टेलिग्रामवर पाकिस्तानी दहशतवाद्याचा व्हिडीओ व्हायरल, ट्रेनवर हल्ला करण्याची धमकी; NIAची चिंता वाढली (फोटो सौजन्य - सोशल मिडीया)
पाकिस्तानमधील दहशतवादी फरहातुल्ला घोरी याने सोशल मिडीया प्लॅटफॉर्म टेलिग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने भारतातील प्रमुख शहरांमध्ये ट्रेनवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये विशेषतः दिल्ली आणि मुंबईच्या रेल्वे नेटवर्कला लक्ष्य करण्यात आले आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे NIA ची चिंता वाढली आहे. या व्हिडीओनंतर आता दिल्ली आणि मुंबईच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर सुरक्षा बंदोबस्त वाढवला जाणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेदेखील वाचा- पाकिस्तानमधील मॅगीची किंमत वाचून व्हाल आश्चर्यचकित, जाणून घ्या सविस्तर
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील दहशतवादी फरहातुल्ला घोरी याने व्हिडीओमध्ये इंधन पाइपलाइन, वाहतूक व्यवस्था आणि रेल्वे ट्रॅक यासारख्या गंभीर पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. सुरक्षा अधिकारी अनेक घटनांचा तपास करत आहेत. यामध्ये 23 आणि 24 ऑगस्ट रोजी रेल्वे रुळावर सिमेंट ब्लॉक पडण्याच्या घटनेचाही समावेश आहे. यावेळी वंदे भारत ट्रेनला टार्गेट करून ती रुळावरून उतरवण्याचा कट होता.
व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की, लक्ष्य पेट्रोल पाइपलाइन, त्यांच्या लॉजिस्टिक चेन आणि सहयोगी, रेल्वे मार्ग आणि त्यांची वाहतूक व्यवस्था विस्कळीत करणं, यामुळे अराजकता निर्माण होईल. बॉम्बस्फोटात प्रेशर कुकर वापरा. भारत सरकारच्या गुप्तचर संस्था आणि ईडी त्याच्या मालमत्तांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे स्लीपर सेलचे नेटवर्क कमकुवत होत आहे. आम्ही परत येऊन सरकारला हादरवून टाकू. भारतीय अधिकारी अनेक एजन्सींद्वारे संस्थेशी संबंधित मालमत्तांना लक्ष्य करत आहेत, परंतु यामुळे काही फरक पडणार नाही.
हेदेखील वाचा- भारत आणि पाकिस्तान वेगवेगळ्या दिवशी का साजरा करतात त्यांचा स्वतंत्रता दिवस? जाणून घ्या
फरहातुल्ला घोरी भारतीय गुप्तचर संस्थांच्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या दहशतवादी आहे. देशात दहशतवाद पसरवणे हाच त्याचा उद्देश आहे. घोरी अनेक वर्षांपासून भारतीय गुप्तचर संस्थांच्या देखरेखीखाली आहे आणि 2002 मध्ये गांधीनगरमधील अक्षरधाम मंदिरावरील हल्ल्यासह अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग आहे. त्याच्या अलीकडील सक्रियतेचा संबंध भारताला अस्थिर करण्याच्या ISI च्या प्रयत्नांशी जोडला जात आहे आणि घोरीने अनेक भारतीय तरुणांची तसेच इतरांची इस्लामिक स्टेट (IS) मध्ये भरती केल्याचं सागितलं जात आहे.
मार्चमध्ये, घोरीने आणखी एक व्हिडिओ जारी करून भारताविरुद्ध युद्ध भडकवण्याचा प्रयत्न केला होता, जो कथितपणे ISI च्या प्रयत्नाचा भाग होता. यानंतर आता पुन्हा एकदा त्याने एक व्हिडीओ शेअर करच फिदायीन वॉरचा दावा केला आहे. हा व्हिडीओ सुमारे 3 मिनिटांचा आहे. 1 मार्च रोजी कर्नाटकातील बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटात फरहातुल्ला घोरीचा सहभाग असल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे. फरहातुल्ला घोरी आणि त्यांचा जावई शाहिद फैजल यांचे दक्षिण भारतात स्लीपर सेलचे मोठे नेटवर्क आहे. कॅफेमध्ये स्फोट होण्यापूर्वी घोरीचा जावई शाहिद हा दोन्ही हल्लेखोरांच्या संपर्कात होता.