
Lava Play Max 5G: नवीन फोन, नवीन व्हाइब्स! 5000mAh बॅटरी आणि तगड्या फीचर्सनी सुसज्ज, किंमत 15 हजारांहून कमी
Lava Play Max 5G स्मार्टफोन 6GB आणि 8GB अशा दोन रॅम व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Lava Play Max 5G च्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 12,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच 8 जीबी रॅम व्हेरिअंट कंपनीने 14,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केले आहे. ग्राहकांना 15 हजारांहून कमी किंमतीत एक चांगला आणि तगडे फीचर्स असलेला स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर लावाने लाँच केलेला स्मार्टफोन एक चांगली निवड ठरू शकते. हा स्मार्टफोन कंपनीने डेक्कन ब्लॅक आणि हिमालयीन व्हाइट या दोन रंगात लाँच केला आहे. (फोटो सौजन्य – X)
Introducing Play Max 5G – Play To The Max🎮 Available at your nearest retail outlet.
Starting from 12,999 ✅ 2.5GHz MediaTek Dimensity 7300 Processor | 7,00,000+ AnTuTu Score
✅ 17.07cm (6.72″) FHD+ Flat Display | 120Hz Refresh Rate
✅ 6GB+6GB*/ 8GB+8GB* RAM | 128GB UFS 3.1 ROM pic.twitter.com/wSFjtrrxSF — Lava Mobiles (@LavaMobile) December 9, 2025
Lava Play Max 5G स्मार्टफोनमध्ये 6.72-इंचाचा फुल-HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. हा लेटेस्ट लाँच स्मार्टफोन MediaTek Dimensity 7300 SoC ने सुसज्ज आहे. जो 8GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 128GB च्या UFS 3.1 स्टोरेजला सपोर्ट करतो. लावाचा हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित आहे. कंपनीने लाँच केलेल्या या बजेट स्मार्टफोनमध्ये वर्चुअल रॅम फीचर देखील देण्यात आले आहेत. या फीचरच्या मदतीने फोनची रॅम 8GB पर्यंत वाढवली जाऊ शकते.
लावाच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये माइक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील दिला आहे, जो 1TB पर्यंत स्टोरेजला सपोर्ट करतो. फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं, या फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला आहे. या फोनचा रियर कॅमेरा इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलाइजेशनला सपोर्ट करतो. हा कॅमेरा 30fps वर 4K व्हिडीओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन IP54-रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये मल्टीटास्किंग आणि गेमिंग सेशनदरमन्यान अधिक चांगला परफॉर्मंस मिळावा यासाठी थर्मल मॅनेजमेंटसाठी Vapour Chamber कूलिंग सपोर्ट देण्यात आला आहे. लावाचं म्हणणं आहे की, या फोनवर COD Mobile, BGMI आणि Free Fire सारखे गेम्स अगदी सहज खेळू शकता. लेटेस्ट Lava Play Max 5G स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी देण्य़ात आली आहे. जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Ans: Lava ही एक भारतीय स्मार्टफोन कंपनी आहे, ज्याचे मुख्यालय नोएडा (भारत) येथे आहे.
Ans: किफायतशीर किंमत, मजबूत बिल्ड क्वालिटी, क्लीन सॉफ्टवेअर आणि भारतीय वापरकर्त्यांसाठी ऑप्टिमाइज्ड परफॉर्मन्स.
Ans: होय, Lava Blaze सीरिज आणि काही नवीन मॉडेल्स 5G सपोर्टसह येतात.