फोटो सौजन्य: @androidfaithful/ X.com
मागील काही वर्षांपासून भारतात स्मार्टफोन्सच्या सोबतीने स्मार्ट वॉचच्या मागणीत सुद्धा मोठी वाढ झाली आहे. अनेक इलेक्ट्रॉनिक कंपन्या मार्केटमध्ये उत्तम फीचर्स असणाऱ्या स्मार्ट वॉच भारतात लाँच करत आहे. आता Google ने सुद्धा मार्केटमध्ये त्यांचे नवीन Smart Watch लाँच केले आहे.
Google Pixel Watch 4 आता अधिकृतपणे भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. ऑगस्टमध्ये Pixel 10 सिरीजसोबत लाँच केलेले हे लेटेस्ट स्मार्टवॉच आता गुगल इंडिया ऑनलाइन स्टोअर आणि फ्लिपकार्ट सारख्या प्लॅटफॉर्मवरून खरेदीसाठी उपलब्ध आहे. Pixel Watch 4 मध्ये स्नॅपड्रॅगन W5 Gen 2 चिप आहे, जो आर्म कॉर्टेक्स-M55 को-प्रोसेसरसह जोडलेला आहे. हे वॉच दोन आकारांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे: 41 मिमी आणि 45 मिमी. यात AMOLED डिस्प्ले आहे आणि कंपनीचा दावा आहे की ते एका चार्जवर 30 तासांपेक्षा जास्त बॅटरी लाइफ देते.
पैशांचा पाऊस कुठे? Instagram की YouTube? ‘या’ दोन प्लॅटफॉर्मवर कमाईचे गणित कसे चालते, समजून घ्या!
पिक्सेल वॉच 4 आता गुगल इंडिया ऑनलाइन स्टोअर आणि फ्लिपकार्टवरून खरेदीसाठी उपलब्ध आहे. 41 मिमी व्हेरिएंटची किंमत 39,900 रुपये आहे, तर 45 मिमी मॉडेलची किंमत 43,900 रुपये आहे. 41 मिमी मॉडेल आयरिस, लेमनग्रास, पोर्सिलेन आणि ऑब्सिडियन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, तर 45 मिमी प्रकार मूनस्टोन, पोर्सिलेन आणि ऑब्सिडियन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Pixel Watch 4 साठी नो-कॉस्ट EMI दरमहा 3,325 रुपयांपासून सुरू होतो, तर स्टँडर्ड ईएमआय 1,794 रुपयांपासून सुरू होतो. फ्लिपकार्ट ग्राहक एसबीआय क्रेडिट कार्ड आणि ईएमआय व्यवहारांवर 1,500 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकतात. अॅक्सिस बँक फ्लिपकार्ट डेबिट कार्ड वापरकर्ते 5% सूट (750 रुपयांपर्यंत) मिळवू शकतात.
Pixel Watch 4 मध्ये AMOLED LTPO डिस्प्ले असून तो DCI-P3, 60Hz रिफ्रेश रेट आणि 320ppi पिक्सेल डेन्सिटीला सपोर्ट करतो. डिस्प्लेवर 3D Corning Gorilla Glass 5 सेफ्टी आहे आणि पीक ब्राइटनेस 3000 नीट्स आहे. Always-On डिस्प्ले फीचरही मिळते.
iOS 26.1 Update: आयफोनचे लिक्विड ग्लास इफेक्ट कसा कराल Disable, स्टेप बाय स्टेप समजून घ्या गणित
हा स्मार्टवॉच Snapdragon W5 Gen 2 प्रोसेसर आणि Cortex-M55 को-प्रोसेसरवर चालते. कनेक्टिव्हिटीसाठी Bluetooth 6.0, GPS (Galileo, Glonass, BeiDou, QZSS), Wi-Fi 6, NFC आणि Ultra-wideband सपोर्ट आहे. ही वॉच Android 11 किंवा त्यावरील फोनसोबत Pixel Watch appमार्फत पेअर होते. हे वॉच Wear OS 6.0 वर चालते आणि यात 32GB eMMC स्टोरेज + 2GB SDRAM दिले आहे. हेल्थ फीचर्समध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO2, स्लीप ट्रॅकिंग, स्ट्रेस मॉनिटरिंग, तसेच काही प्रदेशांत ECG सुविधा आहे. स्किन टेम्परेचर व मेंस्ट्रुअल सायकल ट्रॅकिंग आणि 50+ एक्सरसाइज मोड्स उपलब्ध आहेत.