Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात iPhone चा कहर! जगातील तिसरं सर्वात मोठं मार्केट बनला देश, या मॉडेल्सना मिळतोय जबरदस्त प्रतिसाद

आयफोनच्या खरेदीसाठी भारत जगातील तिसरं सर्वात मोठं मार्केट बनला आहे. यावरून सिद्ध होत आहे की, भारतीयांची आयफोनसाठी असलेली क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. या रिपोर्टने सर्वांनाच हैराण केलं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 05, 2025 | 08:46 AM
भारतात iPhone चा कहर! जगातील तिसरं सर्वात मोठं मार्केट बनला देश, या मॉडेल्सना मिळतोय जबरदस्त प्रतिसाद

भारतात iPhone चा कहर! जगातील तिसरं सर्वात मोठं मार्केट बनला देश, या मॉडेल्सना मिळतोय जबरदस्त प्रतिसाद

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतातील आयफोनच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ
  • iPhone विक्रीत भारत जगात तिसऱ्या स्थानी
  • Apple साठी भारत ठरला ‘गोल्डन मार्केट’!

भारतात आयफोनची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. आयफोन लाँच झाल्यानंतर त्याची खरेदी करण्यासाठी अ‍ॅपल स्टोअर बाहेर लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे आयफोनच्या भारतातील विक्रीला काही तोड नाही. आता नुकताच एक अहवाल समोर आला आहे. हा अहवाल वाचून सर्वचजण चकित झाले आहेत.

REDMAGIC च्या नव्या स्मार्टफोनची ग्लोबल मार्केटमध्ये झाली एंट्री, 50MP कॅमेरा आणि 5G सपोर्टने सुसज्ज… इतकी आहे किंमत

भारतातील स्मार्टफोन बाजारपेठेत वाढ

अहवालात असं सांगण्यात आलं आहे की, जुलै – सप्टेंबर या तिमाहित भारतातील स्मार्टफोन बाजारपेठ आकारमानात 5 टक्के आणि मूल्यात 18 टक्के वाढ झाली. तर याचवेळी आयफोन पहिल्यांदाच भारतातील विक्रीबाबतीत टॉप 5 स्मार्टफोन ब्रँडमध्ये समाविष्ट झाला आहे. त्यामुळे आता भारत जगातील तिसरे मोठे आयफोन मार्केट बनले आहे. काउंटरपाइंट रिसर्च रिपोर्टनुसार, ही वाढ सणांमधील मागणी, आकर्षक सूट आणि प्रिमियम फोनमधील वाढत्या आवडीमुळे झाली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करण्याला ग्राहकांचे प्राधान्य

रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, बाजाराचे लक्ष आता व्हॉल्यूम वाढीपासून मूल्य वाढीकडे वळत आहे आणि याचे एक प्रमुख कारण म्हणजे ग्राहक उच्च दर्जाचे स्मार्टफोन खरेदी करण्याला पूर्वीपेक्षा अधिक प्राधान्य देत आहेत. तसेच असं देखील सांगितलं जात आहे की, किरकोळ महागाई कमी झाल्याने आणि ग्राहकांचा विश्वास वाढल्याने आता प्रिमियम स्मार्टफोनचे आकर्षण वाढले आहे आणि ग्राहक बजेट किंवा मिड रेंज स्मार्टफोन खरेदी करण्यापेक्षा प्रिमियम स्मार्टफोन जसे की आयफोन खरेदी करण्याला अधिक प्राधान्य देत आहेत.

Realme C85 मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! 7000mAh बॅटरी आणि AMOLED डिस्प्लेने सुसज्ज… मिड रेंजमध्ये मिळणार सॉलिड बिल्ड

iPhone 16 आणि 15 सीरीजची मोठी मागणी

अ‍ॅपलने त्यांच्या iPhone 16 आणि 15 सीरीजच्या वाढत्या मागणीमुळे 28 टक्के मूल्य हिस्सा मिळवून प्रीमियम मार्केटमध्ये अव्वल स्थान पटकावले. याशिवाय अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या आयफोन 17 सिरीजला देखील ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला. या सिरीजमधील मॉडेल्सची सुरुवातीची मागणी मागील मॉडेलपेक्षा अधिक चांगली होती. याशिवाय टेक कंपनी सॅमसंगने 28 टक्के मूल्य हिस्सा मिळवून प्रीमियम मार्केटमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. गॅलेक्सी एस आणि ए सीरीज आणि फोल्डेबल फोन ची मोठी मागणी पाहायला मिळाली.

FAQs (संबंधित प्रश्न)

Apple कंपनी म्हणजे काय?
Apple ही अमेरिकन टेक्नॉलॉजी कंपनी आहे जी iPhone, iPad, MacBook, Apple Watch, आणि इतर इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स बनवते. तिचे मुख्यालय कॅलिफोर्निया (USA) मध्ये आहे.

iPhone म्हणजे काय?
iPhone हा Apple कंपनीने बनवलेला प्रीमियम स्मार्टफोन आहे, जो iOS ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो आणि त्याच्या सुरक्षिततेसाठी व गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे. iPhone 15, iPhone 15 Pro, iPhone 14, iPhone SE (3rd Gen) ही सध्या लोकप्रिय मॉडेल्स आहेत.

iPhone आणि Android फोनमध्ये काय फरक आहे?
iPhone मध्ये iOS सिस्टीम असते जी अधिक सुरक्षित, स्मूथ आणि दीर्घकाळ अपडेट्स देणारी असते, तर Android मध्ये अधिक कस्टमायझेशन आणि विविध ब्रँड्सचे पर्याय मिळतात.

Apple ID म्हणजे काय आणि त्याचा उपयोग काय?
Apple ID ही तुमची वैयक्तिक लॉगिन ओळख आहे, ज्याद्वारे तुम्ही App Store, iCloud, iTunes आणि इतर Apple सेवांचा वापर करू शकता.

Web Title: Marathi tech news india in the third largest iphone market in world this are the top selling models

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 08:46 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

REDMAGIC च्या नव्या स्मार्टफोनची ग्लोबल मार्केटमध्ये झाली एंट्री, 50MP कॅमेरा आणि 5G सपोर्टने सुसज्ज… इतकी आहे किंमत
1

REDMAGIC च्या नव्या स्मार्टफोनची ग्लोबल मार्केटमध्ये झाली एंट्री, 50MP कॅमेरा आणि 5G सपोर्टने सुसज्ज… इतकी आहे किंमत

Meta वर लागला मोठा आरोप! AI ला ट्रेन करण्यासाठी अश्लील व्हिडीओंचा होतोय वापर? काय आहे सत्य? जाणून घ्या
2

Meta वर लागला मोठा आरोप! AI ला ट्रेन करण्यासाठी अश्लील व्हिडीओंचा होतोय वापर? काय आहे सत्य? जाणून घ्या

सॅमसंग इंडियाने सॅमसंग वॉलेटमध्‍ये जोडले नवीन फीचर्स, डिजिटल पेमेंट्स आणि यूपीआय ऑनबोर्डिंग पोहोचले नव्‍या उंचीवर
3

सॅमसंग इंडियाने सॅमसंग वॉलेटमध्‍ये जोडले नवीन फीचर्स, डिजिटल पेमेंट्स आणि यूपीआय ऑनबोर्डिंग पोहोचले नव्‍या उंचीवर

काय सांगता! केवळ 1 रुपयांत मिळवा JioHotstar चे प्रीमियम सबस्क्रिप्शन! सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल, तुम्हाला मिळणार का फायदा?
4

काय सांगता! केवळ 1 रुपयांत मिळवा JioHotstar चे प्रीमियम सबस्क्रिप्शन! सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल, तुम्हाला मिळणार का फायदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.