Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्टफोन इंडस्ट्रीत मोठा ट्विस्ट! ‘या’ दिग्गज टेक कंपन्या बनल्या Oppo सब-ब्रँड, यूजर्सना बसला धक्का

टेक क्षेत्रात आणि स्मार्टफोन क्षेत्रात आता एका नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. कारण तीन दिग्गज कंपन्यांची युती झाली आहे. कंपन्यांच्या या निर्णयाचा यूजर्सवर नकारात्मक परिणाम होत आहे. या निर्णयांची कारण जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 09, 2026 | 12:03 PM
स्मार्टफोन इंडस्ट्रीत मोठा ट्विस्ट! 'या' दिग्गज टेक कंपन्या बनल्या Oppo सब-ब्रँड, यूजर्सना बसला धक्का

स्मार्टफोन इंडस्ट्रीत मोठा ट्विस्ट! 'या' दिग्गज टेक कंपन्या बनल्या Oppo सब-ब्रँड, यूजर्सना बसला धक्का

Follow Us
Close
Follow Us:
  • Oppo छत्राखाली येणार Realme आणि OnePlus
  • Oppo छत्राखाली येणार Realme आणि OnePlus
  • स्मार्टफोन जगात नवा अध्याय सुरु
स्मार्टफोन यूजर्ससाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात लवकरच एका नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. दोन लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड, Realme आणि OnePlus मध्ये एक अत्यंत मोठा बदल पाहायला मिळणार आहे. आता स्मार्टफोन क्षेत्रातील या दोन्ही दिग्गज कंपन्या Oppo च्या सब-ब्रँड म्हणून काम करणार आहेत. कंपनीने अतिशय मोठं पाऊल उचललं आहे. Oppo चा हा निर्णय बिझनेस स्ट्रक्चर अधिक सोपं बनवण्यासाठी आणि एफिशिएंसी अधिक चांगली बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

itel Zeno 20 Max: बजेट सेगमेंटचा सुपरहिट फोन! 5,000mAh बॅटरी आणि 13MP कॅमेऱ्याने सुसज्ज… 6 हजारांहून कमी आहे किंमत

रिअलमी आणि वनप्लसची स्ट्रॅटेजी

असं सांगितलं जात आहे की, रिअलमी आणि वनप्लस दोन्ही एकाच कंपनीचे सब ब्रँड म्हणून काम करणार असले तरी देखील हे दोन्ही ब्रँड्स वेगवेगळी मार्केट स्ट्रेटेजी फॉलो करणार आहेत आणि वेगवेगळ्या यूजर्सना टार्गेट करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रिअलमी चे फाउंडर आणि सिईओ स्काई ली (Sky Li), रिअलमी आणि वनप्लस सह ओप्पोचे सर्व सब-ब्रँड्स मॅनेज करणार आहेत. यादरम्यान ली जी (Li Jie) त्यांच्या सध्याच्या भूमिकेत वनप्लस चीनचे प्रेसिडेंट म्हणून काम सांभाळणार आहेत. टेक ब्रँड ओप्पोचं असं म्हणणं आहे की, भूमिका स्पष्टपणे परिभाषित केल्याने अंतर्गत गोंधळ कमी होईल, फंक्शन्सचे ओव्हरलॅपिंग दूर होईल. तसेच प्रत्येक ब्रँडला त्यांच्या योजना अधिक प्रभावीपणे लागू करण्यासाठी देखील मदत होणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

आफ्टर-सेल्स सर्विस

रिअलमीच्या आफ्टर-सेल्स सर्विसमध्ये देखील एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. रिअलमी आता ओप्पोच्या आफ्टर-सेल्स सर्विस नेटवर्कचा पूर्णपणे वापर करणार आहे. रिअलमीचे प्रोडक्ट्स त्यांनी ठरवलेल्या शेड्यूल प्रमाणेच लाँच केले जाणार आहेत. कंपनीने घेतलेल्या .या निर्णयाचा यूजर्सवर देखील काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण कंपन्यांच्या या निर्णयाला अनेक यूजर्सना नकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

रिअलमी आणि वनप्लस आता ओप्पोचे सबब्रँड

व्यापाराच्या दृष्टिकोनातून पाहिले तर, कंपन्यांना त्यांचा निर्णय अगदी योग्य वाटत आहे. रिअलमी आणि वनप्लस आता ओप्पोचे सबब्रँड म्हणून काम करणार आहेत. त्यामुळे आता रिसर्च आणि डेवलपमेंट, लॉजिस्टिक्स आणि आफ्टर-सेल्स सर्विससाठी वेगवेगळ्या संघांची गरज नाही. अशी आशा आहे की, ओप्पो सर्विस नेटवर्क आणि इंजीनियरिंग रिसोर्सला एकत्र करणार आहे. यामुळे कंपनीचा खर्च कमी होणार आहे आणि यामुळे जागतिक मेमरी चिपच्या कमतरतेसारख्या सध्याच्या आव्हानांना चांगल्या प्रकारे तोंड देण्यास मदत होईल.

CES 2026: Samsung चा मोठा धमाका! अल्‍ट्रा-स्लिम प्रोफाइलसह Galaxy Book 6 सिरीज लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

कंपन्यांच्या या निर्णयाकडे यूजर्सच्या दृष्टिकोणातून पाहिले तर हा बदल नकारात्मक वाटू शकतो. यापूर्वी OnePlus ने OxygenOS ला ओप्पोच्या ColorOS सारखे सादर केले होते. आता Realme UI सोबत देखील असंच काही घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक यूजर्सनी चिंता व्यक्त केली आहे. जर तिन्ही ब्रँड्स सारखेच झाले तर त्यांच्यामध्ये कोणताही फरक जाणवणार नाही. यूजर्स फक्त वेगवेगळे ब्रँडची नावे पाहू शकतील मात्र, अनुभव जवळजवळ सारखाच वाटू शकतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Oppo, Realme आणि OnePlus एकत्र येणार म्हणजे काय?

    Ans: Oppo, Realme आणि OnePlus एकत्र येणार म्हणजे काय?

  • Que: Realme आणि OnePlus पूर्णपणे बंद होणार आहेत का?

    Ans: नाही. दोन्ही ब्रँड्स बंद होणार नाहीत. ते स्वतंत्र नावानेच स्मार्टफोन्स लाँच करत राहतील.

  • Que: या निर्णयामागचं मुख्य कारण काय आहे?

    Ans: खर्च कमी करणे, रिसर्च-डेव्हलपमेंट शेअर करणे आणि स्पर्धात्मक बाजारात अधिक ताकद मिळवणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.

Web Title: Twist in smartphone industry realme and oneplus companies are now working as oppo sub brand tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 12:03 PM

Topics:  

  • oneplus
  • OPPO smartphone
  • realme

संबंधित बातम्या

Oppo Reno 15 Launched: कंपनीचा मास्टरस्ट्रोक! एकाचवेळी 4 फोन लाँच, परफॉर्मन्स आणि डिझाइनसह सर्वच टॉप क्लास
1

Oppo Reno 15 Launched: कंपनीचा मास्टरस्ट्रोक! एकाचवेळी 4 फोन लाँच, परफॉर्मन्स आणि डिझाइनसह सर्वच टॉप क्लास

डिजाईन पाहताच प्रेमात पडाल… Realme 16 Pro सिरीजची भारतात ग्रँड एंट्री, फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल खूश
2

डिजाईन पाहताच प्रेमात पडाल… Realme 16 Pro सिरीजची भारतात ग्रँड एंट्री, फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल खूश

चार्जिंगची चिंता संपली! 7,000mAh बॅटरीसह OPPO चा दमदार 5G स्मार्टफोन लाँच, 25 हजारांहून कमी किंमत आणि असे आहेत फीचर्स
3

चार्जिंगची चिंता संपली! 7,000mAh बॅटरीसह OPPO चा दमदार 5G स्मार्टफोन लाँच, 25 हजारांहून कमी किंमत आणि असे आहेत फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.