फोटो सौजन्य - Motorola
लोकप्रिय टेक कंपनी Motorola ने त्यांचा बजेट स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Motorola g04s भारतात लाँच करण्यात आाला आहे. तुम्ही बजेटमध्ये नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर Motorola g04s सर्वोत्तम आहे. याची किंमत 7 हजार रुपयांपेक्षाही कमी आहे. अनेक जबरदस्त फीचर्ससह Motorola g04s लाँच करण्यात आला आहे. हा फोन चार्जरसोबत येतो, त्यामुळे तुम्हाला फोनच्या खेरदीनंतर दुसरा चार्जर विकत घेण्याची गरज नाही. चला तर मग Motorola g04s च्या फीचर्सवर नजर टाकूया.
हेदेखील वाचा- Iphone आणि Ipad मध्ये आढळल्या त्रुटी; युजर्सचा डेटा होऊ शकतो लिक; केंद्रातून अलर्ट जारी
Motorola g04s मध्ये 6.6 इंच IPS LCD HiD HD+ 90 Hz डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चं संरक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे फोनची स्क्रीन अतिशय मजबूत आहे.
Motorola g04s मध्ये UNISOC T606 प्रोसेसर, 2xA75 1.6GHz + 6xA55 1.6GHz ऑक्टा-कोर CPU सह येतो.
हेदेखील वाचा- WhatsApp वर लाँच झालं नवं फीचर! आता युजर्स महत्त्वाची चॅट्स ठेऊ शकतील सुरक्षित
Motorola g04s फोन 4GB RAM + RAM बूस्ट – 2GB डीफॉल्ट आणि 4GB कमाल सह उपलब्ध आहे. फोन 64GB बिल्ट इन आणि 1TB मायक्रोएसडी कार्ड एक्सपांडेबल UFS 2.2 स्टोरेजसह येतो. हा फोन 4 रंगांमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये Concord Black, Satin Blue, Sea Green आणि Sunrise Orange या रंगांचा समावेश आहे. या रंगांमुळे फोनला प्रमियम लूक मिळतो.
Motorola g04s च्या कॅमेरा स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, फोन 50MP रीअर मेन कॅमेरा आणि 5MP फ्रंट फेसिंग कॅमेरासह येतो. ज्याच्या मदतीने तुम्ही उत्तम फोटो काढू शकता.
Motorola g04s मध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 15W डिव्हाइस चार्जिंग क्षमतेसह येते. फोनसोबत 10W चा चार्जर उपलब्ध आहे. जो फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट करतो.
Motorola g04s फोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजच्या एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. तुम्ही तुमच्यासाठी किंवा तुमच्या घरातील सदस्यांसाठी 10,000 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये फोन शोधत असाल, तर Motorola g04s एक चांगला पर्याय ठरू शकतो. Motorola g04s ची किंमत 6,999 रुपये आहे. तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून Motorola g04s खरेदी करु शकता.
याशिवाय कंपनीने काही दिवसांपूर्वीच motorola edge 50 भारतात लाँच केला आहे. motorola edge 50 ची रचना मोहक आणि तितकीच टिकाऊ आहे. motorola edge 50 मध्ये 6.7 इंच, 1.5 K+ एचडीआर 10 +पोलेड वक्राकार डिस्प्ले आहे. फोनमध्ये 50MP मुख्य कॅमरा आहे. 50MP मुख्य कॅमरा हा अंधाऱ्या वातावरणात कमी आवाजासह अतिशय वेगवान फोटो टिपण्यासाठी सोनी LYTIA™700सी सेन्सरचा वापर करतो.