SIM CARD (फोटो सौजन्य- SOCIAL MEDIA )
सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएल देशात आपले नेटवर्क वाढवत आहे. आता बीएसएनएलने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे ज्या अंतर्गत तुम्ही बीएसएनएलचा 5G सिम कार्ड ऑनलाइन ऑर्डर करू शकता आणि हे सिम तुमच्या घरी फक्त ९० मिनिटांत पोहोचेल.
BSNL ने Jio आणि Airtel ची उडवली झोप, 336 दिवसांसाठी मिळणार भरपूर बेनिफिट्स
८० हजार टॉवर्स सक्रिय
बीएसएनएल देशभरात त्यांचे 4G नेटवर्क वाढवत आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मते, बीएसएनएल १ लाख 4G टॉवर्स बसवत आहे, त्यातून ८० हजार टॉवर्स ऑक्टोबर २०२४ पर्यंत सक्रिय झाले आहेत. सरकार सध्याच्या 4G पायाभूत सुविधांचा वापर करून 5G सेवा सुरू करण्याच्या दिशेने काम करत आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना हाय-स्पीड इंटरनेट मिळू शकेल.
महागड्या रिचार्ज प्लॅननंतर बीएसएनएलची मागणी वाढली
गेल्या वर्षी Jio, Airtelआणि Vi सारख्या कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या होत्या. तेव्हा वापरकर्ते बीएसएनएलकडे वळले. माहितीनुसार, जुलै २०२४ मध्येच बीएसएनएलने आंध्र प्रदेशात २.१७ लाख नवीन ग्राहक जोडले आहेत जे कंपनीसाठी एक मोठे यश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी एअरटेलने ब्लिंकिटच्या सहकार्याने १० मिनिटांत सिम डिलिव्हरीची सेवा सुरू केली होती, परंतु आता बीएसएनएलनेही त्यांची नवीन सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे सिम तुमच्या घरी फक्त ९० मिनिटांत पोहोचेल.
ऑनलाईन मिळेल सिम
सिम कार्ड खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढल्याने, बीएसएनएलच्या दुकानांमध्ये लांब रांगा लागल्या आहेत. ही समस्या लक्षात घेऊन, बीएसएनएलने आता ऑनलाइन सिम बुकिंग सेवा सुरू केली आहे ज्यामध्ये केवायसी प्रक्रिया देखील सोपी आहे आणि सिम लवकर डिलिव्हर केले जाते. अशा प्रकारे, तुम्ही घरी बसून BSNL 4G किंवा 5G सिम ऑर्डर करू शकता.
https://Prune.co.in/ या वेबसाइटला जा.
“Buy SIM Card” हा पर्याय निवडा आणि India ला सेलेक्ट करा.
ऑपरेटरमध्ये BSNL ला निवडा आणि पसंतीचा FRC प्लॅन निवडा.
तुमची माहिती भरा आणि OTP वापरून पडताळणी करा.
तुमचा पत्ता एंटर करा आणि स्क्रीनवरील सूचनांचे पालन करा.
सिम कार्ड तुमच्या घरी फक्त ९० मिनिटांत पोहोचेल.
आता प्रायव्हसीचा टेन्शन नाही, WhatsApp ने सीक्रेट चॅटसाठी नवीन फिचर केला जाहीर..