Lava Yuva Smart 2: देशी कंपनीचा स्वस्त Smartphone भारतात लाँच, किंमत केवळ 6,099 रुपये; जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
देशी कंपनी Lava नेहमीच त्यांच्या ग्राहकांसाठी स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन लाँच करत असते. हे असे स्मार्टफोन्स असतात, ज्यांची किंमत कमी असते पण त्यामध्ये फीचर्स दमदार असतात. कंपनीने आतापर्यंत त्यांच्या ग्राहकांसाठी अनेक बजेट स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. या स्मार्टफोन्सना ग्राहक नेहमीच पसंती दर्शवतात. याचं कारण म्हणजेच स्मार्टफोनच्या किंमती कमी असतात, पण स्मार्टफोनमधील फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबाबतीत कोणतीही तडजोड केली जात नाही.
आता देखील कंपनी असाच एक नवीन स्मार्टफोन घेऊन आली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच या स्मार्टफोनची किंमत 7 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. म्हणजेच स्वस्त स्मार्टफोनच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी Lava ने लाँच केलेला नवीन स्मार्टफोन बेस्ट डिव्हाईस ठरणार आहे. कंपनीने हा नवीन स्मार्टफोन Lava Yuva Smart 2 या नावाने लाँच केला आहे. (फोटो सौजन्य – X)
Lava Yuva Smart 2 हा नवीन बजेट स्मार्टफोन नोएडा बेस्ड टेक फर्मने भारतात लाँच केला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा एक एंट्री-लेवल स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन दोन रंगात लाँच करण्यात आला आहे. हा फोन ऑक्टा-कोर Unisoc चिपसेटने सुसज्ज आहे, ज्याला 3GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह जोडण्यात आले आहे. या डिव्हाईसमध्ये डुअल-रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, जो स्क्वायर कॅमेरा मॉड्यूलमध्ये देण्यात आला आहे. फोनमध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 10W वायर्ड चार्जिंग सपोर्ट देखील आहे. या स्मार्टफोनची विक्री भारतात कधी सुरु होणार आहे, याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही.
नवीन Lava Yuva Smart 2 स्मार्टफोन भारतात सिंगल 64GB ऑनबोर्ड स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या या व्हेरिअंटची किंमत 6,099 रुपये ठेवण्यात आली आहे. इंडियन टेक फर्मने हा स्मार्टफोन क्रिस्टल ब्लू आणि क्रिस्टल गोल्ड कलर ऑप्शन्समध्ये लाँच केला आहे. नोएडा बेस्ड कंपनीचे म्हणणं आहे की ते या हँडसेटसाठी संपूर्ण भारतात डोरस्टेप सर्विस ऑफर करणार आहे. तथापि, कंपनीने अद्याप Lava Yuva Smart 2 च्या उपलब्धतेची माहिती उघड केलेली नाही.
Lava Yuva Smart 2 हा लेटेस्ट हँडसेट Android 15 Go Edition वर आधारित आहे. यामध्ये 6.75-इंच टचस्क्रीन आहे, ज्यामध्ये HD+ रेजोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देखील देण्यात आला आहे. हा फोन ऑक्टा-कोर Unisoc 9863a चिपसेटने सुसज्ज आहे. नवीन Lava फोनमध्ये 3GB रॅम आहे, ज्याला वर्चुअल रॅम (अनयूज्ड स्टोरेजद्वारे) द्वारे 3GB पर्यंत वाढवले जाऊ शकते. यामध्ये 64GB चे बिल्ट-इन स्टोरेज देखील आहे.
फोटो आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Lava Yuva Smart 2 मध्ये पाठीमागे स्क्वेयर कॅमेरा मॉड्यूल आहे, ज्यामध्ये 13-मेगापिक्सेल AI डुअल-रियर कॅमेरा यूनिट आणि LED फ्लॅश देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या फ्रंटला 5-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी दिली आहे, जी 10W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये USB Type-C पोर्ट देखील आहे. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक सपोर्ट देखील आहे.