BSNL(फोटो सौजन्य SOCIAL MEDIA)
गेल्या वर्षी जेव्हा प्राइवेट टेलीकॉंम कंपन्यांनी रिचार्ज प्लान्सच्या किमती वाढवल्या होत्या. तेव्हापासून अनेक वापरकर्ते सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएलकडे वळले आहेत. आता बीएसएनएल आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन प्लान्स सादर करत आहे. अलीकडेच कंपनीने ३३६ दिवसांच्या वैधतेसह एक नवीन प्लान सादर केला आहे. हा प्लॅन एअरटेल आणि जिओ सारख्या मोठ्या टेलिकॉम कंपन्यांना थेट टक्कर देण्यास सक्षम आहे.
आता प्रायव्हसीचा टेन्शन नाही, WhatsApp ने सीक्रेट चॅटसाठी नवीन फिचर केला जाहीर..
कमी किमतीत दीर्घ वैधता
बीएसएनएलचा हा नवीन प्लॅन ३३६ दिवसांसाठी वैध आहे आणि त्याची किंमत फक्त 1499 रुपये आहे. म्हणजे एकदा रिचार्ज केला तर संपूर्ण वर्षभर पुन्हा रिचार्ज करण्याची आवश्यकता राहत नाही. हे विशेषतः अशा वापरकर्त्यांसाठी फायदेशीर आहे ज्यांना जास्त कॉल करावे लागतात आणि इंटरनेटची कमी गरज असते.
कोणते फायदे आहेत?
या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉलिंगचा फायदा मिळतो. याशिवाय, वापरकर्त्यांना योजनेत सर्व नेटवर्कवर दररोज १०० मोफत एसएमएसचा लाभ दिला जातो. या प्लॅनमध्ये एकूण 24GB डेटा उपलब्ध आहे जो संपूर्ण वैधता कालावधीमध्ये वापर करता येऊ शकतो.
एअरटेलचा नवीन प्लॅन
एअरटेलने अलीकडेच ४००० रुपयांचा एक नवीन प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये, वापरकर्त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ५ जीबी डेटा आणि एकूण १०० मिनिटे इनकमिंग आणि आउटगोइंग कॉलिंगची सुविधा मिळते. एवढेच नाही तर, तुम्ही विमान प्रवास करताना 250MB डेटा देखील वापरू शकता,परंतु ही सुविधा केवळ काही निवडक एअरलाइन्समध्येच उपलब्ध असेल. जर आपण भारतातील या प्लानचे फायदे पाहिले तर या प्लॅन अंतर्गत तुम्हाला संपूर्ण वर्षासाठी अमर्यादित कॉलिंग, दररोज 1.5GB हाय-स्पीड डेटा आणि दररोज १०० मोफत एसएमएस मिळतात. याचा अर्थ असा की वापरकर्त्याला पुन्हा पुन्हा रिचार्ज करण्याची गरज नाही आणि वेगवेगळे पॅक शोधण्याची सुद्धा नाही.
Xiaomi Smart Speaker AI फीचर्स सोबत लाँच, 8W पावर आउटपुट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये….