गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! Noise चे नवे ओपन-ईयर ईयरबड्स भारतात लाँच, खास आणि आकर्षक अशी डिझाईन मिळणार केवळ इतक्या किंमतीत
Noise ने भारतात नवीन आणि आकर्षक डिझाईन असलेले ईयरबड्स लाँच केले आहेत. Noise ने भारतात त्यांचे सेकेंड जेनरेशन ओपन-ईयर ईयरबड्स Air Clips 2 लाँच केले आहेत. हे नवीन Open-Wearable Stereo (OWS) डिव्हाईस अनेक मोठ्या अपग्रेडसह लाँच करण्यात आले आहे, ज्यामध्ये नवीन जनरेशनचे ओपन बीम डिझाइन, AirWave टेक्नोलॉजी आणि 40 तासांची बॅटरी लाईफ देण्यात आली आहे. डिसेंबर 2023 मध्ये लाँच करण्यात आलेल्या फर्स्ट जेनरेशनचे Noise Air Clips त्याच्या युनिक डिझाईन आणि क्लिप-स्टाइल फिटमुळे चर्चेत होते. आता कंपनीने या ईअरबड्सचे नवीन वर्जन आणखी जास्त आरामदायक डिझाईनसह सादर केले आहे. हे डिझाईन युजर्सना आणखी जास्त आवडेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
Noise Air Clips 2 हे नवीन ईअरबड्स भारतात 3999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहेत. हे नवीन आणि आकर्षक डिझाईनवाले ईअरबड्स तीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहेत. ज्यामध्ये फ्रॉस्ट ब्लॅक, फ्रॉस्ट ग्रीन आणि फ्रॉस्ट आइवरी यांचा समावेश आहे. या डिव्हाईसची ऑफिशियल सेल 29 जुलै रोजी दुपारी 12 वाजल्यापासून Amazon आणि Noise India e-store वर सुरु झाली आहे. (फोटो सौजन्य – X)
The fan-favourite just got a massive glow-up! ✨
Say hello to Air Clips 2, now with Gen 2 Open Beam Design and Airwave Technology™ for rich, open-ear sound that keeps you in the moment. Get yours today!#LiveInTheMoment pic.twitter.com/Le5q2UDqUM — Noise (@gonoise) July 29, 2025
Noise Air Clips 2 मध्ये Open Beam Design आणि क्लिप-स्टाइल डिझाईन देखील देण्यात आले आहे. हे ईअरबड्स आधीपेक्षा जास्त चांगली ग्रिप आणि आरामदायक फिट ऑफर करतात. ज्यामुळे युजर्सची गाणी ऐकण्याची मजा दुप्पट होते. यामध्ये 12mm चे डायनामिक ड्राइवर्स लावण्यात आले आहेत. ज्यामुळे युजर्सना क्लियर आणि क्रिस्प साउंड क्वालिटी ऑफर केली जाते. यासोबतच Noise Air Clips 2 मध्ये AirWave Technology चा वापर करण्यात आला आहे. जे एयर कंडक्शनद्वारे चांगली साउंड क्वालिटी ऑफर करतो. याची खासियत म्हणजेच यामध्ये साउंड लीकेज होत नाही. म्हणजेच तुमच्या आजूबाजूच्या लोकांना समजणार नाही, की तुम्ही काय ऐकत आहात.
Noise Air Clips 2 मध्ये असलेले ओपन-एअर डिझाइन तुम्हाला संगीताचा आनंद घेण्यास मदत करते आणि त्याचबरोबर आजूबाजूच्या वातावरणाशीही जोडण्याची संधी देखील देते. कनेक्टिव्हिटीसाठी, या नवीन ईअरबड्समध्ये ब्लूटूथ 5.3 सपोर्ट देण्यात आला आहे जो एकाच वेळी दोन डिव्हाइस कनेक्ट करण्याची परवानगी देतो. यात हायपरसिंक तंत्रज्ञान देखील आहे, जेणेकरून केस उघडताच इअरबड्स त्वरित पेयर केले जातील.
गेमिंग लवर्ससाठी Noise Air Clips 2 मध्ये लो-लेटेंसी मोड देखील देण्यात आला आहे. ज्यामुळे गेमिंगचा अनुभव लॅग-फ्री राहतो. Noise Air Clips 2 च्या बॅटरी लाइफबद्दल बोलायचे झाले तर, ते चार्जिंग केससह 40 तासांपर्यंत बॅटरी लाईफ देतात, तर फक्त इअरबडची बॅटरी 6.5 तासांपर्यंत टिकते.