999 रुपयांमध्ये लाँच झाले हे ईयरफोन्स! तब्बल 40 तासांची बॅटरी लाईफ आणि असे आहेत खास फीचर्स, जाणून घ्या सविस्तर
तुम्ही नवीन ईअरफोन्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्याच्या काळात अनेक कंपन्या अनोख्या फीचर्ससह त्यांचे नवीन ईअरबड्स लाँच करत असतात. या सर्व ईअरफोन्सची किंमत प्रिमियम रेंजमध्ये असते. या सर्व महागड्या ईअरफोन्सच्या दुनियेत असे अनेक लोकं आहेत जे स्वस्त आणि बजेट ईअरफोन्स शोधत असतात. अशेच स्वस्त आणि बजेट ईअरफोन्स आता Lava ने लाँच केले आहेत.
Lava ने भारतात दोन नवीन ईअरबड्स लाँच केले आहेत. Lava Probuds Aria 911 TWS ईयरफोन्स आणि Probuds Wave 921 नेकबँड या नावाने लाँच करण्यात आले आहे. हे लेटेस्ट मॉडेल्स एनवायरमेंटल नॉइज कँसिलेशन (ENC) सह लाँच करण्यात आले आहे. Wave 921 IPX6 रेटेड आहे, जे वॉटर आणि स्वेट रेजिस्टेंस ऑफर करतो.
Lava Probuds Aria 911 ईयरबड्स आणि Probuds Wave 921 नेकबँडची स्पेशल लाँच किंमत 999 रुपये ठेवण्यात आली आहे. या नवीन इयरफोन्सची विक्री 25 ऑगस्टपासून Amazon आणि Lava च्या अधिकृत ई-स्टोअरवर सुरू होईल. (फोटो सौजन्य – X)
Lava Probuds Aria 911 आणि Probuds Wave 921 डुअल-टोन फिनिशसह लाँच करण्यात आले आहेत. Aria 911 TWS earphones स्टेम-स्टाइल डिजाइनमध्ये आणि ओवल चार्जिंग केससह लाँच करण्यात आले आहे. यामध्ये 35ms लो-लेटेंसी मोड आहे. ईयरफोन्स IPX4 रेटेड आहे जे घाम आणि हलक्या पाण्याच्या शिंपड्यांपासून संरक्षण करते. याउलट Lava Probuds Wave 921 नेकबँड एर्गोनॉमिक सिलिकॉन बॉडीसह लाँच करण्यात आले आहे. यामध्ये 50ms लेटेंसी आहे आणि जास्त ड्यूरेबल IPX6 रेटिंग मिळते.
दो्ही मॉडेल्स ब्लूटूथ 5.3 सपोर्ट करतात आणि 10mm ड्राइवर्ससह लाँच करण्यात आला आहे. यामध्ये ENC फीचर देखील आहे, ज्याला व्हॉईस कॉल क्लॅरिटी चांगली होती आणि बॅकग्राऊंड आवाज कमी करतात. Lava Probuds Aria 911 एकदा चार्ज केल्यानंतर 35 तासांचा टोटल प्लेबॅक ऑफर करतात. TWS इयरफोन्स जलद चार्जिंगला सपोर्ट करतात जे फक्त 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये सुमारे 150 मिनिटे वापरण्यास मदत करतात. यूजर्सना टच कंट्रोल आणि व्हॉइस असिस्टंट सपोर्ट देखील मिळतो.
तर Lava Probuds Wave 921 एकदा चार्ज केल्यानंतर 40 तासांचा प्लेबॅक ऑफर करतात. नेकबँड जलद चार्जिंगला देखील सपोर्ट करतो, जो फक्त 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 12 तासांचा प्ले टाइम देतो. यात ‘मॅग्नेटिक स्मार्ट डॅश’ स्विच फीचर आहे, जे कॉलिंग आणि मीडिया कंट्रोलसाठी इअरबड्स एकत्र जोडण्याची परवानगी देते. नेकबँडमध्ये ड्युअल पेअरिंग सपोर्ट आहे, ज्यामुळे ते एकाच वेळी दोन उपकरणांशी कनेक्ट होऊ शकते.