14 हजार रुपयांहून कमी किंमतीत OPPO A5x 5G भारतात लाँच, मिलिट्री-ग्रेड ड्यूरेबिलिटी आणि Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज
टेक कंपनी OPPO ने भारतात OPPO A5x 5G हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या A3x 5G स्मार्टफोनचा अपग्रेडेड व्हेरिअंट म्हणून OPPO A5x 5G लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोन मिलिट्री-ग्रेड ड्यूरेबिलिटीने सुसज्ज आहे. फोनमध्ये MIL-STD-810H सर्टिफिकेशन आहे आणि स्मार्टफोनने एक्सट्रीम हीट, मॉइस्चर आणि शॉक रेजिस्टेंस सारख्या परिस्थितीचा सामना करावा यासाठी कठिण परिस्थितीत त्याची चाचणी करण्यात आली आहे.
कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर स्मनार्टफोनबाबत माहिती दिली आहे. स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबद्दल वेबसाईटवर माहिती दिली आहे. या स्मार्टफोनची विक्री उद्यापासून म्हणजेच 25 मेपासून सुरु होणार आहे. तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा किंवा जुना स्मार्टफोन अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. कंपनीने लाँच केलेला हा नवीन स्मार्टफोन एक बजेट व्हेरिअंट आहे. शिवाय स्मार्टफोनच्या पहिल्या विक्रीवर काही ऑफर्स देखील दिल्या जाणार आहेत. त्यामुळे हा बजेट स्मार्टफोन आणखी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – OPPO)
OPPO A5x 5G स्मार्टफोन मिडनाइट ब्लू आणि लेजर व्हाइट कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 4GB+128GB व्हेरिअंटची किंमत 13,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 25 मे पासून Amazon, Flipkart, OPPO Store आणि मेजर रिटेल आउटलेट्सवर उपलब्ध होणार आहे. ऑफर्सबद्दल बोलायचं झालं तर SBI Card, IDFC FIRST Bank, Bank of Baroda, Federal Bank आणि DBS Bank वर 1000 इंस्टेंट कॅशबॅक आणि 3 महीने की नो-कॉस्ट EMI उपलब्ध आहे.
OPPO मध्ये 6.67-इंच HD+ LCD स्क्रीन आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,000 निट्स पीक ब्राइटनेस देण्यात आला आहे. या फोनमध्ये MIL-STD-810H सर्टिफिकेशन आहे आणि याला एक्सट्रीम हीट, मॉइस्चर आणि शॉक रेजिस्टेंससाठी टेस्ट करण्यात आलं आहे. यामध्ये IP65 रेटिंग आहे, जे मागील मॉडेलच्या IP54 रेटिंगपेक्षा अधिक चांगलं आहे. OPPO A5x 5G मध्ये 360° आर्मर बॉडी आहे, ज्यामध्ये फ्लॅगशिप-ग्रेड रीइन्फोर्स्ड ग्लास आहे.
या स्मार्टफोनमध्ये Dimensity 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्याला 4GB रॅमसह जोडण्यात आलं आहे.
फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा आणि 32MP रियर कॅमेरा देण्यात आला आहे.
फोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे,जी 45W SuperVOOC चार्जरसह येते. कंपनीने दावा केला आहे की, 21 मिनटांत 30% आणि 1 तास 24 मिनटांत 100% चार्ज होते.
स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. कनेक्टिविटीसाठी 5G NA/NSA, डुअल 4G VoLTE, Wi-Fi 802.11 ac (2.4GHz + 5GHz), Bluetooth 5.1, GPS + GLONASS, USB Type-C देण्यात आला आहे.