
पुण्यातील विमान नगर येथे Samsung च्या नव्या स्टोअरचे उद्घाटन
भारतातील आघाडीचा ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड असलेल्या सॅमसंगने पुणे शहरातील विमान नगर येथे आपल्या प्रीमियम एक्स्पीरियन्स स्टोअरचे भव्य उद्घाटन केले आहे. १०५० चौरस फूट जागेवर विस्तारलेले हे स्टोअर केवळ एक विक्री केंद्र नाही, तर टेक प्रेमींसाठी एक परिपूर्ण टेक-डेस्टिनेशन आहे, जेथे इनोव्हेशन, शिक्षण, ग्राहक सहभाग आणि संपूर्ण कनेक्टेड इकोसिस्टमचा अनुभव एकाच छताखाली उपलब्ध आहे.
हे नवीन स्टोअर खास डिझाईन केलेल्या झोन्ससह सुसज्ज आहे, जिथे ग्राहकांना सॅमसंगची संपूर्ण प्रीमियम प्रोडक्ट्स जसे की गॅलक्सी स्मार्टफोन्स, टॅबलेट्स, लॅपटॉप्स, स्मार्टवॉचेस, स्मार्ट रिंग्ज, तसेच स्मार्टथिंग्ज इकोसिस्टीममधील कनेक्टेड डिव्हाइसेस—स्वतः प्रत्यक्ष अनुभवता येतात. या स्टोअरमध्ये क्युरेटेड झोन्समध्ये ग्राहक प्रॉडक्टिव्हिटी, होम ऑटोमेशन, हेल्थ व वेलनेस, एआय फोटोग्राफी आणि इतर अनेक टेक-बेस्ड गोष्टी अनुभवू शकतात.
9000mAh बॅटरीसह लाँच झाला Redmi Pad 2, केवळ इतकी आहे सुरुवातीची किंमत; वाचा स्पेसिफिकेशन्स
सॅमसंगचा ‘लर्न @ सॅमसंग’ उपक्रम येथेही राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत विविध वर्कशॉप्सचे आयोजन केले जाते, जे विशेषतः मिलेनियल्स आणि जनरेशन Z यांना डिझाइन केले आहेत. या वर्कशॉप्समध्ये AI-पावर्ड फोटोग्राफी, डिजिटल आर्ट, डूडलिंग, क्रिएटिव्हिटी हॅक्स, प्रॉडक्टिव्हिटी टिप्स यांचा समावेश असून त्याचा उद्देश ग्राहकांमध्ये टेक्निकल स्किल डेव्हलपमेंट आणि टेक एक्स्प्लोरेशन वाढवणे आहे.
सॅमसंगने विमान नगरची निवड ही पुण्यातील जलदगतीने विकसित होणाऱ्या आणि उच्च खरेदी क्षमता असलेल्या परिसरांतील प्रमुख लोकेशन म्हणून केली आहे. ही जागा प्रगत टेक्नॉलॉजीशी जुळवून घेणाऱ्या ग्राहकांसाठी आदर्श असून येथील स्टोअर सॅमसंगसाठी प्रमुख रिटेल टचपॉईंट ठरेल. सुमित वालिया, उपाध्यक्ष – D2C बिझनेस अँड कॉर्पोरेट मार्केटिंग, सॅमसंग इंडिया यांनी सांगितले की सॅमसंगमध्ये आम्ही ग्राहकांसाठी प्रेरणादायी व इनोव्हेटिव्ह रिटेल अनुभव तयार करत आहोत. विमान नगरमधील आमचे हे नवीन स्टोअर आमच्या प्रीमियम प्रेझेन्स नवे बळ देते. इथे ग्राहकांना एकाच छताखाली टॉप-ऑफ-द-लाइन टेक्नॉलॉजी, कनेक्टेड अनुभव आणि दर्जेदार सेवा मिळणार आहे.
स्टोअरच्या लाँचनिमित्त ग्राहकांसाठी एक्सक्लुझिव्ह ऑफर्स आणि बेनिफिट्स सादर करण्यात आले आहेत: