Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

OPPO K14x 5G: 50MP कॅमेरा आणि डाइमेंसिटी 6300 प्रोसेसर… Oppo च्या नव्या स्मार्टफोनने सर्वांना फोडला घाम, किंमत केवळ इतकी

OPPO Smartphone Launched: कंपनीने एक नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. कमी किंमत, आकर्षक डिझाईन आणि दमदार फीचर्स या सर्वांमुळे हा स्मार्टफोन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 10, 2026 | 02:36 PM
OPPO K14x 5G: 50MP कॅमेरा आणि डाइमेंसिटी 6300 प्रोसेसर... Oppo च्या नव्या स्मार्टफोनने सर्वांना फोडला घाम, किंमत केवळ इतकी

OPPO K14x 5G: 50MP कॅमेरा आणि डाइमेंसिटी 6300 प्रोसेसर... Oppo च्या नव्या स्मार्टफोनने सर्वांना फोडला घाम, किंमत केवळ इतकी

Follow Us
Follow Us:
  • ओप्पोच्या नवीन डिव्हाईसमध्ये 6.75 इंच HD+ डिस्प्ले
  • कंपनीने लाँच केलेल्या डिव्हाईसमध्ये 4GB आणि 6GB रॅम असे दोन पर्याय
  • नवीन स्मार्टफोन प्रिझम व्हायलेट आणि आयसी ब्लू या दोन रंगात लाँच
इंडियन स्मार्टफोन मार्केटमध्ये टेक कंपनी ओप्पोने पुन्हा एकदा नवा आणि मोठा धमाका केला आहे. कंपनीने भारतात बजेट रेंजमध्ये त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन OPPO K14x 5G या नावाने लाँच करण्यात आला आहेत. कंपनीने काही आठवड्यांपूर्वी त्यांच्या आगामी स्मार्टफोनच्या लाँचिंगची घोषणा केली होती. आता हा स्मार्टफोन अधिकृतपणे लाँच करण्यात आला आहे. बजेट सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनची किंमत 15 हजार रुपयांहून कमी आहे. कंपनीने लाँच केलेल्या या लेटेस्ट डिव्हाईसमध्ये मोठी बॅटरी, स्मूद डिस्प्ले आणि 5G कनेक्टिविटी सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनबाबत अधिक जाणून घेऊया.

Jio Recharge Plan: फ्री T20 वर्ल्ड कप स्ट्रीमिंगसह मिळवा अनलिमिटेड इंटरनेट…. रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणार ‘हे’ बेनिफिट्स

OPPO K14x 5G चे टॉप फीचर्स

ओप्पोच्या या नवीन डिव्हाईसमध्ये 6.75 इंच HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1125 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर करतो. तसेच या डिव्हाईसमध्ये अँड्रॉईड 16 वर बेस्ड ColorOS 16 देण्यात आला आहे, ज्यामुळे यूजर्सना लेटेस्ट इंटरफेस अनुभव मिळणार आहे. फोनला पावर देण्यासाठी या डिव्हाईसमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 6300 प्रोसेसर आहे, जो 6nm प्रोसेसवर बेस्ड आहे. यामुळे स्मार्टफोनला स्मूद परफॉर्मंस मिळतो.  (फोटो सौजन्य – X) 

यासोबतच कंपनीने लाँच केलेल्या या डिव्हाईसमध्ये 4GB आणि 6GB रॅम असे दोन पर्याय आहेत. व्हर्च्युअल रॅमद्वारे 8 जीबी पर्यंत विस्तारासाठी देखील सपोर्ट आहे. या डिव्हाईसमध्ये 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे, जे माइक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवले जाऊ शकते. OPPO K14x 5G या फोनची जाडी 8.61 मिमी आहे आणि मागील पॅनलवर मॅट फिनिश आहे. शिवाय, या फोनला IP64 रेटिंग आहे, ज्यामुळे तो धूळ-प्रतिरोधक आणि पाणी-प्रतिरोधक बनतो.

OPPO K14x 5G चे कॅमेरा फीचर्स

फोटोग्राफीसाठी ओप्पोच्या या डिव्हाईसमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे, जिथे 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा पोर्ट्रेट सेंसर देण्यात आला आहे. याशिवाय सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. डिव्हाईस1080p मध्ये फुल HD व्हिडीओ रिकॉर्डिंगला सपोर्ट करतो. कंपनीने लाँच केलेल्या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 45W SuperVOOC फास्ट चार्जरसह 6500mAh बॅटरी दिली आहे.

कधी लाँच होणार Free Fire India? गेमर्समध्ये वाढली उत्सुकता, एका क्लिकवर जाणून घ्या सविस्तर

OPPO K14x 5G ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीने नवीन स्मार्टफोन प्रिझम व्हायलेट आणि आयसी ब्लू या दोन रंगात लाँच केला आहे. या डिव्हाईसच्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 14,999 रुपये आणि 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 16,999 रुपये आहे. हे डिव्हाइस 16 फेब्रुवारीपासून फ्लिपकार्ट, ओप्पोच्या अधिकृत वेबसाइट आणि ऑफलाइन स्टोअर्सवरून खरेदीसाठी उपलब्ध असेल. लाँच ऑफर्समध्ये 1,500 रुपयांपर्यंत बँक डिस्काउंट आणि तीन महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय पर्यायांचा समावेश आहे.

Web Title: Oppo k14x 5g launched in indian smartphone market price is less than 15 thousand know about the features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव
1

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर
2

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
3

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत
4

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.