सोशल मीडिया युजर्सचं Ghibli वेड कमीच होईना, OpenAI च्या CEO ने केली एक्सवर पोस्ट; म्हणाला, टीमला आरामाची गरज...
गेल्या आठवडाभरासपासून Ghibli स्टाईल ईमेजने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडिया ओपन करताच असं वाटतं की Ghibli स्टाईल ईमेजचा जणू काही पाऊसचं पडत आहे. कलाकार, अभिनेत्यांपासून अगदी राजकीय नेत्यांना देखील Ghibli ने वेड लावलं आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर त्यांचे Ghibli ईमेज अपलोड करत आहेत. या Ghibli ईमेज तयार करण्यासाठी OpenAI च्या चॅटजीपीटीचा वापर केला जात आहे. लाखो लोकांनी चॅटजीपीटीचा वापर करून Ghibli ईमेज तयार केल्या आहेत.
एलन मस्कच्या ग्रोकसह अनेक असे टूल्स आहेत जे तुम्हाला फ्रीमध्ये Ghibli स्टाईल ईमेज तयार करून देतात. पण तरी देखील चॅटजीपीटीने तयार केल्या जाणाऱ्या Ghibli ईमेज प्रचंड लोकप्रिय आहेत. खरं तर कंपनीने ही सेवा आधी केवळ पेड युजर्ससाठीच सुरु केली होती. मात्र आता कंपनीने फ्री युजर्सना देखील Ghibli ईमेज तयार करण्यासाठी परवानगी दिली आहे. फ्री युजर्स दिवसाला केवळ 3 ईमेज तयार करू शकतात. चॅटजीपीटीमध्ये टिपले जाणारे बारकावे आणि मिळणाऱ्या रिझल्ट्समुळे युजर्स प्रचंड खुश आहेत. यामुळे हजारो युजर्स एकाच वेळी चॅटजीपीटी वापरत आहेत. यामुळे चॅटजीपीटी टीमवर मोठ्या प्रमाणात दबाव येत असून त्यांच्या समस्या वाढल्या आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
OpenAI चे सिईओ यांनी अलीकडेच पोस्ट केली होती की, वाढत्या मागणीमुळे त्यांचा GPU ‘मेल्ट’ होत आहेत. यानंतर आता Sam Altman ने त्यांच्या एक्स अकाऊंटवर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे, आणि त्यांची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता अलिकडच्या एका X पोस्टमध्ये, कंपनीच्या सीईओने लोकांना विनंती केली आहे की कृपया ईमेज तयार करताना थोडा धीर धरा, हा वेडेपणा आहे, आमच्या टीमला झोपेची गरज आहे. या विधानावरून असे दिसते की इमेज जनरेशन फीचरची मागणी ओपनएआयच्या जीपीयू तसेच टीमवर परिणाम करत आहे. वाढत्या मागणीमुळे टीमवरील दबाव प्रचंड वाढला आहे.
it’s super fun seeing people love images in chatgpt.
but our GPUs are melting.
we are going to temporarily introduce some rate limits while we work on making it more efficient. hopefully won’t be long!
chatgpt free tier will get 3 generations per day soon.
— Sam Altman (@sama) March 27, 2025
can yall please chill on generating images this is insane our team needs sleep
— Sam Altman (@sama) March 30, 2025
ओपनएआयच्या नवीन इमेज जनरेटर वैशिष्ट्याच्या प्रचंड मागणीच्या पार्श्वभूमीवर, कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी अलीकडील पोस्टमध्ये एका नवीन आव्हानाबद्दल सांगितले. ऑल्टमनने नोंदवले की चॅटजीपीटीच्या इमेज जनरेटरवरील उत्साहामुळे ओपनएआयचे जीपीयू ‘मेल्ट’ होते. यामुळेच कंपनीला कंपनीला ईमेज जनरेट करण्यावर मर्यादा घालाव्या लागणार आहेत. आता ChatGPT मोफत श्रेणीतील युजर्ससाठी दररोज फक्त तीन फोटो तयार करत आहे. एवढेच नाही तर, ऑल्टमनने त्यांच्या नवीन Ghibli -शैलीतील प्रोफाइल फोटोचाही उल्लेख केला, जो या वैशिष्ट्यासह तयार करण्यात आला होता.
ओपनएआयने अलीकडेच चॅटजीपीटीमध्ये हे इमेज जनरेटर फीचर सादर केले, ज्याला युजर्सकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. हे वैशिष्ट्य युजर्सना काही मिनिटांत त्यांच्या आवडत्या फोटोची Ghibli ईमेज तयार करून देतो, आकृत्या, लोगो, इन्फोग्राफिक्स, स्टॉक फोटो आणि व्यवसाय कार्ड तयार करण्यास अनुमती देते. या टूलचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे ते आधीच तयार केलेला फोटो काढू शकते आणि त्याचे पेंटिंग किंवा प्रोफेशनल हेडशॉटमध्ये रूपांतर करू शकते. तथापि, या वैशिष्ट्याच्या मागणीमुळे, ओपनएआयच्या संगणकीय शक्तीवर मोठा दबाव आला आहे. ही मागणी GPU ला मल्टीटास्किंग करण्यास भाग पाडते, कधीकधी त्यांच्यावर जास्त भार पडतो. हा दबाव हाताळण्यासाठी आणि सेवा स्थिर ठेवण्यासाठी, कंपनी आता ईमेज क्रिएट करण्यावर मर्यादा घालणार आहे.