Tech Tips: Power Bank खरेदी करताना कधीही करू नका या चूका! पैसे होतील बर्बाद आणि फोनही होईल खराब...
सध्याच्या डिजीटल काळात प्रत्येकासाठी महत्त्वाचं असणारं गॅझेट म्हणजे आपला स्मार्टफोन. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपला स्मार्टफोन आपल्या कामाचा असतो. कॉलिंग, चॅटिंगपासून अगदी फोटोग्राफी आणि ऑनलाईन शॉपिंग करण्यापर्यंत स्मार्टफोन आपल्याला प्रत्येक कामात मदत करतो. स्मार्टफोन सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्तिची गरज बनला आहे. पण सर्व कामात मदत करणारा हाच स्मार्टफोन कधी बंद झाला तर आपण वैतागतो. अशावेळी आपण पावर बँक आणि चार्जर शोधू लागतो. आपण घरी किंवा ऑफीसमध्ये असलो तर अगदी सहज चार्जरचा वापर करू शकतो. पण जर आपण एखाद्या ठिकाणी फिरायला गेलो किंवा ट्रॅकिंगला गेलो तर अशावेळी आपल्याला चार्जर नाही तर पावर बँक मदत करतो.
मोबाईलच्या वाढत्या गरजेमुळे पावर बँक देखील आपल्या जीवनाचा भाग बनला आहे. प्रवासादरम्यान आणि ट्रॅकिंग दरम्यान पावर बँक अत्यंत गरजेचा आहे. सध्या बहुतेक स्मार्टफोन्सची बॅटरी सरासरी 5000 mAh असते, जी 24 तास टिकत नाही. अशावेळी आपल्याला पावर बँकची गरज असते. जर तुम्ही पॉवर बँक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. यामध्ये आम्ही तुम्हाला पॉवर बँक खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – Pinterest)
तुम्ही फोन चार्जिंगसाठी पावर बँक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की पावर बँकची क्षमता तुमच्या स्मार्टफोनच्या बॅटरी क्षमतेपेक्षा 2.5 पट जास्त असली पाहिजे. यामुळे फोन वेगाने चार्ज होण्यास मदत होईल. तसेच पावर बँकची बॅटरी देखील दिर्घकाळासाठी चालेल आणि तुम्ही फोन वारंवार चार्ज करू शकता. यासोबतच, जेव्हाही तुम्ही पॉवर बँक खरेदी करता तेव्हा त्यात किती mAh बॅटरी आहे ते नक्की तपासा. तुम्ही कमीत कमी 10,000 mAh बॅटरी क्षमता असलेला पॉवर बँक खरेदी करावा.
याशिवाय पावर बँकच्या यूएसबी चार्जिंगवर नजर ठेवा. पावर बँक खरेदी करताना त्याच्या बॅटरी क्षमतेसोबतच यूएसबी चार्जिंगबाबत देखील माहिती घ्या. कारण बाजारात उपलब्ध असलेले जुने पॉवर बँक फक्त त्यांच्या यूएसबी केबल्सनेच काम करतात. अशा परिस्थितीत पावर बँकच्या मदतीने तुम्हाला तुमचा फोन चार्ज करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. असा पावर बँक तुमच्या स्मार्टफोनसाठी काही कामाचा नाही.
असे अनेक लोकं आहेत ज्यांच्याकडे एकापेक्षा अधिक स्मार्टफोन असतात. चार्जिंगच्या समस्येमुळे दोन्ही फोन बंद होऊ नयेत म्हणून, जास्त क्षमतेचा पॉवर बँक खरेदी करा. परंतु जर तुमच्याकडे फक्त एकच डिव्हाइस असेल तर तुम्ही कमी क्षमतेचा पॉवर बँक देखील खरेदी करू शकता.
पावर बँकचा वापर करताना आउटपुट वोल्टेजवर लक्ष ठेवा. जर तुमच्या पॉवर बँकचा आउटपुट व्होल्टेज तुमच्या फोनच्या आउटपुट व्होल्टेजइतका नसेल, तर फोन चार्ज होणार नाही. अशा परिस्थितीत, लक्षात ठेवा की पॉवर बँकचा आउटपुट व्होल्टेज नेहमी तुमच्या फोन चार्जरच्या आउटपुट व्होल्टेजइतका असावा. जर आउटपुट व्होल्टेज समान नसेल, तर तुम्ही तुमच्या फोन चार्जरने पॉवर बँक चार्ज करू शकणार नाही.
पावर बँकची बॅटरी क्षमता किती असावी?
स्मार्टफोनच्या बॅटरी क्षमतेपेक्षा 2.5 पट जास्त
पावर बँकची बॅटरी किती mAh असावी?
10,000 mAh