
Meta वर लागला मोठा आरोप! AI ला ट्रेन करण्यासाठी अश्लील व्हिडीओंचा होतोय वापर? काय आहे सत्य? जाणून घ्या
जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या Meta वर आता एक मोठा आरोप लावण्यात आला आहे. एक एडल्ट फिल्म स्टूडियो Strike 3 Holdings ने Meta विरोधात खटला दाखल केला आहे. यामध्ये असा आरोप लावण्यात आला आहे की, कंपनीने गुपचूप हजारो अश्लील व्हिडीओ डाऊनलोड केले आणि याचा वापर AI सिस्टमला ट्रेन करण्यासाठी करण्यात आला आहे. या आरोपामुळे सर्वजण चकित झाले आहेत. याशिवाय AI कंपन्या डेटा मिळविण्यासाठी नैतिक मर्यादा ओलांडत आहेत का याबद्दल देखील प्रश्न उपस्थित केले जात आहे.
रिपोर्ट्समध्ये असं सांगण्यात आलं आहे की, Strike 3 Holdings चे म्हणणे आहे की, कंपनीला आढळले की त्यांचे कॉपीराइट केलेले एडल्ट व्हिडिओ Meta शी संबंधित IP अॅड्रेसवरून बिटटोरेंट नेटवर्कद्वारे डाउनलोड केले जात आहेत. स्टूडिओने असा दावा केला आहे की, हे डाउनलोडिंग 2018 पासून सुरु झाले होते. तेव्हा Meta ने त्यांच्या AI रिसर्च प्रोजेक्ट्सचे अधिकृतपणे सुरुवात देखील केली नव्हती. (फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीने असे आरोप केले आहेत की, व्हिडीओचा वापर Meta च्या Movie Gen नावाच्या AI व्हिडीओ जेनरेटर आणि LLaMA लँग्वेज मॉडेलला ट्रेन करण्यासाठी केला गेला होता. स्टूडिओने न्यायालयात 350 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 2,900 करोडचा नुकसान भरपाईचा दावा केला आहे. यासोबतच असं देखील सांगितलं आहे की, Meta ने हे सर्व एका गुप्त नेटवर्कद्वारे केले ज्यामध्ये 2500 हून अधिक IP एड्रेसचा समावेश होता.
Meta ने एडल्ट फिल्म स्टूडियो Strike 3 Holdings ने केलेल्या सर्व आरोपांना उत्तर दिलं आहे आणि कंपनीने हे सर्व आरोप नाकारले आहेत. कंपनीने सांगितलं आहे की, Strike 3 ने केलेले आरोप निराधार, हास्यास्पद आणि केवळ अनुमानांवर आधारित आहेत. Meta ने अमेरिकन न्यायालयाला हा खटला रद्द करण्याची विनंती केली आहे. तसेच कंपनीने असं देखील म्हटलं आहे की, असा कोणताही मजबूत पुरावा नाही, ज्यामुळे हे सिद्ध केले जाईल की कंपनीने एडल्ट कंटेंटचा वापर करून त्यांच्या AI मॉडेल्सना ट्रेनिंग दिली आहे.
Meta च्या प्रवक्त्याने असं सांगितलं आहे की, कंपनीच्या Terms of Service मध्ये असं स्पष्टपणे लिहीण्यात आले आहे की, कोणत्याही अश्लील किंवा एडल्ट कंटेंटचा वापर प्रोजेक्टमध्ये केला जाऊ शकत नाही. Meta ने असं देखील नमूद केलं आहे की, जर कोणत्या नेटवर्कवरून असा कोणताही कंटेट डाऊनलोड झाला असेल तर ही एखाद्या वैयक्तिक कर्मचाऱ्याची वागणूक असू शकते, कंपनीची नाही. Meta ने स्पष्टपणे सांगितलं आहे की, कोणत्याही कर्मचाऱ्याला असे व्हिडीओ डाऊनलोड करण्याची किंवा रिसर्चसाठी त्यांचा वापर करण्याची परवानगी नाही.
Tech Tips: Megapixel नक्की काय असतं? चांगल्या फोटोसाठी खरंच गरजेचं आहे का? जाणून घ्या सविस्तर
Meta ने सांगितलं आहे की, Strike 3 ने केलेला दावा टेक्निकल पद्धतीने शक्य नाही. कारण कंपनीने त्यांच्या मोठ्या AI प्रोजेक्ट्स ची सुरुवात 2022 मध्ये केली होती. मात्र आरोप 2018 संबंधित आहेत. यामुळे स्टूडिओने केलेल्या दाव्यांना काहीच आधार नाही, हे स्पष्ट होत आहे. तर Strike 3 Holdings चं म्हणणं आहे की, Meta ने कंपनीच्या सुमारे 2400 अवॉर्ड-विनिंग चित्रपटांचा वापर Movie Gen सारख्या मॉडेल्सना ट्रेन करण्यासाठी केला आहे. या आरोपांत उत्तर देत Meta ने स्टुडिओला कॉपीराइट ट्रोल म्हटले जे त्यांच्या मागील प्रकरणांमध्येून मोठ्या रकमा काढण्यासाठी खोटे दावे करते.
Meta AI म्हणजे काय आणि ते कसे काम करते?
Meta AI हे Meta (Facebook ची मूळ कंपनी) यांनी विकसित केलेले एक Artificial Intelligence सिस्टम आहे. हे ChatGPT सारखेच आहे, जे मजकूर तयार करणे, प्रश्नांची उत्तरे देणे, प्रतिमा तयार करणे आणि वापरकर्त्याशी संवाद साधणे यासाठी वापरले जाते.
Meta AI कोणत्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे? (Facebook, Instagram, WhatsApp इ.)
Meta AI सध्या Facebook, Instagram, Messenger आणि WhatsApp मध्ये थेट इंटिग्रेट केलेले आहे, तसेच वेब ब्राउझरवर meta.ai या साइटवरही उपलब्ध आहे.
Meta AI आणि ChatGPT मध्ये काय फरक आहे?
ChatGPT हे OpenAI चे उत्पादन आहे, तर Meta AI हे Meta कंपनीचे. ChatGPT “GPT-4/5” मॉडेलवर चालते, आणि Meta AI “Llama 3” नावाच्या AI मॉडेलवर आधारित आहे.
Meta AI मोफत वापरता येते का?
होय, Meta AI सध्या पूर्णपणे मोफत आहे. Facebook, Instagram किंवा WhatsApp वर तुम्ही ते कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय वापरू शकता.