Meta ने AI-जनरेटेड शॉर्ट व्हिडीओसाठी लाँच केला नवीन 'Vibes' फीड, जाणून घ्या सविस्तर
Meta ने गुरुवारी Meta AI अॅपमध्ये Vibes नावाचे नवीन फीड लाँच केले आहे. हे फीड AI-जनरेटेड शॉर्ट व्हिडीओवर फोकस करणार आहे. हे फीचर युजर्सना AI-पावर्ड क्लिप्स बवण्यासाठी, एक्सप्लोर करण्यासाठी आणि शेअर करण्याची सुविधा देते. युजर्सनी सुरुवातीपासून तयार केलेले व्हिडीओ असोत किंवा व्हिडिओ फीडमधून रीमिक्स केलेले असोत, हे सर्व व्हिडीओ आता Vibes फीडमध्ये दिसणार आहेत. हे व्हिडीओ आता Vibes फीड, डायरेक्ट मेसेज किंवा इंस्टाग्राम आणि फेसबूकवर क्रॉस-पोस्ट केले जाऊ शकतात. प्लॅटफॉर्म युजर्सना विजुअल्स, म्यूजिक आणि स्टाइल्स जोडण्याची आणि त्यांचे क्रिएशन पर्सनलाइज्ड करण्याची देखील सुविधा देते.
मेटाने मेटा AI अॅपचे आणखी वर्जन जारी केले आहे, ज्यामध्ये ‘Vibes’ चा अर्ली प्रीव्यू सादर करण्यात आला आहे. हे नवीन फीड Meta AI अॅप आणि ऑफिशियल वेबसाइटवर उपलब्ध असणार आहे आणि यूजर्सना शॉर्ट-फॉर्म, AI-जनरेटेड व्हिडीओ बनवण्याची आणि शेअर करण्याची सुविधा देणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Meta ने सांगितलं आहे की, Vibes अशा प्रकारे डिझाईन करण्यात आलं आहे की, क्रिएटिव इंस्पिरेशन अगदी सहज मिळू शकतात आणि Meta AI च्या मीडिया टूल्ससह एक्सपेरिमेंट केले जाऊ शकतात. जेव्हा यूजर्स फीड स्क्रोल करतील, तेव्हा त्यांना वेगवेगळ्या क्रिएटर्स आणि कम्युनिटीजचे AI-जनरेटेड व्हिडीओ पहायला मिळणार आहेत. कंपनीचं असं म्हणणं आहे की, हे फीड हळूहळू यूजरच्या अॅक्टिविटीवर आधारित फीड वैयक्तिकृत होईल.
Vibes यूजर्सना सुरुवातीपासून व्हिडीओ तयार करण्याचे आणि फीडमधून कोणतेही व्हिडीओ रिमिक्स करण्याची सुविधा देतात. प्लॅटफॉर्म यूजर्सना विजुअल्स जोडण्याची, म्युझिक लेअर करण्याचे आणि स्टाईर एडजस्ट करण्याचे ऑप्शन देतो. कंपनीने त्यांच्या ब्लॉगमध्ये इमेज आणि AI-जनरेटेड व्हिडीओ क्लिप्स शेयर केल्या आहेत, ज्यामुळे यातील फीचरची झलक युजर्सना पाहायला मिळणार आहे. यूजर्स त्यांच्या AI-जनरेटेड व्हिडीओना थेट Vibes फीडमध्ये देखील शेअर करू शकतात, तसेच ते त्यांच्या मित्रांना मेसेजवर देखील शेअर करब शकतात किंवा इंस्टाग्राम आणि फेसबुक स्टोरीज किंवा रील्सवर क्रॉस-पोस्ट करू शकतो. जर एखादा युजर इंस्टाग्राम किंवा Meta AI व्हिडीओ पाहत असेल, तर तो त्यावर टॅप करून Meta AI अॅपमध्ये रीमिक्स करू शकतो.
WhatsApp Update: मेसेजिंग अॅपवर चॅटिंग करणं झालं आणखी मजेदार, कंपनी घेऊन आलीये जबरदस्त फीचर
Meta ने म्हटलं आहे की, आम्ही अनेक पावरफुल क्रिएशन टूल्स आणि मॉडल्सवर काम करत आहोत आणि यासाठी अनेक टॅलेंटेड विजुअल आर्टिस्ट आणि क्रिएटर्स यांच्यासोबत कामं केलं जात आहे. कंपनी म्हणते की हे वैशिष्ट्य भविष्यात अधिक यूजर्ससाठी आणले जाईल. मेटा म्हणते की हे अॅप त्यांचे AI इनिशिएटिव्स प्रदर्शित करणारे मुख्य केंद्र राहील, ज्यामध्ये स्मार्टग्लासेस आणि मेटा एआय असिस्टंटसह एकत्रीकरण यांचा समावेश आहे.