
New Year 2026: करोडो यूजर्सना जिओने दिलं नवीन वर्षांचं खास सरप्राईज, लाँच केले 3 नवीन प्रीपेड प्लॅन्स
तुम्ही देखील जिओ यूजर आहात का? जर हो, तर तुमच्यासाठी कंपनीने नवीन वर्षानिमित्त एक खास गिफ्ट आणलं आहे. खरं तर नवीन वर्ष सुरु होण्याच्या काही दिवस आधीच कंपनीने त्यांच्या यूजर्ससाठी या गिफ्टची घोषणा केली आहे. कंपनीने त्यांच्या यूजर्ससाठी तीन नवीन प्रीपेड प्लॅन्स लाँच केले आहेत. ‘Happy New Year 2026’ या नावाने हे प्लॅन्स लाँच करण्यात आले आहेत. यूजर्सच्या गरजा लक्षात घेऊन कंपनीने हे प्लॅन्स लाँच केले आहेत. यामध्ये डेली कनेक्टिविटीसह एंटरटेनमेंट आणि डिजिटल सर्विसेजचे कॉम्बिनेशन जोडण्यात आले आहे. या प्लॅन्सची किंमत किती आहे आणि त्यामध्ये कोणते फायदे मिळणार आहेत, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.
सर्वात आधी कंपनीने त्यांच्या यूजर्ससाठी एक अॅन्युअल रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. म्हणजेच ज्या यूजर्सना वर्षभर सतत रिचार्ज करण्याचा कंटाळा येतो, अशा यूजर्ससाठी हिरो अॅन्युअल रिचार्ज प्लॅन सादर करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या प्लॅनची किंमत 3,599 रुपये आहे. या प्लॅनमध्ये 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. यासोबतच यूजर्सना रोज 2.5GB डेटा, अनलिमिटेड 5G डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएसची सुविधा दिली जाते. याशिवाय या प्लॅनमध्ये 18 महिन्यांचे गुगल जेमिनी प्रोचे सब्सक्रिप्शन देखील ऑफर केले जाते, ज्यांची किंमत कंपनीनुसार 35,100 रुपये आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
दुसरा प्रीपेड प्लॅन एक मंथली रिचार्ज प्लॅन आहे, ज्यामध्ये ओटीटी कंटेट आवडणाऱ्या यूजर्ससाठी अनेक फायदे देण्यात आले आहे. हा प्लॅन कंपनीने जियो सुपर सेलिब्रेशन मंथली प्लॅन या नावाने लाँच केला आहे. या प्लॅनची किंमत 500 रुपये आहे, कंपनीच्या या प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. याशिवाय या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड 5G, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS ची सुविधा मिळते. ओटीटी यूजर्ससाठी हा प्लॅन अतिशय खास आहे. कारण या प्लॅनमध्ये यूजर्सना यूट्यूब प्रीमियम, जियोहॉटस्टार, अमेझॉन प्राइम व्हिडीओ, सोनी लिव, झी 5, लायंसगेट प्ले, डिस्कवरी+, सन एनएक्सटी, कांचा लंका, प्लॅनेट मराठी, चौपाल, फॅनकोड आणि होइचोई सारख्या प्लॅटफॉपर्म्सचा फ्री अॅक्सेस मिळतो. या प्लॅनमध्ये 18 महिन्यांचे गुगल जेमिनी प्रोचे सब्सक्रिप्शन देखील ऑफर केले जाते.
Flipkart Vs Amazon: iPhone 16 वर कुठे मिळणार जबरदस्त ऑफर्स? इथे आहे तुमच्या फायद्याची Deal…
कंपनीचा तिसरा प्लॅन बजेट किंंमतीत सादर करण्यात आला आहे. जिओने हा प्लॅन जियो फ्लेक्सी पॅक या नावाने लाँच केला आहे. या प्लॅनची किंमत 103 रुपये आहे. या प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडीटी आणि 5GB डेटा ऑफर केला जातो. याव्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या पसंतीनुसार मनोरंजन पॅक निवडू शकता. हिंदी पॅकमध्ये जियोहॉटस्टार, झी 5 आणि सोनी लिवचे सबस्क्रिप्शन समाविष्ट आहेत किंवा आंतरराष्ट्रीय पॅकमध्ये जिओस्टार, फॅनकोड, लायंसगेट आणि डिस्कवरी+ समाविष्ट आहेत.तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही रिजनल पॅक देखील निवडू शकता जो जिओस्टार, सन एनएक्सटी, कांचा लंका आणि होइचोईचे सबस्क्रिप्शन प्रदान करेल.
Ans: Jio कडे प्रीपेड, पोस्टपेड, वार्षिक, फक्त डेटा, व्हॅल्यू आणि 5G प्लॅन असे विविध प्रकार उपलब्ध आहेत.
Ans: Jio मध्ये बेसिक व्हॅलिडिटी/व्हॉईस प्लॅन साधारणपणे ₹155–₹179 पासून सुरू होतात (डेटा कमी/नसलेला).
Ans: होय. बहुतेक सर्व Jio प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग (All Networks) मिळते.