Flipkart Vs Amazon: iPhone 16 वर कुठे मिळणार जबरदस्त ऑफर्स? इथे आहे तुमच्या फायद्याची Deal...
Airtel Recharge Plan: कंपनीने कमी केले ‘या’ प्लॅन्सचे डेटा बेनिफिट्स, यूजर्स झाले नाराज! जाणून घ्या
सर्वात आधी Amazon वर उपलब्ध असलेल्या डिल्सबाबत जाणून घेऊया. Amazon वर आयफोन 16 सध्या 66,900 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच कंपनी आयफोन 16 च्या खरेदीवर 16% चा प्लॅट डिस्काऊंट देणार आहे. एवढंच नाही, SBI क्रेडिट कार्ड EMI आणि ICICI बँक क्रेडिट कार्डवर देखील 4 हजा रुपयाचे इंस्टेट डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. तसेच SBI क्रेडिट कार्ड नॉन EMI ऑप्शनवर 3000 रुपयांचे डिस्काऊंट ऑफर करत आहे, ज्यामुळे फोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
दुसरीकडे, फ्लिपकार्टवरून तुम्ही आयफोन 16 62,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकणार आहोत. ही किंमत कोणत्याही बँक ऑफरशिवाय उपलब्ध आहे, परंतु जर तुम्ही फ्लिपकार्ट एसबीआय क्रेडिट कार्ड किंवा फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला 5% अतिरिक्त कॅशबॅक मिळेल, ज्यामुळे डिव्हाइसची किंमत आणखी कमी होईल. त्यामुळे कोणत्याही बँक ऑफरशिवाय फ्लिपकार्ट सर्वात चांगली डिल ऑफर करत आहे. तर Amazon वरून तुम्ही बँक ऑफरसह फोन 62,900 रुपयांना खरेदी करू शकता.
iPhone 16 च्या खास फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 6.1-इंच OLED डिस्प्ले आहे आणि हा आयफोन पावरफुल A18 चिपसेटवर आधारित आहे, जो फास्ट परफॉर्मेंस आणि उत्तम बॅटरी एफिशिएंसी देतो. या डिव्हाईसमध्ये Apple च्या इंटेलिजेंट फीचर्सचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे आणि यामध्ये एक डेडिकेटेड कॅमेरा कंट्रोल बटन देखील आहे. मागील बाजूला, 48-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेऱ्यासह डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. हे डिव्हाइस सध्या नवीनतम iOS 26 वर चालते.
Ans: बिग बिलियन डेज, ग्रेट इंडियन फेस्टिव्हल, फेस्टिव्ह सेल किंवा इयर-एंड सेल दरम्यान खरेदी केल्यास तुम्हाला सर्वात मोठी सूट मिळते.
Ans: बहुतेक वेळा ऑनलाइन ऑफर्स जास्त फायदेशीर असतात, कारण बँक आणि एक्सचेंज डील्स मिळतात.
Ans: Amazon नो-कॉस्ट EMI साठी जास्त सोयीस्कर मानला जातो, विशेषतः क्रेडिट कार्ड EMI मध्ये.






