WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा धमाका! मित्रांचे स्टेटस होणार नाही तुमच्या नजरेआड, असं आहे नवं फीचर
WhatsApp सतत त्यांच्या करोडो युजर्ससाठी नवीन – नवीन फीचर्स घेऊन येत असते. याच नवीन फीचर्समुळे युजर्सचा WhatsApp वापरण्याचा अनुभव अधिक चांगला होतो. आता देखील कंपनी त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच करण्याची तयारी करत आहे. सध्या हे नवीन आणि यूजफुल फीचरची चाचणी सुरु आहे. असं सांगितलं जात आहे की, कंपनी लवकरच हे फीचर युजर्ससाठी रोलआऊट करणार आहे.
खरं तर WhatsApp च्या बीटा वर्जन 2.25.30.4 अपडेटसह काही बीटा टेस्टर्सना एक जबरदस्त फीचर मिळालं आहे. या फीचरमध्ये युजर्स निवडू शकतात की, त्यांना कोणत्या सपंर्काच्या स्टेटस अपडेट्ससाठी नोटिफिकेशन पाहिजे आहे. कंपनी आता इंस्टाग्रामप्रमाणेच हे फीचर WhatsApp वर आणण्याची तयारी करत आहे. त्यामुळे आता युजर्स त्यांच्या आवडते संपर्कांचे स्टेटस मिस करणार नाहीत. (फोटो सौजन्य – Pinterest)
खरं तर आधी हे फीचर विकासाच्या टप्प्यात होतं. मात्र आता याला पब्लिक टेस्टिंगसाठी काही युजर्सना रोल आउट करण्यात आलं आहे. युजर्स अगदी सोप्या पद्धतीने या फीचरचा वापर करू शकणार आहेत. या नवीन फीचरच्या मदतीने युजर्स कोणत्याही खास संपर्काच्या स्टेटसमध्ये जाऊन त्यांच्यासाठी ‘Get notifications’ ऑप्शन सिलेक्ट करू शकणार आहेत. ‘Get notifications’ ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर जेव्हा युजर्सना त्या संपर्काने नवीन स्टेटस अपलोड केल्यानंतर रियल-टाइममध्ये त्याचे नोटिफिकेशन मिळणार आहे. म्हणजेच आता युजर्स त्यांच्या गर्लफ्रेंडचे किंवा बॉयफ्रेंडचे स्टेटस अपलोड होताच पाहू शकणार आहेत.
📝 WhatsApp beta for Android 2.25.30.4: what’s new? WhatsApp is rolling out a feature that enables notifications for status updates from selected contacts, and it’s available to some beta testers!
Some users can get this feature through earlier updates.https://t.co/xOVUlb6mU0 pic.twitter.com/CeEBiLbTgJ — WABetaInfo (@WABetaInfo) October 14, 2025
WhatsApp चे हे फीचर अशा युजर्ससाठी फायदेशीर ठरणार आहे, ज्यांना त्यांच्या जवळच्या मित्रांकडून, जोडीदाराकडून किंवा कुटुंबाकडून स्टेटस अपडेट्स चुकवायचे नाहीत. या फीचरमध्ये त्यांना नोटिफिकेशन बंद करण्याचा पर्याय देखील आहे. तुम्हाला त्याच मेनूमध्ये ‘सूचना म्यूट करा’ पर्याय देखील मिळेल.
फोन आणि फ्लशची जोडी ठरत आहे ‘घातक’! नव्या अभ्यासाने उघड केले धक्कादायक सत्य, डॉक्टरांनी दिलाय इशारा
इतकेच नाही तर, हे नवीन फीचर यूजर्सना त्यांचा WhatsApp अनुभव अधिक वैयक्तिक आणि कंट्रोल्ड करण्यास खूप मदत करेल. याद्वारे, तुम्ही ठरवू शकता की कोणत्या लोकांच्या अपडेट्सवर लक्ष ठेवायचे आणि कोणते सायलेंट ठेवायचे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, आता तुम्हाला इंस्टाग्रामप्रमाणेच WhatsApp वरील प्रत्येक स्टेटससाठी नोटिफिकेशन मिळतील.