पाण्याच्या थेंबांपासून संरक्षण ऑफर करते. A90 Limited Edition मध्ये 128GB इंटरनल स्टोरेज आहे, ज्याच्या मदतीने यूजर्स जास्त फोटो, व्हिडीओ आणि अॅप्स स्टोअर करू शकतात. कंपनीच्या या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये A90 Series चे ‘Max’ डिझाईन लँग्वेज कायम ठेवले आहे. फोनमध्ये MIL-STD-810H मिलिट्री-ग्रेड सर्टिफिकेशन देखील देण्यात आले आहे.
डिव्हाईसला पावर देण्यासाठी यामध्ये T7100 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. हे डिव्हाईस 12GB रॅम (4GB + 8GB वर्चुअल) सह लाँच करण्यात आले आहे. यामुळे मल्टीटास्किंग स्मूद होते. हा स्मार्टफोन Android 14 (Go Edition) वर आधारित आहे, यूजर-फ्रेंडली एक्सपीरिएंस ऑफर करतो.
A90 Limited Edition मध्ये 6.6-इंच HD+ डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये ऑलवेज-ऑन-डिस्प्ले आहे आणि अनेक डायनॅमिक बार फीचर्स आहेत. हे फीचर्स यूजर्सना नोटिफिकेशन, बॅटरी स्टेटस आणि कॉलर डिटेल बिना फोन अनलॉक करता पाहण्याची सुविधा देतात. ब्रँड DTS-एन्हांस्ड साउंडसह अधिक चांगला ऑडियो एक्सपीरिएंस देण्याचा दावा करतो.
Apple ने लाँच केलं iPhone Pocket! आता कुठेही घेऊन जा तुमचा महागडा फोन, किंमत आहे केवळ इतकी
या फोनमध्ये 13MP रिअर कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. या डिव्हाइसला 5000mAh बॅटरी आहे, जी 10W चार्जर (15W सुसंगत) सोबत येते.
Ans: itel ही Transsion Holdings ग्रुपची चीनमधील कंपनी आहे, जी बजेट-फ्रेंडली स्मार्टफोन आणि फीचर फोनसाठी ओळखली जाते.
Ans: itel स्मार्टफोन Android (Go Edition किंवा बेसिक Android) वर चालतात, तर फीचर फोन itel च्या स्वतःच्या OS वर चालतात.
Ans: बहुतेक itel फोन 4G सपोर्टसह येतात. काही नवीन मॉडेल्समध्ये 5G सपोर्टही उपलब्ध आहे.