Online Games Redeem Codes: गेमर्ससाठी खुशखबर! फ्री फायर मॅक्समध्ये Faded Wheel इव्हेंट लाईव्ह, फ्री रिवॉर्ड मिळवण्याची संधी
Tech Tips: 100% चार्ज केल्यानंतरही फोनची बॅटरी टिकत नाही? आजच बदला स्मार्टफोनमधील ‘या’ 5 सेटिंग्स
फ्री फायर मॅक्समध्ये फेडेड व्हिल ईव्हेंट सुरु झाला आहे. हा ईव्हेंट पुढील 17 दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे. हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे. यामध्ये तुम्हाला रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी स्पिन करावं लागणार आहे. ईव्हेंटमध्ये तुम्हाला सर्व आयटम्स जिंकण्यासाठी 8 वेळा स्पिन करावे लागणार आहे. प्रत्येक स्पिनसाठी प्लेअर्सना डायमंड्स खर्च करावे लागार आहेत.
ड्रीम डायव्ह फेडेड व्हिल ईव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 9 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. तर दुसऱ्यांदा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 19 डायमंड्स खर्च करावे लागणार आहे. तिसऱ्यांदा स्पिन करण्यासाठी 39 डायमंड्स आणि चौथ्यांदा स्पिन करण्यासाठी 69 डायमंड्स खर्च करावे लागणार आहे. पाचव्यांदा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 99 डायमंड्स, सहाव्यांदा स्पिन करण्यासाठी 149 डायमंड्स, सातव्यांदा स्पिन करण्यासाठी 199 डायमंड्स आणि आठव्यांदा स्पिन करण्यासाठी 499 डायमंड्स खर्च करावे लागणार आहे.






