
Mobile World Congress 2026: अल्ट्रा-थिन डिझाईन आणि पावरफुल परफॉर्मंस... टेक ईव्हेंटमध्ये HONOR चा फोल्डेबल फोन लाँच, वाचा फीचर्स
HONOR Magic V6 मध्ये अल्ट्रा-स्लिम डिझाईन पाहायला मिळत आहे. या फोनची जाडी केवळ 8.75 मिमी आहे. हा आतापर्यंतचा सर्वात पातळ फोल्डेबल फोन आहे. या डिव्हाईसमध्ये 6660mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी कंपनीच्या सिलिकॉन-कार्बन बॅटरी टेक्नोलॉजीवर आधारित आहे. याच्या बॅटरीची एनर्जी डेंसिटी 921Wh/L पर्यंत असल्याचे सांगितलं जात आहे. (फोटो सौजन्य – X)
एवढंच नाही तर हा फोन टिकाऊ बनवण्यासाठी HONOR ने अनेक उच्च दर्जाचे साहित्य आणि सर्टिफिकेशन देखील वापरले आहेत. हा फोन 500,000 फोल्ड्स SGS हाय-क्वालिटी ड्यूरेबिलिटी सर्टिफिकेशन, HONOR सुपर स्टील (2800MPa) आधारित बिजागर, 44% मजबूत UTG ग्लास आणि HONOR अँटी-स्क्रॅच नॅनोक्रिस्टल शील्डसह येतो. यासोबतच या फोनमध्ये SGS 5-Star ड्रॉप आणि स्क्रीन अँटी-इम्पॅक्ट रेटिंगसह पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी IP68 + IP69 रेटिंग दिली आहे.
HONOR unveiled two groundbreaking devices at MWC 2026 in Barcelona——the flagship foldable HONOR Magic V6 and the pioneering Robot Phone.
These innovations embody HONOR’s relentless pursuit of technological breakthroughs and its deep commitment to human-centric ideals,… pic.twitter.com/eUhFqOa6L8 — HONOR (@Honorglobal) March 2, 2026
Magic V6 मध्ये दोन प्रीमियम LTPO 2.0 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जिथे तुम्हाला 1 टू 120Hz पर्यंत डायनेमिक रिफ्रेश रेट सपोर्ट मिळणार आहे. कवर डिस्प्ले 6.52 इंच आहे, जिथे 6000 निट्सपर्यंत HDR पीक ब्राइटनेस दिली आहे. मुख्य फोल्डेबल डिस्प्ले 7.95 इंच आहे, जो 5000 निट्स HDR पीक ब्राइटनेस ऑफर करतो. याचा अर्थ उन्हात देखील स्क्रीन अगदी स्पष्टपणे पाहू शकता. HONOR Magic V6 हा जगातील पहिला असा फोल्डेबल डिव्हाईस आहे, ज्यामध्ये स्नॅपड्रॅगन 8 Elite Gen 5 (3nm) चिपसेट देण्यात आले आहे. यासोबतच या फोनमध्ये Adreno 840 GPU दिले आहे. याचा अर्थ असा आहे की, डिव्हाईसमध्ये तुम्हाला स्मूद मल्टीटास्किंग, फास्ट AI प्रोसेसिंग आणि कंसोल-लेवल ग्राफिक्स पाहायला मिळत आहे.
फोनमध्ये फोटोग्राफीच्या HONOR ने कोणतीही तडजोड केली नाही. डिव्हाईसमध्ये 64MP टेलीफोटो सेंसर (1/2-inch) दिला आहे. फोल्डेबल फोनमध्ये सर्वाधिक मेगापिक्सेलवाला कॅमेरा दिला आहे. यासोबतच या डिव्हासईमध्ये CIPA 6.5 स्टेबलाइजेशन, 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 50MP अल्ट्रावाइड लेंस देखील दिले आहे. फोनचे AiMAGE कलर इंजिन दृश्यानुसार पांढरे संतुलन एडजस्ट करू शकते, ज्यामुळे अधिक नैसर्गिक रंग मिळतात. कंपनीने ते आयफोन 17 प्रो मॅक्सपेक्षा स्टेजवर अधिक अचूक असल्याचे वर्णन केले आहे. या फोनची किंमत किती असेल याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही.