Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयएमसी 2024 मध्ये लाँच केले JioBharat V3 आणि V4 फीचर फोन, किंमत केवळ इतकी

रिलायन्स जिओने इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC 2024) मध्ये JioBharat V3 आणि V4 लाँच केले आहेत. ग्राहकांना लवकरच या फोनची खरेदी करता येईल. Jio ने AI चा लाभ प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, असं आकाश अंबानी यांनी इंडिया मोबाइल काँग्रेस ईव्हेंटमध्ये सांगितलं.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 15, 2024 | 10:00 PM
मुकेश अंबानींचे दिवाळी गिफ्ट! केवळ इतक्या रुपयांमध्ये लाँच केले JioBharat V3 आणि V4 फीचर फोन

मुकेश अंबानींचे दिवाळी गिफ्ट! केवळ इतक्या रुपयांमध्ये लाँच केले JioBharat V3 आणि V4 फीचर फोन

Follow Us
Close
Follow Us:

रिलायन्स जिओने इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC 2024) मध्ये आपल्या ग्राहकांना एक उत्तम भेट दिली आहे. कंपनीने दिवाळीपूर्वी आपले दोन नवीन फीचर फोन स्वस्त किमतीत लाँच केले आहेत. दिल्लीमधील प्रगती मैदान येथील इंडिया पॅव्हेलियन येथे इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC 2024) या ईव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. या ईव्हेंटला रिलायंस जियो इन्फोकॉम लिमिटेडचे चेअरपरसन आकाश अंबानी देखील उपस्थित होते. या ईव्हेंटमध्ये JioBharat V3 आणि V4 लाँच करण्यात आले आहेत.

हेदेखील वाचा- डिजीटल इंडिया 4 स्तंभांवर आधारित, आयएमसीमध्ये 6G च्या भविष्यावर पंतप्रधानांचं मोठं विधान

JioBharat V3 आणि V4 फोन स्वस्त दरात आणि उत्तम फीचर्ससह लाँच करण्यात आले आहेत. V3 आणि V4 हे दोन्ही 4G फीचर फोन JioBharat सीरीज अंतर्गत लाँच झाले आहेत. JioBharat V2 मॉडेल गेल्या वर्षी लाँच करण्यात आले होते. ज्याने भारतीय फीचर फोन मार्केटमध्ये खळबळ उडवून दिली. आता कंपनी पुन्हा एकदा धमाका करण्याच्या तयारीत आहे. (फोटो सौजन्य – JIO)

किंमत फक्त 1099 रुपये

Jio च्या नवीन 4G फीचर फोन JioBharat V3 आणि V4 ची किंमत फक्त 1,099 रुपये आहे. Jio Bharat V3 आणि V4 लवकरच सर्व मोबाईल स्टोअर्स तसेच JioMart आणि Amazon वर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना लवकरच या फोनची खरेदी करता येईल. कंपनीने हे स्वस्त फीचर फोन 2G वरून 4G नेटवर्ककडे वळलेल्या वापरकर्त्यांना लक्षात घेऊन सादर केले आहेत. या दोन्ही फोनमध्ये 455 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल उपलब्ध असतील.

128GB स्टोरेज आणि शक्तिशाली बॅटरी

JioBharat V3 आणि V4 फोन 1000 mAh च्या पॉवरफुल बॅटरीसह लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये 128GB पर्यंत वाढवता येण्याजोगे स्टोरेज आणि 23 भारतीय भाषांसाठी सपोर्ट आहे. विशेष म्हणजे ते वापरण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त 123 रुपयांच्या मासिक रिचार्जसह हे वापरू शकता. 123 रुपयांमध्ये तुम्हाला 14GB डेटा आणि अमर्यादित व्हॉइस कॉल मिळणार आहे.

हेदेखील वाचा- आठ वर्षांत पूर्ण केला 2G ते 5G चा प्रवास, मोदी है तो मुमकीन है! आयएमसीमध्ये आकाश अंबानींकडून मोदींचं कौतुक

जिओ सिनेमाचे सब्सक्रिप्शन

V3 आणि V4 दोन्ही मॉडेल्स Jio-TV, Jio-Cinema, Jio-Pay आणि Jio-Chat सारख्या काही उत्तम प्री-लोडेड ॲप्ससह लाँच झाले आहेत. यामध्ये 455 हून अधिक लाइव्ह टीव्हीसोबतच चित्रपट, व्हिडिओ आणि स्पोर्ट्स कंटेंटही मिळणार आहे. दुसरीकडे, Jio-Pay सोपे पेमेंट आणि Jio-Chat ऑफर करते, अमर्यादित व्हॉइस मेसेजिंग, फोटो शेअर आणि ग्रुप चॅट सारखे अनेक पर्याय ऑफर केले जातात.

IMC 2024 मध्ये आकाश अंबानी काय म्हणाले?

आकाश अंबानी म्हणाले की, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी AI खूप महत्त्वाचे आहे. Jio ने AI चा लाभ प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जसे मोबाईल ब्रॉडबँडने केले. आम्ही सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत शक्तिशाली AI मॉडेल्स आणि सेवा देण्यासाठी तयार आहोत. यासाठी आम्ही राष्ट्रीय AI पायाभूत सुविधांचा आधार तयार करत आहोत.

Web Title: Jio launches jiobharat v3 and v4 feature phones in india at just rupees 1099

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2024 | 10:00 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.