OnePlus च्या पावरफुल Smartphone ची झाली धमाकेदार एंट्री! किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स जाणून घ्या सर्वकाही
OnePlus Ace 5 Ultra आणि OnePlus Ace 5 Racing Edition हे दोन्ही स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत. दोन्ही स्मार्टफोन Android 15-बेस्ड ColorOS 15 वर आधारित आहेत. दोन्ही फोनमध्ये ग्लेशियर कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे. यामध्ये इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेंसर देखील देण्यात आला आहे. नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या OnePlus Ace 5 Ultra आणि OnePlus Ace 5 Racing Edition ची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स जाणून घ्या.
अरे देवा! Google Photos चं स्टोरेज झालं फुल्ल? एक्सपर्टच्या या Smart Tricks करणार तुमची मदत
OnePlus Ace 5 Ultra स्मार्टफोन चार व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,499 म्हणजेच सुमारे 29,700 रुपये आहे. तर 16GB+256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,799 म्हणजेच सुमारे 33,200 रुपये आणि 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,999 म्हणजेच सुमारे 35,600 रुपये आहे. तर 16GB+512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,299 म्हणजेच सुमारे 39,200 रुपये आहे. टॉप मॉडेल 16GB+1TB व्हेरिअंटची किंमत CNY 3,799 म्हणजेच सुमारे 45,100 रुपये आहे. हा स्मार्टफोन ब्रीज ब्लू, बर्निंग टाइटेनियम, आणि फँटम ब्लॅक शेड्समध्ये लाँच करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – X)
OnePlus Ace 5 Racing Edition च्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,799 म्हणजेच सुमारे 21,400 रुपये आहे. तर 16GB+256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,099 म्हणजेच सुमारे 24,900 रुपये, 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,299 म्हणजेच सुमारे 27,300 रुपये आणि 16GB+512GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,499 म्हणजेच सुमारे 29,700 रुपये आहे. हा स्मार्टफोन चेसिंग वेव्स व्हाइट, रॉक ब्लॅक आणि वाइल्ड ग्रीन शेड्समध्ये लाँच करण्यात आला आहे. OnePlus Ace 5 Ultra आणि Ace 5 Racing Edition हे दोन्ही स्मार्टफोन सध्या Oppo चायना ई-स्टोअरद्वारे देशात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
OnePlus Ace 5 Ultra मध्ये 6.83-इंच फ्लॅट 1.5K (1,272×2,800 पिक्सेल) डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट, 1,400 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस, 3,840Hz PWM डिमिंग रेट, HDR10+, HDR Vivid आणि Dolby Vision सपोर्ट आहे. हा स्मार्टफोन TÜV Rheinland Eye Protection 4.0 सर्टिफाइड आहे. हा हँडसेट 3nm ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 9400+ चिपसेट देण्यात आला आहे. ज्यामध्ये 16GB पर्यंत LPDDR5x RAM आणि 1TB पर्यंत UFS 4.0 ऑनबोर्ड स्टोरेज आहे. हा स्मार्टफोन Android 15-बेस्ड ColorOS 15 वर चालतो.
OnePlus Ace 5 Ultra मध्ये 50-मेगापिक्सेल 1/1.56-इंच Sony IMX906 प्रायमरी सेंसर आहे, यामध्ये f/1.8 अपर्चर आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS) सपोर्ट आहे, यासोबतच 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड शूटर f/2.2 अपर्चरसह आहे. फोनमध्ये 16-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा सेंसर आहे, ज्यामध्ये f/2.4 अपर्चर आहे. OnePlus चं म्हणणं आहे की, Ace 5 Ultra मध्ये डेडिकेटेड ‘Fengchi’ गेमिंग चिप, ‘Lingxi’ टच चिप आणि G1 ई-स्पोर्ट्स Wi-Fi चिप आहे. दोन्ही चिप्सची नावे चिनी भाषेतून भाषांतरित केली आहेत. फोनमध्ये ग्लेशियर कूलिंग सिस्टम देखील आहे, ज्यामध्ये 7,300 sq mm VC कूलिंग यूनिट आणि 4,000 sq mm बॅक कवर कूलिंग एरिया देखील आहे.
Ace 5 Ultra मध्ये 6,700mAh बॅटरी आहे, जी 100W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.
फोनमध्ये गेलं पावसाचं पाणी? थांबा! तुमच्या या चुका ठरतील Dangerous, डिव्हाईस होऊ शकतं खराब
फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G, डुअल 4G VoLTE, Wi-Fi 7, Bluetooth 5.4, Beidou, GPS, GLONASS, Galileo, QZSS, NavIC, NFC आणि USB Type-C कनेक्टिविटीला सपोर्ट करतो. हँडसेटमध्ये बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेंसर आहे.
OnePlus Ace 5 Racing Edition launched
• Dimensity 9400e
• 6.77-inch FHD+ 120Hz OLED flat display
• 50MP main (IMX882, OIS) + 2MP
• Front 16MP
• 7100mAh battery + 80W charging
• Wi-Fi chip G1
• 8.27mm thick, 200g weight💰Price: ¥1799 ( ₹21,350/$250) pic.twitter.com/0iwnUdm0dk
— OnePlus Club (@OnePlusClub) May 27, 2025
OnePlus Ace 5 Racing Edition मध्ये 6.77-इंच 1.5K (1,080×2,392 पिक्सेल) AMOLED स्क्रीन आहे, ज्यामध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 1,300 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस आहे. फोनमध्ये 4nm ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 9400e प्रोसेसर आहे, ज्यामध्ये 16GB पर्यंत LPDDR5x RAM आणि 512GB पर्यंत UFS 4.0 स्टोरेज आहे. हँडसेटमध्ये डुअल रियर कॅमेरा यूनिट आहे, ज्यामध्ये f/1.8 अपर्चर आणि OIS सपोर्टसह 50-मेगापिक्सेल प्रायमरी रियर सेंसर आणि 2-मेगापिक्सेल मोनोक्रोम कॅमेरा आहे. यामध्ये Ultra वर्जनमध्ये फ्रंट कँमेरा सेंसर देखील आहे.
OnePlus ने सांगितलं आहे की, Ace 5 Racing Edition मध्ये देखील डेडिकेटेड ‘Fengchi’ गेमिंग चिपसेट आणि कंपनीचे ग्लेशियर कूलिंग सिस्टम आहे. हँडसेटमध्ये 7,100mAh बॅटरी आहे, जी 80W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये Ultra वर्जनसारखी कनेक्टिविटी आणि सिक्योरिटी फीचर्स आहेत.