भारताप्रमाणेच Nestle पाकिस्तानमध्ये देखील मॅगीचे उत्पादन आणि विक्री करते. त्याचे तेथे वेगळे युनिट/कंपनी आहे. पाकिस्तानात विकली जाणारी मॅगीची उत्पादने मुल्तानजवळील कंपनीच्या कबीरवाला कारखान्यात तयार केली जातात. पाकिस्तान भारतातून मॅगीचे कोणतेही उत्पादन आयात करत नाही. याशिवाय Nestle पाकिस्तानात मॅगी ब्रँड अंतर्गत टोमॅटो केचप आणि मसाला विकते.
पाकिस्तानमधील मॅगीची किंमत वाचून व्हाल आश्चर्चचकित, जाणून घ्या (फोटो सौजन्य - maggi)
Nestle ने 1992 मध्ये पाकिस्तानमध्ये मॅगी लाँच केली. म्हणजे तिथे 32 वर्षांपासून मॅगी विकली जात आहे.
भारतातील आणि पाकिस्तानमधील मॅगीची किंमत वेगळी आहे.
पाकिस्तानमधील मॅगीचे सर्वात लहान पॅकेट 15 पाकिस्तानी रुपये (PKR) आहे, जे भारतीय चलनात 4.55 रुपये इतके आहे. या पॅकेटचे वजन 32 ग्रॅम आहे.
भारतात मॅगीचा सर्वात छोटा पॅक 5 रुपयांना उपलब्ध आहे, ज्याचे वजन 35 ग्रॅम आहे.
पाकिस्तानमध्ये, चिकन मॅगीचे 65 ग्रॅमचे पॅकेटची किंमत 30 PKR आहे. म्हणजेच भारतीय चलनात त्याची किंमत 9.10 रुपये आहे.
70 ग्रॅम मॅगी नूडल्स स्पेशल मसालाची किंमत पाकिस्तानत 20 PKR आहे. म्हणजेच भारतीय चलनात त्याची किंमत 6.07 रुपये आहे.