Elon Musk ची X पोस्ट व्हायरल! Harry Potter च्या विलन सोबत केली ब्राझीलच्या जेफ जस्टिसची तुलना (फोटो सौजन्य - Elon Musk X Account)
नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा X चा मालक Elon Musk चर्चेत आला आहे. पण आता Elon Musk सोबतच चर्चा आहे त्याच्या पोस्टची. Elon Musk ने X वर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये Elon Musk ने ब्राझीलच्या मुख्य न्यायाधीशांची तुलना Harry Potter च्या विलन सोबत केली आहे. ऐकूण आश्चर्य वाटेल पण हे खरंं आहे. Elon Musk ने या पोस्टच्या माध्यमातून ब्राझीलचे मुख्य न्यायाधीश अलेक्जेंडर डी मोरेस यांच्यावर टीका केली आहे. Elon Musk ची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. अनेक युजर्सनी या पोस्टवर मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
हेदेखील वाचा – माझे वडील क्रूर, माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही; ट्रान्सजेंडर मुलीचा Elon Musk वर पुन्हा गंभीर आरोप
पाहा Elon Musk ची X वरील व्हायरल पोस्ट
The resemblance is uncanny 🤣🤣
Alexandre de Voldemort pic.twitter.com/IXR569y2qT
— Elon Musk (@elonmusk) August 17, 2024
Elon Musk ने एलोन मस्क यांनी ब्राझीलमधील X प्लॅटफॉर्म बंद करण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ X चे कर्मचारी यापुढे तेथे राहणार नाही. मात्र असे असलं तरी ब्राझिलियन सोशल मिडीया प्लॅटफॉर्म X चा वापर करण्यास सक्षम असतील. Elon Musk ने शनिवारी X पर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, ब्राजीलमधील न्यायाधीश अलेक्जेंडर डी मोरेस यांच्या आदेशानुसार ब्राझीलमधील एक्सचे ऑपरेशन बंद करण्यात येत आहे. यापूर्वी Elon Musk ला X प्लॅटफॉर्मवरून एक कंटेंट काढून टाकण्यास सांगण्यात आलं होतं, अन्यथा Elon Musk ला अटक केली जाईल, अशी माहिती देण्यात आली होती. हा तणाव जवळपास एक वर्षापासून सुरू आहे. X ऑपरेशन थांबल्यानंतरही, ब्राझिलमधील नागरिक X सेवा वापरण्यास सक्षम असतील.
हेदेखील वाचा –Elon Musk च्या न्युरालिंक कंपनीला मोठ यश! अर्धांगवायू असलेल्या रुग्णाचा मेंदू कंट्रोल करणार डिजिटल डिव्हाइस
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, या वर्षाच्या सुरुवातीला सरन्यायाधीशांनी X प्लॅटफॉर्मला काही खाती ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. हा निर्णय त्यांनी तथाकथित डिजिटल मिलिशियाची चौकशी करून घेतला होता, ज्यांच्यावर माजी अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्या सरकारच्या काळात खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवल्याचा आरोप होता. या वर्षाच्या सुरुवातीस, Elon Musk म्हणाला होता की न्यायाधीशांनी जी खाती बंद करण्यास सांगितले होते ते ते पुन्हा सक्रिय करू. Elon Musk ने 2022 मध्ये X प्लॅटफॉर्म विकत घेतले होते, ज्याचे नाव आधी Twitter असे होते. यानंतर त्यांनी या प्लॅटफॉर्मवर अनेक बदल केले आहेत.
या सर्व प्रकारानंतर आता Elon Musk ने आता X प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या Elon Musk ने ब्राझीलच्या मुख्य न्यायाधीशांबद्दल एक अतिशय विचित्र पोस्ट केली आहे. Elon Musk ने या पोस्टच्या माध्यमातून ब्राझीलचे मुख्य न्यायाधीश अलेक्जेंडर डी मोरेस यांच्यावर टीका केली आहे. Elon Musk ची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. अनेक युजर्सनी या पोस्टवर मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.