फोटो सौजन्य: iStock
अनेक जण आज WhatsApp हा मेसेजिंग अॅप जास्त प्रमाणात वापरताना दिसतात. पण या अॅप व्यतिरिकीत काही असे अॅप्स देखील आहेत, जे युजर्स वापरताना दिसतात. टेलिग्राम हा त्यातीलच एक आहे. मागील काही काळात टेलिग्रामवर अनेक आरोप करण्यात आले होते. पण आता या वादग्रस्त घटनांना मागे सारून कंपनी नवीन वर्षात नव्या जोमाने युजर्सना उत्तम सर्व्हिस देण्यासाठी सज्ज झाले आहेत.
टेलिग्रामने 2025 च्या पहिल्या अपडेटसह अनेक नवीन फीचर्स सादर केले आहेत. बदलांबद्दल बोलताना, मेसेजिंग ॲपने आता युजर्सना अशी सुविधा दिली आहे की आता ते मिळालेल्या गिफ्ट्सचे कलेक्टिबल्समध्ये रूपांतर करू शकतात. हे इतरांना देखील ट्रान्स्फर केले जाऊ शकतात. याशिवाय, या अपडेटमध्ये ॲपमधील QR कोड स्कॅनर, सर्व्हिस मेसेज रिएक्शन, फोल्डरच्या नावांमध्ये इमोजी आणि एक्सट्रा मेसेज सर्च फिल्टर यांसारखी फीचर्स देखील जोडले गेली आहेत. चला अन्य नवीन फीचर्सबद्दल जाणून घेऊया.
टेलिग्रामने ब्लॉग पोस्टमध्ये आपल्या नवीन फीचर्सबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, टेलिग्रामवर मिळालेल्या गिफ्ट्स आता कलेक्टिबल्समध्ये अपग्रेड केल्या जाऊ शकतात. ते इतर वापरकर्त्यांना देखील ट्रान्स्फर केले जाऊ शकतात. गिफ्ट्सना कलेक्टिबल्समध्ये अपग्रेड केल्याने टेलीग्राम आर्टिस्टद्वारा डिझाइन केलेल्या कस्टम व्हेरिफिकेशनसह भिन्नतेसह एक नवीन अपीरियंस अनलॉक होते. हा इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म म्हणते की कलेक्टिबल्सचा बॅकग्राऊंड कलर, आयकॉन आणि नंबर देखील मिळतात, यामुळे खात्री होते की प्रत्येक कलेक्टिबल्स युनिक होते.
WhatsApp Call मुळे तुमचे लोकेशन ट्रॅक होऊ शकते, लगेच करा ही सेटिंग
अपडेटनंतर, कोणीतरी ग्रुपमध्ये सामील होणे किंवा गिफ्ट्स पाठवणे यासारखे सर्व्हिस मेसेजवर आता इमोजी रिऍक्शन्स देता येणार आहे. त्याचप्रमाणे, अपडेटनंतर, टेलीग्राममधील खाजगी आणि ग्रुप चॅट्स व चॅनेलमधील सर्चला रिफाइन करण्यासाठी नवीन एक्सट्रा फिल्टरमुळे विशिष्ट चॅटमधून मेसेज शोधणे देखील सोपे होणार आहे.
अधिकृत थर्ड पार्टी सर्व्हिस आता ट्रान्स्परन्सी सुधारण्यासाठी यूजर अकाउंट्स आणि चॅट्सना एक्सट्रा व्हेरिफिकेशन आयकून नियुक्त करू शकतात. जर युजर थर्ड-पार्टी वेरिफिकेशन रिसिव्ह करत असेल तर नावापुढे एक छोटा लोगो दिसेल. परंतु, कंपनी यावर जोर देते की थिर्ड पार्टी व्हेरिफिकेशन आयकॉन, पब्लिक फीगर्स आणि संस्थांसाठी टेलिग्रामद्वारे प्रदान केलेल्या वेरिफाइड चेकमार्कपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत.
Android आणि iOS दोन्हीवर टेलीग्रामचा ॲपमधील कॅमेरा आता डीफॉल्टनुसार QR कोड स्कॅनिंगला सपोर्ट करतो. यासह, वापरकर्ते ॲप्स स्विच न करता थेट त्यांच्या आवडत्या ब्राउझरमध्ये लिंक उघडू शकतात. याव्यतिरिक्त, फोल्डर्स आता कस्टम इमोजीला सपोर्ट करेल, ज्यामुळे प्रीमियम वापरकर्त्यांना त्यांचे फोल्डर अधिक अर्थपूर्ण बनवता येतात.