Tech Tips: Megapixel नक्की काय असतं? चांगल्या फोटोसाठी खरंच गरजेचं आहे का? जाणून घ्या सविस्तर
स्मार्टफोन खरेदी करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असते कॅमेरा. जर तुम्ही देखील स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याने फोटोग्राफी करत असाल तर तुम्ही देखील मेगापिक्सेलचं नाव नक्कीच ऐकलं असेल. कारण फोटोग्राफीसाठी स्मार्टफोन कॅमेऱ्याचा मेगापिक्सेल अत्यंत गरजेचा असतो. पण मेगापिक्सेल नक्की काय असतो आणि फोटोग्राफीसाठी मेगापिक्सेल किती गरजेचं आहे, याबाबत अनेकांना माहिती नाही. आता आम्ही तुम्हाला मेगापिक्सेल नक्की काय असतं, याबाबत सविस्तरपणे सांगणार आहोत.
एक मेगापिक्सेल म्हणजे 10 लाख पिक्सेल. पिक्सेल म्हणजे खूप छोटे-छोटे रंगीत स्क्वेयर असतात. हे छोटे-छोटे रंगीत स्क्वेयर मिळून एक डिजिटल फोटो तयार होतो. जेव्हा तुम्ही एखादा फोटो क्लिक करता तेव्हा कॅमेरा अनेक लाख पिक्सेल कॅप्चर करतो, हे सर्व पिक्सेल एका ग्रिडमध्ये अरेंज करतो. ही संपूर्ण प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर एक फोटो तयार होतो. जेव्हा तुम्ही एखादा फोटो खूप झूम करता तेव्हा तुम्हाला त्या फोटोमध्ये छोटे-छोटे स्क्वेयर पाहायला मिळतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
अनेक लोकांचं असं मत असतं की, चांगली क्वालिटी आणि शार्प इमेजसाठी जास्त मेगापिक्सेल असलेला कॅमेरा असणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र असं गरेजचं नाही. जास्त मेगापिक्सेलवाला सेंसर जास्त डिटेल्स कॅप्चर करतो, ज्यामुळे मोठे प्रिंट किंवा क्रॉपिंगवेळी कोणतीही समस्या येत नाही. मात्र इमेज क्वालिटीसाठी केवळ मेगापिक्सेलच गरजेचा नसतो. लेंस क्वालिटी, सेंसरची साइज, लाइटिंग आणि कॅमेरा सॉफ्टवेयर इत्यादी सर्व गोष्टी मिळून इमेज क्वालिटी ठरते. कमी पिक्सेल असलेला चांगल्या दर्जाचा सेन्सर देखील उत्तम प्रतिमा कॅप्चर करू शकतो.
जर तुम्हाला एखाद्या ईमेजची मोठी प्रिंट घ्यायची असेल किंवा एखादा फोटो क्रॉप करून त्याचा केवळ छोटा भाग वापरायचा असेल, तर अशा परिस्थितीत जास्त मेगापिक्सेलची गरज पडते. त्यामुळे फॅशन आणि प्रोडक्ट फोटोग्राफर हाय-रेजॉल्यूशन म्हणजेच जास्त मेगापिक्सेल असलेला कॅमेरा वापरतात.
थोडक्यात फोटोग्राफीसाठी मेगापिक्सेल गरजेचा असतो. पण चांगल्या फोटोसाठी केवळ मेगापिक्सेलच गरजेचा नसतो. याशिवाय इतर गोष्टी देखील महत्त्वाच्या असतात. ज्यामध्ये लेंस क्वालिटी, सेंसरची साइज, लाइटिंग आणि कॅमेरा सॉफ्टवेयर इत्यादींचा समावेश असतो. त्यामुळे जर तुम्ही फोटोग्राफीसाठी स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल अशावेळी केवळ मेगापिक्सेल पाहणं गरजेचं नसतं. इतर गोष्टी देखील पाहणं गरेजचं असतं.
स्मार्टफोनचा कॅमेरा किती मेगापिक्सेलचा असावा?
मेगापिक्सेल जितके जास्त तितका फोटो शार्प मिळतो, पण लेन्स क्वालिटी आणि सेन्सर साईझ जास्त महत्त्वाची असते. 12MP ते 50MP दरम्यान कॅमेरा उत्तम समजला जातो.
OIS आणि EIS यात काय फरक आहे?
OIS (Optical Image Stabilization) म्हणजे लेन्स हालचाल कमी करून फोटो स्थिर ठेवतो, तर EIS (Electronic Image Stabilization) हे सॉफ्टवेअरच्या मदतीने व्हिडिओ स्थिर ठेवते.
HDR मोड म्हणजे काय?
HDR (High Dynamic Range) मोड फोटोमधील उजेड आणि सावलीचा समतोल राखतो, ज्यामुळे फोटो अधिक नैसर्गिक दिसतो.
AI Camera म्हणजे काय?
AI कॅमेरा सीन ओळखून ऑटोमॅटिक कलर, लाइट आणि कॉन्ट्रास्ट अॅडजस्ट करतो, जेणेकरून फोटो अधिक परफेक्ट मिळतो.






