Elon Musk च्या चिपने केली कमाल, मेंदूत चिप बसवलेला ॲलेक्स खेळतोय काउंटर-स्ट्राइक 2 (फोटो सौजन्य - सोशल मिडीया)
Elon Musk च्या स्टार्टअप न्यूरोटेक्नॉलॉजी न्यूरालिंक कंपनीला मोठं यश मिळालं आहे. काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं होतं की, न्यूरालिंक कंपनीने ब्रेन-कंप्यूटर इंटरफेस डिवाइस दुसऱ्या रुग्णाच्या मेंदूत इम्प्लांट केलं आहे. न्यूरालिंक कंपनीचं हे इंप्लांटेशन पूर्णपणे यशस्वी झालं आहे. हा दुसरा रुग्ण आता ब्रेन चीपच्या मदतीने 3D वस्तूंचे डिझाइन आणि काउंटर-स्ट्राइक 2 हा लोकप्रिय व्हिडिओ गेम खेळत आहे. ॲलेक्स असे या दुसऱ्या रुग्णाचे नाव आहे. पारंपारिक कंट्रोलर जॉयस्टिकऐवजी, ॲलेक्स आता फक्त त्याच्या विचारांनी गेम नियंत्रित करण्यास सक्षम आहे. हा केवळ त्याच्यासाठीच नाही तर जगासाठी एक अद्भुत अनुभव असल्याची प्रतिक्रिया Elon Musk ने व्यक्त केली आहे.
हेदेखील वाचा- Elon Musk ची X पोस्ट व्हायरल! Harry Potter च्या विलन सोबत केली ब्राझीलच्या मुख्य न्यायाधीशांची तुलना
या भव्य यशानंतर न्यूरालिंक त्यांचा इंटरफेस आणखी सुधारण्याच्या दिशेने काम करत आहे आणि दशकात लाखो लोक या क्रांतिकारी तंत्रज्ञानाचा लाभ घेतील, अशा विश्वास Elon Musk ने व्यक्त केला आहे. याबाबत Elon Musk आणि न्यूरालिंक यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे. न्यूरालिंकने म्हटलं आहे की, ॲलेक्समधील ब्रेन इंप्लांटेशन प्रभावीपणे कार्य करत आहे, त्याला पहिल्या रुग्ण नोलँड अर्बगने अनुभवलेल्या ‘थ्रेड रिट्रॅक्शन’सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागले नाही. या उत्कृष्ट यशानंतर आता Elon Musk ला आयर्न मॅन म्हणूनही ओळखले जाते.
न्यूरालिंकने त्याच्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ॲलेक्सला फर्स्ट पर्सन शूटर गेम खेळायला आवडते, ज्यात सामान्यत: दोन स्वतंत्र जॉयस्टिक्स (एक लक्ष्य ठेवण्यासाठी आणि दुसरे हालचालीसाठी) आणि एकाधिक नियंत्रणे आवश्यक असतात. पूर्वी ॲलेक्स हे गेम क्वाडस्टिक नावाच्या सहाय्यक उपकरणाचा वापर करून खेळत होता. ही एक माऊथ-ऑपरेटेड जॉयस्टिक आहे, ज्यामध्ये सिप-अँड-पफ प्रेशर सेन्सर आणि क्लिक करण्यासाठी लिप पोझिशन सेन्सर आहे. ॲलेक्स हा माजी ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञ आहे, जो पाठीच्या कण्याच्या दुखापतीमुळे अर्धांगवायू झाला होता.
हेदेखील वाचा- 1 लाख चिप्सचा वापर करून Elon Musk तयार करत आहे जगातील सर्वात पावरफूल AI
Elon Musk ची न्यूरालिंक कंपनी अर्धांगवायूने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या मदतीसाठी एका खास मिशनवर काम करत आहे. याच मिशनअंतर्गत न्यूरालिंक कंपनीने ब्रेन-कंप्यूटर इंटरफेस डिवाइस ॲलेक्सच्या मेंदूत इम्प्लांट केलं आहे. अर्धांगवायूचे रुग्ण केवळ विचार करूनच डिजिटल उपकरणे वापरू शकतील, अशा पद्धतीने ही चिप तयार करण्यात आली आहे.
न्यूरालिंकने सांगितलं आहे की, कंपनी ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस लिंकसाठी नवीन वैशिष्ट्ये विकसित करत आहे. सध्या लिंक वापरकर्त्यांना संगणकाचा कर्सर नियंत्रित करण्यास अनुमती देते. भविष्यातील त्याचे ध्येय हे आहे की वापरकर्ते एकाच वेळी अनेक उपकरणे नियंत्रित करू शकतील आणि त्यांच्या कल्पना जलदपणे लिहू शकतील. गेल्या अनेक महिन्यांपासून Elon Musk ची न्यूरालिंक कंपनी अर्धांगवायूने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या मदतीसाठी एका खास मिशनवर काम करत आहे. या मिशनबाबत Elon Musk वेळोवेळी अपडेट देखील शेअर करतो.