Oppo F31 Pro+: 7000mAh बॅटरीसह Oppo ने लाँच केले तीन जबरदस्त 5G स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Oppo ने F31 ही नवीन स्मार्टफोन सिरीज लाँच केली असून, या सिरीजमध्ये ओप्पो F31, F31 प्रो आणि F31 प्रो+ यांचा समावेश आहे. कंपनीने सांगितलं आहे की, या सर्व डिव्हाईसमध्ये अधिक चांगला परफॉर्मेंस, जास्त काळ चालणारी बॅटरी आणि उत्तम ड्यूरेबिलिटी देण्यात आली आहे. या सिरीजमधील बेस मॉडेल F31 आणि F31 प्रोमध्ये मीडियाटेक 6300/7300 एनर्जी चिपसेट देण्यात आला आहे.
स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर ओप्पो F31 5G ची सुरुवातीची किंमत 22,999 रुपये आहे. तर सीरीजमधील F31 प्रो 5G ची किंमत 26,999 रुपयांपासून सुरु होते. या सिरीजमधील टॉप एंड डिव्हाईस ओप्पो F31 प्रो+ ची किंमत 32,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या डिव्हाईसची पहिली विक्री 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे, ग्राहक हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट, अमेजन आणि ओप्पो ई-स्टोरवरून खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – X)
Oppo च्या या डिव्हाईसमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.5 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन मीडियाटेक 6300 एनर्जी चिपसेटने सुसज्ज आहे. डिव्हाईसमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत LPDDR4x रॅम देण्यात आली आहे. कंपनीने या नवीन डिव्हाईसमध्ये 7,000 mAh बॅटरी दिली आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करते. फोटोग्राफीसाठी या डिव्हाईसमध्ये कंपनीने 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा सेकेंडरी कॅमेरा दिला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP कॅमेरा देण्यात आला आहे.
कंपनीने लाँच केलेल्या या सिरीजमधील प्रो मॉडेलमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंचाचा AMOLED डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये मीडियाटेक 7300 एनर्जी चिपसेट आणि 5219 mm² चा सुपरकूल VC सिस्टम देण्यात आला आहे, ज्यामुळे फोन लवकर गरम होत नाही. या डिव्हाईसमध्ये कंपनीने 12GB पर्यंत LPDDR4X रॅम दिली आहे. ज्यासोबत 256GB UFS 3.1 स्टोरेज देखील उपलब्ध आहे. फोनमध्ये 7,000mAh बॅटरी आणि 80W चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, या डिव्हाइसमध्ये तुम्हाला 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP सेकंडरी कॅमेरा मिळतो. सेल्फीसाठी, या फोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा आहे. डिव्हाइस 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील देत आहे.
सिरीजमधील टॉप एंड मॉडेलमध्ये देखील 120Hz रिफ्रेशसह थोडा मोठा 6.8-इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये पावरफुल स्नॅपड्रॅगन 7 जेनरेशन 3 चिपसेट आणि जबरदस्त VC सिस्टम देखील देण्यात आला आहे. हे डिव्हाईस 7,000mAh बॅटरी आणि 80W चार्जिंग सपोर्टसह लाँच करण्यात आले आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, या फोनमध्येही तुम्हाला 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP सेकंडरी कॅमेरा मिळतो. तर फ्रंट साइडमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा मिळतो.