
'मॅक'चा पंचविशीत पदार्पण आणि शिक्षणाचे नवे पर्व!
नवीन प्रोग्राम्स विद्यार्थ्यांना सर्जनशील शिक्षणाप्रती सर्वांगीण, भविष्य-केंद्रित दृष्टिकोन देण्याकरिता डिझाइन करण्यात आले आहेत, ज्यामध्ये मुलभूत अध्ययन, विशेषीकृत मार्गदर्शन आणि प्रगत करिअर मार्गांचा समावेश आहे. पहिल्यांदाच अकॅडमीने एव्हीजीसी उद्योगामधील गरजांना अनुसरून प्रोग्राम डिझाइन केला आहे, तसेच उद्योगामधील अनुभवी तज्ञांकडून अध्यापन केले जाण्याची देखील खात्री घेत आहे. मॅकने पोस्ट-प्रोडक्शन, स्टुडिओज, गेमिंग कंपन्या व मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या क्षेत्रांमध्ये हा उपक्रम अधिक उपयुक्त करण्यासाठी १३ नॉलेज सहयोगींसोबत सहयोग केला आहे. या सहयोगाला पुष्टी दिलेल्या कंपन्या आहेत सिम्प्रेस (व्हिसाप्रिंटची मूळ कंपनी), फिजिक्सवाला, गॉडस्पीड गेमिंग, पॉकेट फिल्म्स, फॅन्टमएफएक्स, रॉकेट सायन्स अॅनिमेशन, सेज प्रोडक्शन्स, पिक्सल अँड रेशिओ, रेझोनन्स डिजिटल एलएलपी, नीली गेम्स, मुगफी अँड झेबू अॅनिमेशन स्टुडिओज. तसेच, जगातील इमेजिंग तंत्रज्ञानांमध्ये अग्रणी कंपनी कॅनन क्रिएटर एक्स अभ्यासक्रम व अनुभवासाठी नॉलेज सहयोगी म्हणून मॅकसोबत ऑनबोर्ड झाली आहे.
एव्हीजीसी-एक्सआर (अॅनिमेशन, व्हीएफएक्स, गेमिंग, कॉमिक्स व एक्स्टेण्डेड रिअॅलिटी), डिजिटल कन्टेन्ट निर्मिती आणि इमर्सिव्ह मीडियामध्ये कुशल टॅलेंटसाठी मागणी वाढत असताना मॅकचा शैक्षणिक अध्ययन आणि उद्योग अपेक्षांमधील तफावत दूर करण्याचा मनसुबा आहे.
लाँचप्रसंगी मत व्यक्त करत अॅप्टेक लिमिटेडच्या ग्लोबल रिटेलचे पूर्ण-वेळ संचालक व चीफ बिझनेस ऑफिसर श्री. संदीप वेलिंग म्हणाले, ”आज क्रिएटिव्ह उद्योगामध्ये तंत्रज्ञानदृष्ट्या प्रबळ, अनुकूल आणि पहिल्या दिवसापासून योगदान देण्याची क्षमता असलेल्या टॅलेंटची आवश्यकता आहे. करिअर एक्स आणि क्रिएटर एक्स या गरजेची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत, जे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, अधिक विशेषीकृत माहिती आणि वास्तविक जीवनातील कामकाज पद्धतींचा अनुभव देतील. या प्रोग्राम्सचा कल्पकता व कथाकथन कौशल्यांना प्राधान्य देणारी मानसिकता विकसित करण्याचा मनसुबा आहे, जेथे ही कौशल्ये आजच्या सर्व क्रिएटर्ससाठी महत्त्वाची आहेत. विद्यार्थ्यांची स्टुडिओजमध्ये उच्च प्रगतीशील भूमिका मिळवण्याची इच्छा असो किंवा त्यांच्या स्वत:च्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करायच्या असोत, मॅकचे प्रोग्राम्स त्यांना यशस्वी होण्यास आवश्यक असलेली शिस्तबद्धता, उद्योग-संबंधित व भविष्याकरिता सुसज्ज कौशल्यांसह सक्षम करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत.”
हे प्रोग्राम्स प्रत्यक्ष, उद्योग-संबंधित अध्ययन अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत, जे मॅकच्या विद्यार्थ्यांना वास्तविक विश्वातील निर्मिती पद्धतींबाबत ज्ञान देतात. निवडक करिअर कोर्सेसमध्ये उपलब्ध असलेल्या या प्रोग्राम्समध्ये मॅकचे विद्यार्थी कोर्सच्या सुरूवातीला त्यांचे नियमित कोर्स मॉड्यूल म्हणजेच करिअर-केंद्रित अध्ययन सुरू ठेवू शकतात.
मुलभूत बाबी स्पष्ट झाल्यानंतर इच्छुक व महत्त्वाकांक्षी विद्यार्थी करिअर-एक्स प्रोग्राम घेऊ शकतात, जो अद्वितीय उद्योग-एकीकृत व विद्यार्थी केंद्रित अध्ययन मार्ग म्हणून डिझाइन करण्यात आला आहे आणि डिजिटल क्रिएटर्सच्या भावी पिढीला झपाट्याने विकसित होत असलेल्या क्रिएटर इकॉनॉमीसाठी सुसज्ज करतो. आघाडीचे तंत्रज्ञान सहयोगी, कन्टेन्ट प्लॅटफॉर्म्स, फिल्ममेकर समुदाय आणि क्रिएटर नेटवर्क्ससोबत सहयोगाने डिझाइन करण्यात आलेला हा प्रोग्राम विद्यार्थ्यांना कौशल्ये, टूल्स व उद्योग अनुभवासह सक्षम करतो, जे विविध फॉर्मेट्समध्ये कन्टेन्टची संकल्पना डिझाइन, निर्माण, प्रकाशित करण्यासाठी आणि त्यामधून उत्पन्न मिळवण्यासाठी आवश्यक आहेत.
क्रिएटरएक्सचा तरूण कथाकारांना प्रोडक्शन-सुसज्ज क्रिएटर्स बनण्यास सक्षम करण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे ते शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ, डिजिटल कॉमिक्स, एआय-सक्षम कामकाज पद्धती आणि विविध प्लॅटफॉर्मवरील प्रकाशानामध्ये कुशल होतील, तसेच ब्रँडिंग, उत्पन्न, आयपी अधिकार आणि जबाबदारीने निर्मिती याबाबत त्यांचे ज्ञान अधिक प्रगत होईल. सर्जनशील शिक्षणासह वास्तविक उद्योगामध्ये संधी निर्माण करत क्रिएटरएक्सचा आत्मविश्वासपूर्ण, भविष्यासाठी सुसज्ज क्रिएटर्स घडवण्याचा मनसुबा आहे, जे भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्या डिजिटल कन्टेन्ट व क्रिएटर परिसंस्थेमध्ये अर्थपूर्णपणे योगदान देऊ शकतात.
प्रत्यक्षात, मॅक विद्यार्थ्यांना या सर्वोत्तम दृष्टिकोनाव्यतिरिक्त दोन स्पष्ट अध्ययन निष्पत्तींसह सक्षम करत आहे. करिअर एक्सच्या माध्यमातून विद्यार्थी कोर्स सुरू ठेवू शकतात, ज्यानंतर उत्तम करिअर संधी मिळू शकतात. तसेच, इच्छुक विद्यार्थी भविष्यात उद्योजक किंवा कन्टेन्ट क्रिएटर बनण्याची महत्त्वाकांक्षा असल्यास क्रिएटर एक्स प्रोग्राममध्ये देखील नोंदणी करू शकतात.
मॅकच्या २५व्या वर्धापन दिनानिमित्त, तसेच २४एफपीएस क्रिएटर फेस्टच्या निमित्ताने लाँच करण्यात आलेले हे नवीन प्रोग्राम्स संस्थेच्या विद्यार्थ्यांना क्रिएटिव्ह व डिजिटल-केंद्रित व्यवसायांच्या नवीन युगासाठी सक्षम करण्याप्रती कटिबद्धतेमधील मोठे पाऊल आहे.
”मॅक भारतात क्रिएटिव्ही शिक्षणामध्ये परिवर्तन घडवून आणण्यात नेहमी आघाडीवर आहे. करिअरएक्स आणि आमच्या नवीन क्रिएटरएक्स प्रोग्रामसह आम्ही भविष्यासाठी सुसज्ज परिसंस्था घडवत आहोत, जी विद्यार्थ्यांना एव्हीजीसी-एक्सआर उद्योगासाठी, तसेच झपाट्याने उदयास येत असलेल्या क्रिएटर इकॉनॉमीसाठी सुसज्ज करते. आमचा क्रिएटरएक्स प्रोग्राम अद्वितीय उपक्रम आहे, जो झपाट्याने विकसित होत असलेल्या क्रिएटर इकॉनॉमीमध्ये यशस्वी होण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या तरूण क्रिएटर्ससाठी लाँचपॅड म्हणून डिझाइन करण्यात आला आहे. तसेच, एव्हीजीसी-एक्सआर उद्योागासाठी टॅलेंटला निपुण करणाऱ्या करिअरएक्स प्रोग्रामसोबत क्रिएटरएक्स विद्यार्थ्यांना वास्तविक विश्वातील प्रोडक्शन कौशल्ये, एआय-संचालित कामकाज पद्धती आणि त्यांचे कन्टेन्ट प्रकाशित करून त्यामधून उत्पन्न मिळवण्याच्या संधीसह सक्षम करतो. एकत्रित, हे दोन्ही प्रोग्राम्स दूरगामी परिसंस्था निर्माण करतात, जी विद्यार्थ्यांना डिजिटल करिअरच्या भावी दशकासाठी सुसज्ज करते,” असे अॅप्टेक लिमिटेडमधील कन्टेन्ट, अकॅडेमिक्स अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी उपाध्यक्ष श्री. अबीर ऐच म्हणाले.
मॅक आपले रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना यशस्वीरित्या लाँच करण्यात आलेले हे प्रोग्राम्स त्यांच्या वारसामधील महत्वपूर्ण अध्याय आहेत. एकत्रित, करिअर एक्स आणि क्रिएटर एक्स भारतातील सर्जनशील टॅलेंटवर्गासाठी संधींचा विस्तार करण्याप्रती आणि जागतिक एव्हीजीसी-एक्सआर पॉवरहाऊस म्हणून देशाला पुढे नेण्याला पाठिंबा देण्याप्रती मॅकचे मिशन अधिक दृढ करतात.
संरचना, नाविन्यता व उद्योगाशी संलग्नतेला प्राधान्य देत मॅकने क्रिएटर्सना निपुण करण्याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ केली, जे रोजगारासोबत भविष्यासाठी सुसज्ज असतील, तसेच स्टुडिओज, डिजिटल प्लॅटफॉर्म्स, स्वतंत्र उद्यम आणि उद्योजकता प्रवासामध्ये यशस्वी होण्यासाठी सक्षम असतील. या नवीन प्रोग्राम्सच्या माध्यमातून मॅकने क्रिएटिव्ह टॅलेंटला अधिक निपुण करण्यासाठी आणि जागतिक मीडिया व मनोरंजन परिसंस्थेत भारताच्या वाढत्या भूमिकेमध्ये योगदान देण्यासाठी आपले मिशन सुरू ठेवले आहे.