आपण राहत असलेल्या डिजीटल जगात ऑनलाईन पेमेंट करणं अगदी सामान्य झालं आहे. लोकं लोकं छोट्या छोट्या गोष्टींची खरेदी करताना सुध्दा कॅश ऐवजी ऑनलाईन पेमेंटचा वापर करतात. रिक्षावाले, टॅक्सीवाले, भाजीवाले या सर्वांकडे ऑनलाईन पेमेंटची सुविधा असते. ऑनलाईन पेमेंट करताना सुट्ट्या पैशांसाठी भांडावं लागत नाही, तसेच अनेक रिवॉर्ड्स देखील मिळतात. त्यामुळे कॅश बाळगण्यापेक्षा अनेकजण ऑनलाईन पेमेंटला जास्त प्राधान्य देतात. पण ऑनलाईन पेमेंट करताना एक समस्या आपल्याला कायम सतावत राहते. ही समस्या पेमेंट करताना पिन टाईप करणे.
हेदेखील वाचा- Nova सिरीजमधील Huawei Nova Flip अखेर लाँच! पावरफुल बॅटरी आणि खास फीचर्सचा समावेश
आपल्याला एखादा ऑनालईन पेमेंट करायचा असेल तर आपल्याला सर्वात आधी आपला सिक्युरिटी पिन त्या ॲपमध्ये टाईप करावा लागतो. पण आता आम्ही तुम्हाला एका अशा ॲपबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही पिनशिवाय पेमेंट करू शकता. UPI Lite असं या ॲपचं नाव आहे. UPI Lite अनेक युजर्ससाठी वरदान ठरतं आहे. युजर्स PhonePe, Paytm आणि Google Pay यासांरख्या सेवांपेक्षा UPI Lite चा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. UPI च्या तुलनेत UPI Lite वापरणाऱ्या युजर्सची संख्या वाढत आहे. याचं कारण म्हणजे UPI Lite द्वारे केलेल्या पेमेंटसाठी तुम्हाला पिनची आवश्यकता लागत नाही. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने सप्टेंबर 2022 मध्ये UPI Lite लाँच केले. UPI Lite ही UPI चे एक वर्जन आहे.
हेदेखील वाचा- पुढील 5 वर्षांत AI देणार कॅन्सरबाबत माहिती! उद्योगपती आनंद महिंद्रांचा मोठा दावा
UPI Lite च्या मदतीने युजर्स दररोज 500 रुपयांपेक्षा कमी मूल्याचे झटपट व्यवहार करण्यास सक्षम आहेत. UPI Lite हा केवळ एक पर्याय राहिला नाही तर बहुतेक युजर्सची गरज बनले आहे. UPI Lite प्रीपेड मॉडेलवर काम करते. युजर्स त्यांच्या बँक खात्यातून त्यांच्या UPI Lite खात्यात 2,000 रुपयांपर्यंत रक्कम लोड करू शकतात. त्यानंतर या UPI Lite बॅलन्सद्वारे, 500 रुपये किंवा एकूण 4,000 रुपयांपर्यंतचे व्यवहार थेट करता येतील. UPI Lite द्वारे केलेले व्यवहार युजर्सच्या बँक स्टेटमेंटमध्ये दिसत नाहीत. UPI Lite खात्यामध्ये फक्त पैशाचे प्रारंभिक लोडिंग रेकॉर्ड केले जाते, ज्यामुळे युजर्सना अनेक लहान नोंदी न पाहता मोठे व्यवहार ओळखणे सोपं होतं. त्यामुळे UPI च्या तुलनेत UPI Lite वापरणाऱ्या युजर्सची संख्या वाढत आहे.
ऑनलाईन पेमेंट करताना एक समस्या आपल्याला कायम सतावत राहते. ही समस्या पेमेंट करताना पिन टाईप करणे. पण UPI Lite द्वारे केलेल्या पेमेंटसाठी तुम्हाला पिनची आवश्यकता लागत नाही. त्यामुळे UPI Lite च्या मदतीने युजर्स दररोज 500 रुपयांपेक्षा कमी मूल्याचे झटपट व्यवहार करण्यास सक्षम आहेत. UPI Lite हा केवळ एक पर्याय का नाही तर बहुतेक युजर्सची गरज बनले आहे. UPI Lite अनेक युजर्ससाठी वरदान ठरतं आहे.