फोटो सौजन्य - pinterest
AI ने आपल्या जीवनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आपण आपल्या छोट्या छोट्या कामांसाठी AI चा वापर करतो. फोटो किंवा व्हिडीओ एडीट करणं, एखाद्या गोष्टीविषयी माहिती शोधणं, एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधणं, अशा कामांसाठी आपण AI चा वापर करतो. केवळ कल्पना आणि सिनेमांमध्ये दिसणारे AI आज आपल्या रोजच्या जीवनात वापरलं जात आहे. AI ने प्रत्येकाच्या जीवनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. स्मार्टफोनमध्ये, लॅपटॉपमध्ये, स्मार्टवॉचमध्ये अगदी सगळीकडेच आपल्याला AI चा वापर झालेला पाहायला मिळतो.
हेदेखील वाचा – X चा मालक AI च्या दुनियेत! शेअर केला जगातील राजकीय नेत्यांचा खास व्हिडीओ
जगभरात AI ची क्रेझ दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक टेक कंपन्या स्वत:च AI लाँच करण्यासाठी धडपडत आहेत. प्रत्येक कंपनी त्याचं AI टूल कसं बेस्ट आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असते. एवढंच नाही तर काही संशोधकांनी AI पार्टनरची देखील निर्मिती केली आहे. या AI च्या शर्यतीत आता Elon Musk देखील उतरला आहे. Elon Musk ने घोषणा केली आहे, की तो लवकरच जगातील सर्वात शक्तिशाली AI लाँच करणार आहे. तब्बल 1 लाख चिप्स वापरून या AI ची निर्मिती केली जाणार आहे. नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत राहणार Elon Musk आता शक्तिशाली AI च्या घोषणेमुळे चर्चेत आला आहे. X चे AI स्टार्टअप xAI ने त्याच्या लार्ज लँग्वेज मॉडेल, Grok चे प्रशिक्षण सुरू केले आहे.
हेदेखील वाचा – AI फिचर्ससह Noise चे ColorFit Pulse 4 Max स्मार्टवॉच लाँच! काय आहे किंमत? जाणून घ्या.
Elon Musk ने दावा केला आहे की, Grok हा जगातील सर्वात शक्तिशाली AI प्रशिक्षण क्लस्टर असणार आहे. हे क्लस्टर मेम्फिस, टेनेसी येथे आहे. यामध्ये एकूण 100,000 Nvidia H100 AI चिप्स समाविष्ट करण्यात आल्या आहेत. xAI हे Elon Musk चे नवीन स्टार्टअप आहे. याबाबत Elon Musk ने त्याच्या सोशल मिडीया अकाऊंटवर माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये कंपनी Elon Musk ने xAI, X, Nvidia आणि इतर कंपन्यांच्या मदतीचं कौतुक केलं आहे. Elon Musk ने क्लस्टरच्या चांगल्या क्षमतेवर भर देत दावा केला आहे की हे जगातील सर्वात शक्तिशाली AI प्रशिक्षण क्लस्टर असणार आहे.
दोन आठवड्यांपूर्वी एक अहवाल सादर करण्यात आला होता. अहवालात सांगितलं होतं की, Elon Musk स्वतःचे डेटा सेंटर बनवत आहे आणि त्यासाठी AI चिप्स खरेदी करत आहे. या अहवालानंतर काही दिवसांतच Elon Musk ने याबाबतची अधिकृत घोषणा केली. xAl स्वतः 100,000 H100 सिस्टम तयार करत आहे. xAI ऑगस्टमध्ये Grok 2 रिलीज करेल आणि Grok 3 डिसेंबरमध्ये उपलब्ध होईल. Grok 2 फाइनट्यूनिंग आणि बग फिक्स करत आहे आणि पुढील महिन्यात रिलीज होण्याची अपेक्षा आहे.