
Lenovo Idea Tab Plus: 10000mAh बॅटरी आणि तगडा प्रोसेसर.... नव्या टॅब्लेटने भारतात घातलाय धुमाकूळ, फीचर्स जाणून घ्या
Lenovo Idea Tab Plus टॅब्लेट 8GB आणि 12GB या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. डिव्हाईसच्या 8GB रॅम + 256GB स्टोरेज या बेस व्हेरिअंटची किंमत 27999 रुपये आणि 12GB रॅम + 256GB स्टोरेज या दुसऱ्या व्हेरिअंटची किंमत 30,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 12GB रॅम मॉडेल ओनली वाय-फायसह देखील उपलब्ध आहे, ज्याची किंमत 27999 रुपये आहे. तिन्ही मॉडेलसह कंपनी बॉक्समध्ये Tab Pen स्टायलस देखील देत आहे. Lenovo Idea Tab Plus टॅब्लेटची प्री बुकींग भारतात सुरु झाली आहे. या डिव्हाईसची विक्री भारतात 22 डिसेंबरपासून होणार आहे. ग्राहक लेनोवो वेबसाइट आणि ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवरून या डिव्हाईसची खरेदी करू शकता. हा टॅब लूना ग्रे आणि क्लाउड ग्रे दो कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Lenovo )
Lenovo Idea Tab Plus टॅबमध्ये 12.1-इंच LCD स्क्रीन देण्यात आली आहे. याचे रेजोल्यूशन 2.5K आणि रिफ्रेश रेट 90Hz आहे. डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 800 निट्स आहे.
लेनोवोच्या या टॅबमध्ये MediaTek Dimensity 6400 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा टॅब्लेट 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजपर्यायासह लाँच करण्यात आला आहे. हे डिव्हाईस अँड्रॉईड 15 वर आधारित आहे.
Lenovo Idea Tab Plus मध्ये 13-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. यासोबतच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या डिव्हाईसमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
लेनोवोच्या या टॅबमध्ये Wi-Fi-ओनली व्हेरिअंट 802.11 a/b/g/n/ac Wi-Fi स्टेंडर्ड सपोर्ट दिला आहे. यासोबतच LTE मॉडेल वाय-फायसह 5G कनेक्टविटीला सपोर्ट करतो. हे टॅब Bluetooth 5.2 सह लाँच करण्यात आले आहे.
Lenovo Idea Tab Plus मध्ये 10,200mAh बॅटरी दिली आहे. यामध्ये Lenovo NotePad, Circle to Search, Gemini सारखे खास फीचर्स देण्यात आले आहेत.
Ans: Lenovo ही चीनमधील बहुराष्ट्रीय (Multinational) टेक कंपनी आहे.
Ans: Lenovo लॅपटॉप, डेस्कटॉप, टॅबलेट, स्मार्टफोन, सर्व्हर आणि स्मार्ट अॅक्सेसरीज तयार करते.
Ans: Lenovo चे लॅपटॉप मजबूत बिल्ड क्वालिटी, परफॉर्मन्स आणि बॅटरी बॅकअपसाठी ओळखले जातात.