India’s First AI City: हे शहर बनणार भारतातील पहिले ‘AI City’! सरकारने घेतला मोठा निर्णय, कोणते बदल होणार? जाणून घ्या
आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच AI चा वापर दिवसेंदिवस वाढला आहे. सध्याच्या काळात AI चा वापर आपल्या प्रत्येक कामासाठी केला जात आहे. भारतात देखील AI चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता लवकरच भारतातील पहिलं AI शहर बनवलं जाणार आहे. यासाठी सरकारद्वारे मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे. लखनौ हे भारतातील पहिलं AI सिटी बनणार आहे. या शहरांत आता अनेक बदल केले जाणार आहेत.
Google वर लीक झाले ChatGPT युजर्सचे पर्सनल चॅट! तुमच्या संभाषणाचाही समावेश आहे का? असं करा चेक
उत्तर प्रदेशाची राजधानी असलेले लखनौ शहर आता लवकरच देशातील पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) सिटी बनणार आहे. यासाठी तयारी सुरु करण्यात आली असून आता लवकरच हे स्वप्न सत्यात उतरणार आहे. केंद्र सरकारच्या इंडिया AI अभियानांतर्गत 2024 मध्ये या प्रकल्पाला 10,732 करोड रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशला भारताचे पुढील आयटी हब बनवण्याच्या दिशेने हे पाऊल टाकण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीद्वारे लखनौमध्ये 10,000 ग्राफिक्स प्रोसेसिंग यूनिट (GPU), मल्टी-मॉडल लँग्वेज मॉडल आणि एक अत्याधुनिक AI इनोवेशन सेंटरची स्थापना केली जाणार आहे. लवकरच राज्य सरकार व्हिजन 2047 लक्षात घेऊन एका व्यापक AI धोरणाचा मसुदा सादर करणार आहे. सरकारच्या मते, ही गुंतवणूक देशातील कोणत्याही टेक्नोलॉजी इंफ्रास्ट्रक्चरच्या तुलनेत 67% अधिक आहे.
लखनौमध्ये एक हाय-टेक AI-आधारित वाहतूक व्यवस्थापन प्रणाली लागू करण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संसदीय मतदारसंघ वाराणसी आधीच AI-सक्षम स्मार्ट वाहतूक प्रणालीसाठी काम करत आहे. आता या शर्यतीत लखनौ शहराचा देखील समावेश होणार आहे. थोडक्यात, असं मानलं जाऊ शकतं की, AI च्या शर्यतीत भारत प्रचंड प्रगती करत आहे. भारतातील AI चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
OPPO K13 टर्बो सीरीज ऑगस्टमध्ये होणार लाँच, मोबाईल गेमर्ससाठी वरदान ठरणार नवीन डिव्हाईस
मिळालेल्या माहिती माहितीनुसार, राज्याच्या प्रमुख ‘AI प्रज्ञा’ योजनेअंतर्गत, आतापर्यंत 10 लाखांहून अधिक तरुण, शिक्षक, गावप्रमुख, सरकारी कर्मचारी आणि शेतकऱ्यांना AI, मशीन लर्निंग, डेटा अॅनालिटिक्स आणि सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण Microsoft, Intel, Google आणि Guvi सारख्या आघाडीच्या टेक कंपन्यांच्या सहकार्याने दिले जात आहे.
आरोग्य क्षेत्रातही AI चा वापर वेगाने होत आहे. देशातील पहिले AI -आधारित ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग सेंटर फतेहपूर जिल्ह्यात स्थापन करण्यात आले आहे, जे महिलांना वेळेवर स्क्रीनिंग सुविधा पुरवत आहे. लखनऊमध्येही असेच अनेक बदल केले जाणार आहेत.
AI चा फुल फॉर्म काय आहे?
आर्टिफिशियल इंटेलिजेंस
आर्टिफिशियल इंटेलिजेंसला मराठीत काय म्हणतात?
कृत्रिम बुद्धिमत्ता
लखनौ AI सिटीसाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे?
10,732 करोड रुपये