फोटो सौजन्य - pinterest
iPhone आणि iPad युजर्ससाठी धोक्याची घंटा आहे. केंद्र सकारच्या सुरक्षा सल्लागार इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी प्रोसिजर टीमने (CERT-in) iPhone आणि iPad युजर्ससाठी अलर्ट जारी केला आहे. CERT-in ला Apple च्या काही उत्पादनांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. यामुळे युजर्सचा डेटा लिक होऊन आणि ते सायबर फ्रॉडचे शिकार ठरू शकतात. तसेच या त्रुटींमुळे युजर्स स्पूफिंगचेही बळी होऊ शकतात.
हेदेखील वाचा- WhatsApp वर लाँच झालं नवं फीचर! आता युजर्स महत्त्वाची चॅट्स ठेऊ शकतील सुरक्षित
केंद्र सरकारचे सुरक्षा सल्लागार इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी प्रोसिजर टीम (CERT-in) ने जारी केलेल्या अलर्टननुसार, Apple च्या उत्पादनांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. ज्यामुळे iPhone, iPad आणि Apple कंपनीच्या टेक उत्पादनांमधून युजर्सची वैयक्तिक माहिती लिक होऊ शकते. ज्यामुळे युजर्स स्पूफिंग आणि सायबर फ्रॉडचे शिकार होऊ शकतात. त्यामुळे युजर्ससाठी ॲडव्हायजरी जारी करण्यात आल आहे.
हेदेखील वाचा-24 तासांपेक्षा जास्त वेळ नेटवर्क खंडीत झाल्यास कंपनीला द्यावी लागणार नुकसान भरपाई!
iOS and iPadOS चे 17.6 आणि 16.7.9 पूर्वीचे वर्जन, macOS Sonoma चे 14.6 पूर्वीचे वर्जन, macOS Ventura चे 13.6.8 पूर्वीचे वर्जन, macOS Monterey चे 12.7.6 पूर्वीचे वर्जन, watchOS चे 10.6 पूर्वीचे वर्जन, tvOS चे 17.6 पूर्वीचे वर्जन, visionOS चे 1.3 पूर्वीचे वर्जन, Safari चे 17.6 पूर्वीचे वर्जन, या डिव्हाइसमध्ये इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी प्रोसिजर टीमला अनेक त्रुटी आढळल्या आहेत. जर युजर्स या वर्जनच्या आधारे सॉफ्टवेअर वापरत असतील तर त्यांना धोका होऊ शकतो. त्यांची माहिती लिक होण्याची शक्यता आहे.
नुकताच केंद्र सरकारने iPhone, iPad, MacBooks आणि VisionPro साठीही इशारा दिला होता. ज्यामध्ये म्हटलं होतं की, Apple उत्पादनांमध्ये रिमोट कोड ऍक्सेस असू शकतो. यासाठी सुरक्षा उपाय आवश्यक आहेत. केंद्र सरकारनेही याबाबत युजर्सना सतर्क केले होते. त्यानंतर आता पुन्हा इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी प्रोसिजर टीमने Apple च्या काही उत्पादनांबद्दल ॲडव्हायझरी जारी केली आहे.
ॲडव्हायझरीमध्ये म्हटलं आहे की, Apple च्या उत्पादनांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. ज्यामुळे iPhone, iPad आणि Apple कंपनीच्या टेक उत्पादनांमधून युजर्सची वैयक्तिक माहिती लिक होऊ शकते. कोणताही सायबर स्कॅमर युजर्सची वैयक्तिक माहिती मिळवू शकतो. सायबर स्कॅमर कोड स्वतः तयार करून सुरक्षा निर्बंध तोडू शकतो. याशिवाय, स्पूफिंग हल्ला देखील केला जाऊ शकतो. यामुळे युजर्समना धोका निर्माण होऊ शकतो. Apple ने अलीकडेच नवीन सुरक्षा अपडेट जारी केली आहेत.