महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी 'Facebook'ही सज्ज, मतदानासाठी करतंय आवाहन, तुम्हालाही आलाय का असा मेसेज
20 नोव्हेंबर रोजी आज महाराष्ट्रात विधनसभा निवडणूक 2024 साठी मतदान पार पडणार आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदानालाा सुरुवात झाली आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाचा कालावधी आहे. अनेक नेते, खेळाडू, कलाकारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच त्यांनी मतदांराना आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन देखील केलं आहे. आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सोशल मिडीया प्लॅटफॉर्म फेसबूक देखील सज्ज झाले आहे. फेसबूकने देखील महाराष्ट्रातील मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्याचंं आवाहन केलं आहे.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
अनेक फेसबूक युजर्सना त्यांच्या अकाऊंटवर एक मॅसेज आला आहे. ज्यामध्ये मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन करण्यात आले आहे. तसेच फेसबुकच्या या मॅसेजवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया देखील दिली आहे. फेसबुकने केलेल्या या मॅसेजमध्ये म्हटलं आहे की, आज 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीविषयी अधिकृत माहिती मिळवा. इतर मतदारांना प्रेरित करण्यासाठी हा मॅसेज शेअर करा. नेते, खेळाडू, कालाकारांसोबतच आता फेसबूकने देखील युजर्सना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे. (फोटो सौजन्य – फेसबुक)
फेसबुक युजर्स हा मॅसेज त्यांच्या फीडवर शेअर करून शकतात. जेणेकरून ते महाराष्ट्रातील इतर लोकांना मतदान करण्यासाठी आवाहन करू शकतील. हा मॅसेज आतापर्यंत 63,487 लोकांनी त्यांच्या फीडवर शेअर केला आहे. महाराष्ट्रात मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. तसेच अनेक नेतेमंडळी, कलाकार, खेळाडू मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करत आहेत. आता यामध्ये मेटाच्या मालकीच्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्म फेसबूकने देखील सहभाग घेतला आहे. फेसबुकवर महाराष्ट्रात विधनसभा निवडणूक 2024 च्या मतदानासाठी जनजागृती केली जात आहे.
आज सकाळी 7 वाजता महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. महायुती (भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती) आणि महाविकास आघाडी (काँग्रेस, शिवसेना – यूबीटी आणि राष्ट्रवादी-एससीपी यांची युती) यांच्यातील राजकीय लढतीच्या निर्णयासाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे. या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.
निवडणुकीसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील सर्व जागांसाठी मतदान होणार आहे. राज्यातील मतदारांनी त्यात पूर्ण उत्साहाने सहभागी होऊन लोकशाहीच्या सणाचे सौंदर्य वाढवावे, असे आवाहन मी करतो. यावेळी सर्व तरुण व महिला मतदारांनी उत्साहाने मतदान करावे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांची पत्नी अमृता फडणवीस आणि आई सरिता फडणवीस यांनी नागपुरातील मतदान केंद्रावर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला.