Black Friday Sale: भारतात पहिल्यांदाच सुरू झालाय ब्लॅक फ्रायडे सेल, मिळणार धमाकेदार डिस्काउंट
गेल्या काही वर्षांत ब्लॅक फ्रायडे सेलची विक्री भारतात खूप लोकप्रिय झाली आहे. ब्लॅक फ्रायडे शॉपिंगने अमेरिकेत हॉलिडे सीजन सुरू होतो. ब्लॅक फ्रायडे विक्री नोव्हेंबरच्या चौथ्या गुरुवारी सुरू होते. अमेरिकेतून सुरू झालेला हा शॉपिंग इव्हेंट आता हळूहळू जगभरात लोकप्रिय होताना पाहायला मिळत आहे. भारतातही या निमित्ताने ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरमध्ये आकर्षक डिस्काउंट दिलं जाणार आहेत.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
ब्लॅक फ्रायडे सेल दरम्यान, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ऑफर सुरू करण्यात आल्या आहेत. यापूर्वी ब्लॅक फ्रायडे सेलचा कालावधी केवळ एका दिवसाचा होता. म्हणजेच ब्लॅक फ्रायडे केवळ एक दिवसाचा असायचा. आता गेल्या काही वर्षांत या विक्रीचा कालावधी वाढला आहे. अनेक किरकोळ प्लॅटफॉर्मने अनेक दिवस आधीच डील ऑफर करणे सुरू केले आहे. येत्या काही दिवसांत ॲमेझॉनवर ब्लॅक फ्रायडे सेल सुरू होणार आहे. या सेलमधे ग्राहकाना प्रचंड फायदा होणार आहे. तसेच सेलमध्ये अनेक वस्तू कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
भारतात प्रथमच ॲमेझॉनवर ब्लॅक फ्रायडे सेल सुरू होणार आहे. हा शॉपिंग फेस्टिव्हल सेल 29 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याचं सांगितलं जातं आहे, तर जागतिक बाजारपेठेत हा सेल 3 डिसेंबरपर्यंत लाइव्ह असू शकतो. सेलमध्ये, Flipkart, Amazon India आणि Tata Cliq इलेक्ट्रॉनिक्सवर फॅशन, होम अप्लायन्सेस आणि इतर कटेगरिमधील प्रॉडक्ट्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट दिलं जाणार आहे.
सेलमध्ये ऑडिओ गियर बोट, जेबीएल आणि सोनीच्या प्रॉडक्ट्सवर 65 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देण्यात येणार आहे, यासोबतच सॅमसंग आणि डेल ब्रँडचे लॅपटॉप्स 50 टक्के डिस्काउंट देऊन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. विक्रीमध्ये खरेदी करताना, तुम्हाला डीलवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. कारण लवकरात लवकर खरेदी करण्याची लोकांमध्ये स्पर्धा असेल. त्यामुळे, विक्री सुरू होण्यापूर्वीच, तुम्हाला काय खरेदी करायचे आहे आणि काय नाही हे ठरवावे लागेल. तसेच कोणत्या ब्रँडचे प्रॉडक्ट्स खरेदी करायचे आहेत, हे देखील ठरवावे लागणार आहे. एकूणच तुम्हाला शॉपिंग करण्यापूर्वी संपूर्ण प्लॅनिंग करावी लागणार आहे.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
गेल्या काही वर्षांत ब्लॅक फ्रायडे सेल भारतासारख्या देशांमध्ये लोकप्रिय झाला असेल, परंतु त्याचा इतिहास अनेक वर्षांपूर्वीचा आहे. हा शब्द 1960-70 च्या दशकात वापरला गेला. मग एक वेळ अशी आली जेव्हा स्टोअर्सने ‘बिग फ्रायडे’ या टॅगलाइनसह वस्तू विकण्यास सुरुवात केली आणि येथून ट्रेंड सुरू झाला.