smart phone (फोटो सौजन्य- pinterest)
नुकताच Motorola ने Motorola Edge 60 Fusion आणि Motorola Edge 60 Stylus लाँच केले आहे. आता Motorola कंपनी आजून एक रोमांचक मॉडेल Motorola Edge 60 Pro लाँच करण्याच्या तयारीत आहे. काही दिवसाआधी Motorola ने Edge 60 Proचा टीजर शेअर केला आहे. ज्यात अनेक जबरदस्त फीचर्सचा खुलासा करण्यात आला. कंपनीने या बहुप्रतिक्षित स्मार्टफोनच्या लाँचिंग तारखेचीही पुष्टी केली आहे. जर तुम्ही टिकाऊ आणि दमदार फीचर्स असलेल्या डिवाइसच्या शोधात असाल तर हे तुमच्यासाठी एक योग्य पर्याय आहे.
काय आहे फीचर्स
Motorola Edge 60 Pro मध्ये 6.7 इंचाचा कर्व्ड pOLED डिस्प्ले आहे, जो आवाइब्रेंट विज़ुअल्सचा आश्वासन देतो. टिकाऊपणासाठी, डिस्प्लेला गोरिल्ला ग्लास 7i ने संरक्षित केले गेले आहे, जे तुटण्यापासून वाचवते. याव्यतिरिक्त, डिव्हाइसला IP68 आणि IP69 रेटिंग आहेत, ज्यामुळे ते धूळ आणि पाण्यापासून संरक्षण देते.
याच्या आत MediaTek Dimensity 8350 Extreme प्रोसेसर आहे. हे 12GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज ऑफर करतो. या स्मार्टफोन मध्ये 6000mAhची जबरदस्त बॅटरी देण्यात आली आहे. सोबतच याच्यात 90W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील आहे. हे मॉडेल आउट ऑफ द बॉक्स Android 15 सोबत लाँच होणार आहे आणि फोटोग्राफी उत्साही लोकांसाठी यात ट्रिपल कैमरा सेटअप देण्यात आला आहे. यात OIS सह 50MP Sony LYTIA 700C प्रायमरी शूटर, 50MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 10MP 3x टेलिफोटो लेन्स आहे.
लाँच डेट काय?
Motorola Edge 60 Pro हा ३० एप्रिल २०२५ला भारतीय बाजारात दाखल होईल. कंपनीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याची घोषणा केली आहे. हा जबरदस्त स्मार्टफोन आधीच जागतिक स्तरावर सादर झाला आहे आणि वापरकर्त्यांना दैनंदिन कामांपासून ते तीव्र गेमिंग सत्रांपर्यंत एक अपवादात्मक अनुभव देण्यासाठी डिझाइन केलेला आहे.