Lenovo चा नवा टॅब्लेट भारतात लाँच, 7040mAh बॅटरी आणि AI फीचर्सने सुसज्ज! 16,999 रुपयांपासून किंमत सुरु
टेक कंपनी Lenovo ने भारतात एक नवीन एंट्री-लेवल टॅब्लेट लाँच केला आहे. हा टॅब्लेट Lenovo Idea Tab या नावाने लाँच करण्यात आला आहे. या टॅब्लेटमध्ये MediaTek Dimensity 6300 चिपसेट आहे, जे 8GB रॅमसह जोडले आहे. या टॅब्लेटमध्ये 11-इंचाचा 2.5K डिस्प्ले आणि 90Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये 7,040mAh बॅटरी आहे. तसेच Lenovo Idea Tab मध्ये अनेक अनोखे फीचर्स देण्यात आले आहे. या टॅब्लेटची किंमत देखील बजेट रेंजमध्ये आहे.
Lenovo Idea Tab भारतात एकाच स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 8GB RAM + 256GB स्टोरेज याचा समावेश आहे. या व्हेरिअंटची किंमत 16,999 रुपये ठेवण्यात आली आहे. यामध्ये Wi-Fi कनेक्टिविटी आणि Lenovo Tab Pen देखील देण्यात आले आहे. Lenovo Tab Pen आणि 5G कनेक्टिविटीसह या टॅब्लेटची किंमत 19,999 रुपये आहे. हा टॅबलेट सध्या देशात लेनोवो इंडिया वेबसाइट आणि अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. तो ई-कॉमर्स वेबसाइटवर लुना ग्रे रंगात लिस्ट करण्यात आला आहे.(फोटो सौजन्य – Pinterest)
नवीन Lenovo Idea Tab हा Android 15 वर आधारित आहे, जो Lenovo च्या ZUI 17 OS वर बेस्ड आहे. या डिव्हाईसला 2029 पर्यंत दोन अँड्रॉइड ओएस अपग्रेड (अँड्रॉइड 17 पर्यंत) आणि चार वर्षांचे सुरक्षा पॅच मिळण्याची पुष्टी झाली आहे. Lenovo Idea Tab मध्ये 11-इंचाचा 2.5K (1,600×2,560 पिक्सेल) डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 90Hz का रिफ्रेश रेट, 16:10 चा एस्पेक्ट रेश्यो आणि 500nits ची पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे.
नवीन Lenovo Idea Tab हा MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरवर आधारित आहे. ज्यामध्ये 8GB चा LPDDR4x RAM आणि 256GB ची इनबिल्ट स्टोरेज देण्यात आली आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर या टॅब्लेटमध्ये 8-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच टॅब्लेटच्या फ्रंटला व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 5-मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे. टॅब्लेटमध्ये Dolby Atmos ट्यूनिंगसह क्वाड स्पीकर्स देखील देण्यात आले आहेत.
ब्लूटूथ हेडफोनमुळे वाढतोय कॅन्सरचा धोका? टेक फ्रेंडली युजर्समध्ये निर्माण झालाय गोंधळ! काय आहे सत्य?
Lenovo Idea Tab मध्ये कनेक्टिविटीसाठी Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac आणि Bluetooth 5.2 आहे. यामध्ये AI-बेस्ड फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यामध्ये Google च्या सर्कल टू सर्चचा देखील समावेश आहे. याशिवाय Lenovo च्या इन्स्टंट ट्रान्सलेट फीचरमुळे तुम्ही रिअल-टाइममध्ये टेक्स्ट ट्रान्सलेट करू शकता आणि हा टॅब लेनोवोच्या AI Notes फीचरला देखील सपोर्ट करतो.
Lenovo Idea Tab मध्ये 7,040mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की ही बॅटरी एकदा चार्ज केल्यावर 12 तासांपर्यंत प्लेबॅक वेळ देऊ शकते. हा टॅब पर्यायी कीबोर्ड, लेनोवो टॅब पेन आणि लेनोवो टॅब पेन प्लस (स्वतंत्रपणे खरेदी केलेला) सोबत देखील जोडता येतो. त्याचे वजन 480 ग्रॅम आहे.