Made by Google 2025: अवघे काही दिवस शिल्लक! गुगल ईव्हेंटची तयारी सुरु, लाँच होणाऱ्या डिव्हाईसची यादी आली समोर!
टेक जायंट कंपनी गुगलच्या आगामी ईव्हेंटबाबत सतत नवीन अपडेट्स समोर आले आहेत. हा ईव्हेंट पुढील आठवड्यात आयोजित केला जाणार आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच त्यांच्या बहुप्रतिक्षित मेड बाय गूगल 2025 ईव्हेंटची घोषणा केली आहे. या ईव्हेंटची तारीख देखील जाहिर करण्यात आली आहे. या ईव्हेंटमध्ये कोणते डिव्हाईस लाँच केले जाणार, याबाबत देखील माहिती समोर आली आहे. अनेकांना आता या आगामी ईव्हेंटबाबत उत्सुकता लागली आहे. या ईव्हेंटबाबत काही अपडेट्स समोर आले आहेत, त्याबाबत आता जाणून घेऊया.
गुगलचा आगामी मेड बाय गुगल 2025 पुढील आठवड्यात म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी आयोजित केला जाणार आहे. हा ईव्हेंट न्यूयॉर्क शहरात आयोजित केला जाणार आहे. गुगलच्या या ईव्हेंटमध्ये अनेक नवीन गॅझेट्स लाँच केले जाणार आहेत, ज्यामध्ये स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि वायरलेस ईयरबड्ससह पिक्सेल फोल्डचा देखील समावेश असणार आहे. तथापि, दरवेळी प्रमाणे, यावेळीही सर्वांचे लक्ष नेक्स्ट GEN पिक्सेल डिव्हाइसवर असेल, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा ईव्हेंट कधी होणार आहे, तुम्ही तो लाईव्ह कसा पाहू शकता आणि गुगल कोणते सरप्राईज घेऊन येत आहे याबद्दलची माहिती आता आम्ही तुम्ही देणार आहोत. (फोटो सौजन्य – X)
गुगलचा हा मेगा ईव्हेंट 20 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता आयोजित केला जाणार आहे. गुगल त्यांच्या अधिकृत YouTube चॅनेलवर या ईव्हेंटचे लाईव्ह स्ट्रीमिंग करेल, जेणेकरून तुम्ही घरबसल्या या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकाल. तुम्ही पिक्सेल फोनचे चाहते असाल किंवा फक्त नवीनतम गॅझेट्सबद्दल जाणून घेण्याची तुमची इच्छा असेल तर हा मेड बाय गूगल 2025 ईव्हेंट मिस करू नका.
रिपोर्ट्सनुसार हा मेगा ईव्हेंट 20 ऑगस्ट रोजी आयोजित केला जाणार असून या ईव्हेंटमध्ये सर्वात आधी पिक्सेल 10 सीरीज लाँच केली जाऊ शकते. या सिरीजमध्ये 4 मॉडेल्स लाँच केले जाण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये पिक्सेल 10, पिक्सल 10 प्रो, पिक्सेल 10 प्रो XL आणि फोल्डेबल पिक्सेल 10 प्रो फोल्ड यांचा समावेश असणार आहे. या सर्व डिव्हाईसमध्ये गुगलची पावरफुल Tensor G5 चिप असणार आहे.
याशिवाय या गुगल ईव्हेंटमध्ये Google पिक्सेल वॉच 4 देखील लाँच केली जाऊ शकते. हे स्मार्टवॉच दोन आकारात येईल आणि मागील मॉडेल्सपेक्षा चांगले बॅटरी लाइफ देऊ शकेल. इतकेच नाही तर या कार्यक्रमात पिक्सेल बड्स 2a देखील लाँच केले जाऊ शकते. या बड्समध्ये एक विशेष चार्जिंग सिस्टम देखील आढळू शकते. असे मानले जाते की ते अॅपलच्या मॅगसेफसारखेच काम करेल.